वडील अशिक्षित. ते लॉरी चालवतात. घरात प्रचंड गरिबी. लहानपणी एका अपघातात दोन्ही पाय गमावले. असे सर्व असताना नागा नरेश करुतूरा हा तरुण म्हणतो, की तो लकी आहे. कारण देव नेहमी त्याच्यासाठी धावून आला आहे. गरिबी आणि अपंगत्वावर विजय मिळवून नरेशने आयआयटी मद्रासमधून ग्रॅज्यूएशन केले. प्रतिष्ठित गुगल कंपनीत नोकरी मिळवली. चला तर नरेश स्वत:ला लकी का म्हणतो हे जाणून घेऊया...
गावात गेले लहानपण : नरेशचे बालपण आंध्र प्रदेशातील छोटेसे गाव तिपारुमध्ये गेले. हे गाव गोदावरी नदीच्या काठावर वसले आहे. वडील लॉरीचे चालक आणि आई गृहिणी आहे. परंतु त्या दोघांनीही नरेश आणि बहीण सिरिशाच्या शिक्षणाला खूप महत्त्व दिले. नरेश लहानपणापासून खूप खोडकर होता. मित्रांबरोबर खेळणे. म्हातारी माणसं झोपल्यावर त्यांची तो खोडी काढायचा.
11 जानेवारी 1993 चा काळा दिवस : नरेश मकारसंक्रातीच्या सुट्यांमध्ये आई-वडिलांबरोबर जवळच्या गावातील नातेवाईकांकडे 11 जानेवारी रोजी जात होता. ते सर्व प्रचंड गर्दी असलेल्या लॉरीत बसले होते. नरेश लॉरीच्या दरवाजाजवळ बसला होता. अचानक दरवाजा उघडला आणि बसला लागून असलेला रॉडमुळे त्याच्या दोन्ही पायांना इजा झाली. हा अपघात खासगी हॉस्पिटलसमोर घडला होता. परंतु हॉस्पिटलने उपचार करण्यास नकार दिला होता. एक पोलिस शिपाई नरेशला सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन पोहोचला.
पुढील स्लाईडवर वाचा, आयआयटी मद्रासमध्ये प्रवेश घेण्यासाठी त्याने कशी केली तयारी....