आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Marathi Edu Bhaskar About Career In Oceanography

करिअर इन ओशनोग्राफी; जाणून घ्या, दिल्ली विद्यपीठात परदेशी विद्यार्थ्यांचा कोणत्या भाषेकडे कल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संशोधन आधारित क्षेत्रात नोकरीच्या जवळपास 70 टक्के संधी सरकारी क्षेत्रामध्ये
ओशनोग्राफी म्हणजे अर्थ सायन्सची शाखा ज्यात सागर आणि सागरी किनारपट्टी, एस्चुअरी, ओशन बेड आदींचा अभ्यास केला जातो. मॉडर्न ओशनोग्राफीची सुरुवात 1872 ते 1876 दरम्यान चॅलेंजर एक्सपेडिशनसोबत झाली होती. देशात 30 टक्के लोकसंख्या सागरी किनार्‍यावर वसली असल्यामुळे भारतासाठी याचे विशेष महत्त्व आहे. संपूर्ण जगात सागरी स्रोतांचे वाढते महत्त्व लक्षात घेता हे करिअर चांगला पर्याय आहे. असे असले तरी ते संशोधन आधारित क्षेत्र आहे आणि चांगल्या नोकरीसाठी तेवढीच उच्च शैक्षणिक गुणवत्ता आवश्यक आहे.
इंजिनिअरिंग, सोशल आणि बायोलॉजीकल सायन्सेसचे एकत्र स्वरूप
ओशनोग्राफीमध्ये बायोलॉजी, केमिस्ट्री, इंजिनिअरिंग, जिऑलॉजी, मेट्रोलॉजी आणि फिजिक्सच्या संकल्पनांचा उपयोग होतो. ओशनोग्राफर सागरी पाण्याचे प्रवाह आणि त्यातील तत्त्वांच्या माध्यमातून त्या भागाचे पर्यावरण आणि वातावरणावर कसा परिणाम होतो हे सांगते. याव्यतिरिक्त सागराच्या पृष्ठभागाचा अभ्यास करून तेथील नैसर्गिक स्रोतांची माहिती मिळवली जाते.
वेगवेगळ्या क्षेत्रांत नोकरीच्या संधी
प्रोफेशनल ओशनोग्राफर्ससाठी नोकरीच्या संधी सरकारी आणि खासगी दोन्ही क्षेत्रांत आहेत. मात्र, जवळपास तीन चतुर्थांश संधी सरकारी संस्थांमध्ये आणि सार्वजनिक क्षेत्राच्या उपक्रमांमध्ये आहेत. मेट्रोलॉजीकल सर्व्हे ऑफ इंडिया, डिपार्टमेंट ऑफ ओशनोग्राफी, जिऑलॉजीकल सर्व्हे ऑफ इंडिया आदी कार्यालयांत त्यांची नियुक्ती होते. याव्यतिरिक्त मरीन इंडस्ट्री आणि उत्पादनाच्या क्षेत्रात कार्यरत खासगी कंपन्यांमध्येही त्यांच्यासाठी नोकर्‍या असू शकतात.
प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळे स्पेशलायझेशन
मरीन बायोलॉजी : सागरी वातावरणामध्ये जीवन चक्राचा अभ्यास. यासाठी बायोलॉजी आणि जिऑलॉजीचे ज्ञान आवश्यक असते.
जिऑलॉजीकल ओशनोग्राफी :
यामध्ये सागराच्या पृष्ठभागावरील अस्तित्वात असलेल्या तत्त्वांचा अभ्यास केला जातो.
सागरी धोरण तज्ज्ञ : ओशनोग्राफी आणि सोशल सायन्सेसच्या मदतीने सागरी स्रोतांचा चांगला उपयोग करण्यासाठी ते धोरण तयार करतात.
कोस्टल अँड ओशन इंजिनिअरिंग : याचा संबंध बंदर उभारणी आणि विकास तसेच किनारपट्टी क्षेत्राच्या व्यवस्थापनाशी आहे. यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगचा उपयोग होतो.
मरीन आर्किऑलॉजिस्ट : यामध्ये सागरामध्ये अस्तित्वात असलेले अवशेष उदा: जहाजांचे सांगाडे, इमारत आदी बाबतीत सांगितले जाते. त्यासाठी आर्किऑलॉजी आणि एंथ्रोपोलॉजीचे ज्ञान आवश्यक आहे.

पुढील स्लाइडमध्ये, किती असेल वेतनाचे पॅकेज...