आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रवेश सूचना: पश्चिम बंगाल युनिव्हर्सिटी आॅफ टेक्नॉलॉजीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पश्चिम बंगाल युनिव्हर्सिटी आॅफ टेक्नॉलॉजी कोलकाताच्या अंतर्गत असलेल्या 40 हून अधिक महाविद्यालयांत टेक्नॉलॉजी आणि फार्मसीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना 24 जूनपर्यंत अर्ज घेता येतील. 28 जून रोजी होणार्‍या प्रवेशपूर्व परीक्षेनंतरच येथे प्रवेश मिळेल.

स्पर्धा

2200 (सुमारे) 25 हजार (सुमारे) 2 वर्षांचा
जागा विद्यार्थी अभ्यासक्रम
पात्रता : एमटेकच्या संबंधित विषयात बीई किंवा बीटेकची पदवी असणे गरजेचे. मास्टर आॅफ फार्मसीसाठी फार्मसीची पदवी आवश्यक. एमटेकच्या काही शाखांसाठी एमएससी केलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल.

शुल्क : सर्व महाविद्यालयात एमटेक आणि एम फार्मसीचे शुल्क हे वेगवेगळे आहे. इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग अँड मॅनेंजमेंट, कोलकाताच्या एमटेकची प्रति सेमिस्टरचे शुल्क हे 75 हजार रुपये एवढे आहे. बंगाल कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलजी, दुर्गापूर येथे अंदाजे 55 हजार रुपये एवढे शुल्क आहे.
जैन युनिव्हर्सिटीत एमटेकसाठी प्रवेश
जैन युनिव्हर्सिटी येथे मास्टर आॅफ टेक्नॉलजी या अभ्यासक्रमासाठी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना 17 जुलैपर्यंत अर्ज करता येतील. प्रवेश हा गेटच्या अधिकृत गुणांकनानुसार मिळेल. ज्या विद्यार्थ्यांनी गेट परीक्षा दिली नाही त्यांना विद्यापीठाने आयोजित केलेल्या प्रवेशपूर्व परीक्षनंतर येथे प्रवेश घेता येईल.
पात्रता : इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजी शाखेत पदवी. काही अभ्यासक्रमासाठी एमएससी पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांनाही अर्ज करता येईल.
शुल्क : जैन युनिव्हर्सिटीत एमटेकचे वार्षिक शुल्क हे अंदाजे 1 लाख रुपयांपर्यंत आहे. मणिपाल युनिव्हर्सिटी येथे एमटेक अभ्यासक्रमाचे वार्षिक शुल्क हे 1 लाख 35 हजार रुपये एवढे आहे.

बातमी
एफवाययूपीवरून डीयू आणि युजीसीमध्ये वादंग, प्रवेश प्रक्रियेवर संंशय
दिल्ली युनिव्हर्सिटीअंतर्गत चालणार्‍या अंडर ग्रॅज्युएट अभ्यासक्रमांसाठी पहिली कटआॅफ लिस्ट सोमवारी येणार असून मंगळवारपासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. मात्र, अभ्यासक्रमावरून यूजीसी आणि डीयूमध्ये वादंग निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. 20 जून रोजी यूजीसीने डीयूला 2013 मध्ये सुरू करण्यात आलेल्या चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम (एफवाययूपी) रद्द करून तो तीन वर्षांपर्यंत करण्याची सूचना केली आहे. यूजीसीने 2014-2015 पासून हा बदल करण्यची सूचना केली आहे. याबाबत डीयू 21 जून रोजी एक प्रस्ताव सादर करून यूजीसीच्या निर्णयावर पुनर्विचार करणार आहे.

विरोधाचे दोन चेहरे : एफवाययूूपी आणि यूजीसीवर बोट
एफवाययूपी
1. चार वर्षांचा यूजी अभ्यासक्रम नॅशनल पॉलिसी आॅन एज्युकेशनच्या विरोधात आहे. ज्यात 10 +2+3 बांधणीबाबत म्हटले आहे.
2. अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी देशाचे राष्ट्रपती किंवा केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयाची परवानगी आवश्यक
यूजीसी
1 . आयोगाने गेल्या वर्षी अभ्यासक्रम कसा सुरू होऊ दिला आणि एक वर्षापर्यंत आयोग गप्प का होता?
2. यंदा तीन वर्षांचा हा अभ्यासक्रम सुरू झाला, तर 2013 मध्ये अभ्यासक्रम घेतलेल्या विद्यार्थ्यांचे काय होणार?
पुढे काय ?
यूजीसीने घेतलेल्या निर्णयाबाबत डीयू पुनर्विचार करण्याची शक्यता कमीच आहे. अशा परिस्थितीत वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. यूजीसी ही एक सल्लागार संस्था आहे. मात्र, सरकारकडून मिळणारे अनुदान घेण्यासाठी संस्था यूजीसीवर अंवलबून आहेत. यूजीसीच्या निर्णयाला केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाचेदेखील समर्थन आहे. त्यामुळे डीयूला याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

50 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे काय होणार?
यूजीसीने आदेशात स्पष्ट सांगितले आहे की, गेल्या वर्षी चार वर्षांच्या यूजी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना तीन वर्षांऐवजी दोन वर्षांतच हा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल. त्यामुळे विद्यार्थ्यांना आॅनर्सचा अभ्यासक्रम हा दोन वर्षांतच पूर्ण करावा लागेल. याचे कारण म्हणजे एफवाययूपीच्याअंतर्गत त्यांना पहिल्या वर्षी फाउंडेशन अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. 50 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या यूजी अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला आहे, तर यंदा जवळपास 54 हजार जागांसाठी प्रवेश प्रकिया सुरू झाली आहे.

सर्वाधिक विद्यार्थ्यांचा अर्थशास्त्र आणि संगणक विज्ञान शाखेकडे ओढा
डीयूमध्ये यंदा अर्थशास्त्र आणि संगणक विज्ञानाच्या यूजी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रकिया ही जटिल होण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे सार्वधिक अर्ज याच अभ्यासक्रमांसाठी प्राप्त झाले आहेत. याशिवाय इतिहास, गणित, पत्रकारिता, अर्थशास्त्र आणि भाषाविषयक अभ्यासक्रमांची कटआॅफ लिस्ट सार्वधिक राहण्याची शक्यता आहे. युनिव्हर्सिटीच्या जवळपास 54 हजार जागांसाठी अर्ज करणारे 75 हजार विद्यार्थी हे सीबीएस बोर्डाचे आहेत.