आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेश सूचना : पीडीपीयू, गांधीनगरच्या बीटेक आणि एमटेक पाठ्यक्रमात प्रवेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गांधीनगरच्या पंडित दीनदयाल पेट्रोलियम युनिव्हर्सिटीच्या(पीडीपीयू) बीटेक आणि एमटेक पाठ्यक्रमात प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थी बीटेकसाठी 15 जून आणि एमटेकसाठी 26 मेपर्यंत अर्ज करू शकतात. बीटेकमध्ये जेईई-मेन, 2014च्या गुणानुक्रमानुसार प्रवेश मिळेल. एमटेक कोर्सेसमध्ये प्रवेश प्रवेश परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारावर मिळेल.
स्पर्धा
300 जागा(बीटेक)
25 हजार (जवळपास) अर्जदार
8 वर्षे कोर्स मुदत
पात्रता : बीटेकसाठी फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्समध्ये 45 % गुणांसह बारावी परीक्षा उत्तीर्ण असावी. 2014 मध्ये जेईई-मेन दिलेली असावी. एमटेकसाठी 60 टक्के गुणांसह संबंधित शाखेत बीटेक. काही शाखांमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त विद्यार्थी अर्ज करू शकतात.
शुल्क : पीडीपीयूमध्ये बीटेकची वार्षिक ट्यूशन फीस जवळपास 1 लाख 45 हजार रुपये आहे. एमटेकचे वार्षिक शुल्क 1 लाख 10 हजार रुपये आहे. आयआयटीमध्ये बीटेकचे वार्षिक शुल्क जवळपास 90 हजार रुपये आहे. आयआयटी दिल्लीमध्ये एमटेक कोर्सचे वार्षिक शुल्क 1 लाख 25 हजार रुपये आहे.
शिव नाडर युनिव्हर्सिटीच्या अंडरग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये प्रवेश
गे्रटर नोएडा येथील शिव नाडर युनिव्हर्सिटीच्या बीटेक, बीएस आणि बीए कोर्सेसमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थी 6 जूनपर्यंत अर्ज करू शकतात. सर्व कोर्सेसमध्ये प्रवेश अ‍ॅप्टिट्यूड चाचणीच्या आधारे होईल. विद्यार्थी अ‍ॅप्टिट्यूड चाचणीसाठी 5 मे ते 25 जुलैपर्यंत सहभागी होऊ शकतात.
पात्रता : बीटेकसाठी फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्ससह बारावी परीक्षा उत्तीर्ण असावी. जेईई-मेनची रँकिंग असणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात. सर्व कोर्सेसमध्ये वेगवेगळ्या मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी पात्रतेचे निकष वेगवेगळे असतील.
शुल्क : शिव नाडर युनिव्हर्सिटीमध्ये सर्व अंडरग्रॅज्युएट कोर्सेसची वार्षिक ट्यूशन फीस 1 लाख रुपये आहे. यामध्ये निवास आणि जेवणाच्या खर्चाचा समावेश नाही. वनस्थली विद्यापीठामध्ये बीएची वार्षिक ट्यूशन फीस 40 हजार रुपये, बीएस्सीची 59 रुपये व बीटेकची 78 हजार रुपये आहे.
एक्सएलआरआय, जमशेदपूरच्या
प्रमाणपत्र अभ्यासक्रमात प्रवेश
झेव्हियर स्कूल ऑफ मॅनेजमेंट, जमशेदपूरमध्ये कृषी व्यवसाय आणि आंत्रप्रेन्यॉरशिप व्यवस्थापनाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रमात प्रवेशासाठी विद्यार्थी आता अर्ज करू शकतात. कृषी व्यवसायासाठी 15 मे आणि आंत्राप्रेन्यॉरशिपच्या व्यवस्थापनासाठी 31 मेपर्यंत अर्ज करता येईल.
पात्रता : कृषी व्यवसायाच्या प्रमाणपत्राच्या अभ्यासक्रमासाठी कृषी किंवा संबंधित शाखेत बीएस्सी. इतर शाखेतील पदवीसह दोन वर्षांचा अनुभव असेल तर अर्ज करता येऊ शकेल.
शुल्क : एक्सएलआरआयमध्ये कृषी व्यवसायाच्या प्रमाणपत्र कोर्सचे शुल्क सुमारे 50 हजार रुपये आणि पीजीपी-सर्टिफिकेट इन आंत्राप्रेन्यॉरशिप मॅनेजमेंट कोर्सचे शुल्क 65 हजार रुपये आहे.
आयएमटी, हैदराबादच्या पीजी पदविका कोर्सेसमध्ये प्रवेश
हैदराबादच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजीमध्ये व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमातील प्रवेशासाठी विद्यार्थी 12 मेपर्यंत अर्ज करू शकतात. प्रवेश कॅट, जॅट, सीमॅट किंवा जीमॅटच्या वैध गुणांच्या आधारे मिळू शकेल. ज्या विद्यार्थ्यांकडे असे गुण नसतील ते पात्रता परीक्षेच्या माध्यमातून प्रवेश मिळवू शकतील.
पात्रता : 50 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर. गुणवत्ता यादी बनवण्यासाठी परीक्षेतील गुणांसह वैयक्तिक मुलाखत आणि गटचर्चेलादेखील महत्त्व दिले जाईल.
शुल्क : आयएमटी, हैदराबादमध्ये पीजी पदविका अभ्यासक्रमाचे वार्षिक शुल्क सुमारे 8 लाख 40 हजार रुपये आहे. ग्रेट लेक्स स्कूल ऑफ मॅनेजमेंट, कोलकातामध्ये मॅनेजमेंटच्या पीजी प्रोग्रामचे वार्षिक शुल्क सुमारे 7 लाख 50 हजार रुपये आहे.