आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकप्रिय करिअर: इनोव्हेशन, उत्कृष्ट उत्पन्नामुळे युवकांची पसंती अभियांत्रिकीला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशातील ८० टक्के युवकांना अभियंता होण्याची इच्छा असते. काही नवे करण्याची संधी आणि उत्कृष्ट उत्पन्नाच्या शक्यतेमुळे युवक अभियांत्रिकीकडे आकर्षित होत आहेत. मात्र, प्रतिष्ठेच्या बाबतीत वैद्यकीय क्षेत्र पहिल्या क्रमांकावर आहे. विकसित देशांमधील युवकांचा कल डॉक्टर किंवा बिझनेस लीडर होण्याकडे आहे.
८५ टक्के मुले, ७९ टक्के मुलींना व्हायचेय अभियंता
देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये अभियांत्रिकीच्या सुमारे ५० टक्के जागा रिक्त आहेत. मात्र, हे क्षेत्र अद्यापही युवकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय करिअरचा पर्याय आहे. संपूर्ण जगभरात ५५ टक्के युवकांना अभियंता व्हायचे आहे. भारतात हा आकडा ८० टक्के आहे. क्वीन एलिझाबेथ रँकिंगनुसार जगभरातील तीनपैकी दोन युवकांची पसंती अभियांत्रिकी क्षेत्राला आहे. मात्र, भारतातील ८५ टक्के मुले यात करिअर करू इच्छितात. मुलींच्या बाबतीत फरक आणखी मोठा आहे. जगभरातील इतर देशांमध्ये अर्ध्यापेक्षा कमी मुलींची अभियांत्रिकीला पसंती आहे. भारतात मात्र हा आकडा ७९ टक्के आहे.
वाचा.. कुठे-किती मुलांची अभियांत्रिकीला पसंती