आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य एज्यकेशन : मॅनेजमेंट एज्युकेशनशी संबंधित प्रश्नांची तज्ज्ञांकडून उत्तरे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

करिअरशी संबंधित माहिती मिळवण्यासाठी ‘दिव्य एज्युकेशन’ला वाचकांकडून आतापर्यंत हजारो प्रश्न एसएमएस आणि ई-मेलच्या माध्यमातून मिळाले आहेत. वाचकांच्या निवडक प्रश्नांना या माध्यमातून तज्ज्ञांमार्फत उत्तरे दिली जातील.


मॅनेजमेंट एज्युकेशनशी संबंधित प्रश्नांची उत्तरे
० पी.जी. डिप्लोमा इन मॅनेजमेंट आणि एमबीए डिग्री यात चांगले कोणते? यातून प्लेसमेंटवर काय फरक पडतो ?
पीजीडीएम आणि एमबीए दोन्ही कोर्स कंटेंटच्या पातळीवर समान आहेत. मान्यताप्राप्त संस्था एमबीएची पदवी देतात आणि खासगी महाविद्यालये पीजीडीएम. डिग्रीने काही फरक पडत नाही. आजकाल आयआयएममध्येही पीजीडीएम कोर्स आहे. कारण तो अधिक उद्योगप्रवण आहे. म्हणूनच पीजीडीएम आणि एमबीए दोन्ही अभ्यासक्रम चांगले मानले जातात.
० इंटरनॅशनल बिझनेस स्टडीज सध्या अधिक पसंत केले जाते. याचा फायदा होईल ?
इंटरनॅशनल बिझनेस (आयबी) स्टडीजमध्ये फॉरेन ट्रेडविषयी शिकवले जाते. जर तुम्ही एमएनसीमध्ये किंवा परदेशी कंपनीत जॉब केला तर आयबी फायदेशीर ठरते. परंतु आयबी शिक्षणानंतर भारतीय कंपन्यांत काम करून काही प्रमाणात नुकसान होऊ शकते. कारण आयबी कोर्सची रचना परदेशी कंपन्यांना डोळ्यासमोर ठेवून करण्यात येते. सामान्य एमबीए आणि आयबीचे 80 टक्के कोर्सेस समान असतात. के.जे. सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, मुंबई आणि आयआयएफटी-दिल्ली आयबीसाठी सर्वोत्कृष्ट मानले जाते.
०एमबीएची शाखा निवडण्यासाठी इकॉनॉमिकची सध्याची स्थिती लक्षात घ्यावी लागेल की आगामी ?
सामान्यपणे विद्यार्थी आपल्या मित्रांसमवेत सध्याच्या अर्थव्यवस्थेला पाहून एमबीएची निवड करतात. परंतु एमबीएची शाखा नेहमी आपल्या अकॅडमिक स्ट्रेंग्थ आणि विकनेसचा विचार करूनच निवडावी. वास्तविक मार्केटिंग आणि फायनान्स याच एव्हरग्रीन शाखा आहेत. प्रत्येक कंपनीमध्ये मार्केटिंग आणि फायनान्ससाठी जॉब असतो.
० मी बायोलॉजी शाखेचा विद्यार्थी आहे. एमबीएसाठी मॅथ्समुळे अडचणी येईल ?
एमबीएसाठी मॅथ असणे गरजेचे नाही. कॅटमध्येही 10 वीपर्यंत गणित असते. बायोलॉजीचे विद्यार्थी इतर विषयांत जरी पदवी घेत असले तरी त्यांना बेसिक मॅथ असेल. कॅट परीक्षा आणि एमबीएच्या दरम्यान तितकीच सहजता राहू शकते. बायो स्टुडंट एमबीए बायोटेक्नॉलॉजी, एमबीए हॉस्पिटल मॅनेजमेंटदेखील करू शकतात.

ज्ञान
अशी कायम ठेवा आपली क्रिएटिव्हिटी
प्रभावी व्यवस्थापन प्रॅक्टिस आणि इनोव्हेशनसाठी या गोष्टी लक्षात ठेवा-
1. यशस्विता : जे अतिशय कठीण आहे, असे काही करण्याचे ठरवा. परंतु त्यात यश मिळेल, याचा विश्वास आपल्या सहका-यांना द्या. त्यात यश मिळाले तर यशस्विता तर निश्चित होती, हे ठासून सांगा.
2. नवी सुरुवात : आपल्या जुन्या यशस्वी गोष्टींना विसरून त्याची पुनरावृत्ती करा. त्यातून आनंद द्विगुणित होईल.
3. सुधारणा : जे लोक केवळ पैसा कमवण्याचा विचार करतात, त्यांना टाळण्याचे मार्ग शोधा. जे लोक तुमच्यावर टीका करतात, त्यांना महत्त्व द्यायला शिका. त्यातून तुम्ही चांगला परफॉर्मन्स देऊ शकाल.
4. आनंद : आनंदी राहणा-या लोकांना शोधा आणि ते आपसात संघर्ष करत असतील तर त्यांना करू द्या. परंतु त्यांच्यात संघर्ष होणार नाही, यासाठी प्रयत्न करा.


रंजक
नेहमी पूर्व दिशेला डोके करून झोपत असे डिकन्स
० चार्ल्स डिकन्स नेहमी पूर्वेकडे तोंड करून झोपत असत. यातून आपल्या हस्ताक्षरात सुधारणा येईल, अशीही त्यांची श्रद्धा होती.
० ज्या घरात अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन यांनी डिक्लरेशन ऑफ इंडिपेंडन्स लिहिले, त्याची जागा हॅमबर्गर स्टँड यांनी घेतली होती.
० अल्बर्ट आइन्स्टाइन यांना एकदा इस्रायलच्या राष्ट्राध्यक्षपदाचा प्रस्ताव आला होता, परंतु त्यांनी समस्या सोडवण्यासाठी आपल्याकडे वेळ नसल्याचे कारण सांगून त्यांनी तो फेटाळून लावला होता.
० महाराणी एलिझाबेथ (पहिल्या) यांनी श्रीमंतांना वगळून सर्व नागरिकांना रविवारी फ्लॅट कॅप परिधान करणे अनिवार्य केले होते.


दिव्य मराठी एक्स्पर्ट पॅनल
जुबीन मल्होत्रा
करिअर
काउन्सेलर, नवी दिल्ली.
परवीन शेख
करिअर काउन्सेलर, बंगळुरू
इंटरेस्टिंग कोट
“In the name of God, stop a moment, cease your work, look around you.”
- Leo Tolstoy
कामात एवढे व्यग्र होऊ नका की जगाचा विसर पडावा. काही क्षण थांबा. काम सोडा आणि आजूबाजूला बघा.
प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा 8082005060 यावर किंवा मेल करा education@dainikbhaskargroup.com