आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डीआरडीओ प्रवेश परीक्षा-2013: तांत्रिक पदांवरील भरतीसाठी चाचणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संरक्षण संशोधन व विकास संस्थेसाठी (डीआरडीओ) वेगवेगळ्या शाखांमध्ये वरिष्ठ तंत्रज्ञान सहायकाच्या रिक्त पदांच्या भरतीसाठी परीक्षा होईल. ही परीक्षा 25 ऑगस्टला होईल. निवडलेल्या उमेदवारांना डीआरडीओच्या प्रयोगशाळेत तसेच इतर ठिकाणी रोजगाराची संधी.
स्पर्धा
360
एकूण पदे
15 हजार
अर्जदार
पात्रता
वेगवेगळ्या विद्याशाखांच्या पदांसाठी वेगवेगळी पात्रता. विविध प्रकरणांत कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा पदविका अनिवार्य.
वयोमर्यादा : 18 ते 28 पर्यंत.
परीक्षा पद्धत
दोन तासांच्या परीक्षेत 150 बहुपर्यायी प्रश्न असतील. त्यात 50 प्रश्न सामान्य ज्ञान, सामान्य बुद्धिमत्ता, विश्लेषण व सांख्यिकी क्षमतेच्या बाबतीत असतील. त्यातील 100 प्रश्न संबंधित विषयाचे असतील.
निवड प्रक्रिया
लेखी परीक्षेच्या आधारे उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलावले जाईल. गुणवत्ता यादी दोन्ही घटकांतील कामगिरी बघून निश्चित केली जाईल. त्यात 85 टक्के गुण लेखी, तर 15 टक्के मुलाखतीस असतील. परंतु लेखी परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना किमान 50 टक्के गुण मिळाले असतील त्यांनाच मुलाखतीसाठी बोलावले जाईल. (एससी /एसटी साठी 45 टक्के)
इन्फो
डीआरडीओ इनोव्हेशन
डीआरडीओने अनेक तांत्रिक व नवीन आविष्कार केले आहेत. त्यात काही सामान्य जनतेच्या फायद्याचे आहेत, तर काही लष्करासाठी देशाच्या सुरक्षेशी संबंधित आहेत. यंदा तयार करण्यात आलेल्या काही वस्तूंपैकी हे नमुने :
1. कॅप्सी स्प्रे : संरक्षण संशोधन प्रयोगशाळेने जगातील सर्वात तिखट मिरची स्प्रे बनवला आहे. तो इको-फ्रेंडली आहे. हा स्प्रे भूत-जोलोकिया या मिरचीच्या वाणापासून तयार करण्यात आला आहे. हे वाण केवळ आसाममध्ये मिळते. त्याला कॅप्सी स्प्रे नाव देण्यात आले आहे. हा स्प्रे महिलांसाठी तयार करण्यात आला आहे. या माध्यमातून त्या आपली सुरक्षा करू शकतील. त्याच्या यशस्वी प्रयोगानंतर ते बाजारपेठेत येऊ शकेल.
2. ईडीके : काटीपेटीपेक्षा थोड्या मोठ्या आकाराच्या एक्सप्लोजन डिटेक्शन किट(ईडीए) तयार केली आहे. किट स्फोटकांची ओळख पटवते, त्यामुळे दहशतवादी हल्ल्यांपासून बचाव होऊ शकतो. या किटची अचूकता एवढी आहे की, 3 ते 5 मिलीग्रॅम स्फोटकाची माहिती उघड होऊ शकते. डीआरडीओचे महासंचालक अविनाश चंदूर यांनी यूएस चेंबर ऑफ कॉमर्समध्ये त्याचे लाँचिंग केले. दक्षिण केरोलिनाच्या क्राऊ अँड कंपनीने नुकतीच त्याची खरेदी केली. याचा वापर अमेरिकी कंपनीही करणार आहे.
3. आर्मी क्लायमेट कंट्रोल कोट : उणे 35 अंश सेल्सियस तापमानात तैनात देशातील जवानांचा थंडीपासून बचाव होण्यासाठी क्लायमेट कंट्रोल्ड कोट तयार करण्यात आला आहे. कोट वजनाने हलका व पातळ असूनही त्याच्यापासून थंडीचा बचाव होतो. कोट घातल्यानंतर जवानांना त्याचे ओझे वाटणार नाही. त्यामुळे जवान कोट घातल्यानंतर शस्त्र सहज घेऊन चालू शकतील.
4. सतर्क : बॅटरीवर चालणारा ऑटोमेटिक रोबोट सतर्क आहे. जीवित हानी होऊ शकणा-या वस्तू नष्ट करण्यासाठी त्याची निर्मिती केली होती. रोबोट शिड्या चढू शकतो तसेच आपल्या हातातून मोठ्या वजनाच्या वस्तू घेऊन जाऊ शकतो. या छोट्या रोबोटचा लष्करात वापर करण्याची डीआरडीओची पुढील योजना आहे. सीमेवर तैनाती होण्याइतपत ते प्रगत आहेत. त्यांच्या समावेशामुळे आपले लष्कर रोबोनाइज्ड होऊ शकेल.
रंजक
50 वर्षांत नव्या 250 बोलीभाषा संपुष्टात
देशभरात साधारण 780 बोलीभाषांचा वापर केला जातो. मात्र, गेल्या 50 वर्षांत देशातील जवळपास 250 बोलीभाषा संपुष्टात आल्या आहेत. पीपल्स लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडियाच्या एका सर्वेक्षण अहवालात ही माहिती पुढे आली आहे. भारतात साधारण 86 लिप्या लिहिल्या जातात. 1898 ते 1028 दरम्यान अब्राहम ग्रियर्सन यांच्या सर्वेक्षणानंतर देशातील हे पहिले भाषाविषयक सर्वेक्षण आहे. सर्वेक्षण पूर्ण होण्यासाठी 21 वर्षे लागतील. पश्चिम बंगालमध्ये 38 भाषा प्रचलित आहेत. राज्यात सर्वाधिक नऊ लिप्यांचा वापर होत असल्याचे अहवालात म्हटले आहे.
इंटरेस्टिंग कोट
“The difference between stupidity and genius is that genius has its limits.” - Albert Einstein
मूर्खपणा व बुद्धिमत्तेमध्ये एक फरक आहे. बुद्धिमान व्यक्तीला मर्यादा असतात.
प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या क्रमांकावर किंवा इ-मेल करा
education@dainikbhaskargroup.com