आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Film, Media Education, Jwabaksprts, Associated, Question And Answer ..

दिव्य एज्युकेशन : मीडियाशी स्टडीजसंदर्भातील प्रश्नांची उत्तरे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


एज्युकेशन भास्करकडे ई-मेल आणि एसएमएसच्या माध्यमातून प्रश्नांचा ओघ सुरू आहे. आज मीडिया स्टडीजसंदर्भातील प्रश्नांची उत्तरे वाचा...
चित्रपट आणि मीडियाशी संबंधित प्रश्नोत्तरे
० मीडिया मॅनेजमेंटची पदवी आणि पदविकेमध्ये काय चांगले आहे? यामुळे नोकरीवर परिणाम होऊ शकतो?
पदवी दोन वर्षांची असते आणि पदविका एका वर्षाची असते, एवढाच फरक पदवी आणि पदविकेमध्ये आहे. नोकरीमध्ये एका वर्षाचा फरक अनुभवाच्या पातळीवर पाहिला जातो, त्यामुळे पदवीप्राप्त उमेदवाराला थोडे जास्त पॅकेज मिळते. याव्यतिरिक्त दोघांचे काम आणि जबाबदारी एकसारखी असते.
०बी.एस्सी. इलेक्ट्रॉनिक मीडिया केल्यानंतर मीडिया मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करणे चांगले की एम.एस्सी. इलेक्ट्रॉनिक मीडिया?
एमएस्सी इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि मीडिया मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदवी दोन्ही चांगले आहे. यामध्ये कोण्या एकाची निवड करणे आपल्या आवडीवर अवलंबून आहे. नोकरीच्या संधीचा विचार केल्यास मीडियामध्ये कॉर्पोरेट संस्कृतीमुळे मॅनेजमेंट क्षेत्रात खूप मोठा वाव आहे.
०अ‍ॅनिमेशनमध्ये डिप्लोमा केल्यानंतर पुढे वाव आहे का?
अ‍ॅनिमेशनमध्ये डिप्लोमा केल्यानंतर आपण टीव्ही चॅनल, प्रॉडक्शन हाऊस, स्टुडिओ, अ‍ॅड एजन्सी आदी क्षेत्रात काम करू शकता. अ‍ॅनिमेशन फिल्म्स आणि व्हिडिओ गेम्स इंडस्ट्रीमध्येही खूप वाव आहे. नॅसकॉमच्या एका अहवालानुसार भारतामध्ये अ‍ॅनिमेशन इंडस्ट्री दरवर्षी 22 टक्के दराने वाढत आहे. त्यामुळे आगामी वर्षांत या क्षेत्रात नोक-या वाढतील.
०मी फिल्म प्रॉडक्शनमध्ये बीएमसी केले आहे. प्रॉडक्शन हाऊसमध्ये इंटर्नशिप केल्यानंतर काय उपयोग होईल?
प्रॉडक्शन हाऊसमध्ये इंटर्नशिप केल्यास आपल्याला फिल्म प्रॉडक्शनच्या बेसिक्स माहीत होतील. नोकरी मिळवण्यासाठी याचा आपल्याला उपयोग होऊ शकतो.
० मीडिया स्टडीज आणि जर्नालिझमसाठी देशातील चांगल्या इन्स्टिट्यूटसंदर्भात माहिती द्या
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन जर्नालिझम ही देशातील सर्वांत चांगली संस्था मानली जाते. याव्यतिरिक्त जेव्हियर्स इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन, माखनलाल चतुर्वेदी विद्यापीठ, भोपाळ, दिल्ली विद्यापीठ, फिल्म अ‍ॅँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे, मुद्रा इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन आदी संस्थांमध्ये मीडिया स्टडीज आणि जर्नालिझमचे कोर्स आहेत.


ज्ञान
ऑस्कर विजेता आपली ट्रॉफी विकू शकत नाही
ऑस्कर विजेत्याला आपली ट्रॉफी विकता येत नाही. 1950 मधील नियमानुसार, पुरस्कार विजेता किंवा नातेवाइकाला ट्रॉफी विकायची असेल तर त्यांना अकादमीशी पहिल्यांदा संपर्क साधावा लागतो. अकादमी ती एक डॉलरमध्ये विकत घेते. 1950 मध्ये तयार केलेल्या नियमानुसार पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर विजेत्याला अकादमीशी करार करावा लागतो. त्यांनी करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिल्यास ट्रॉफी अकादमीकडेच राहते. जुन्या करंडकाचा खुल्या बाजारात कोट्यवधी डॉलरमध्ये लिलाव झाला आहे. मायकेल जॅक्सनने 1999 मध्ये जवळपास 10 लाख डॉलरमध्ये(सुमारे 52 कोटी रुपये) डेव्हिड सेल्जेनिककडून ट्रॉफी खरेदी केली होती.


रंजक
प्रसिद्ध चित्रपटांतील अपरिचित गोष्टी
० मॉन्स्टर्स इंकमध्ये में बूजवळ जी बाहुली आहे ती टॉय स्टोरीतील पात्र वूडी आहे.
० चीनच्या बोर्ड ऑफ सेन्सर्सने जेम्स बॉँडचा पहिला बॉँड पट कॅसिनो रॉयलला मंजुरी दिली.
० 101 इलमेशियन्स आणि वेंडी हे दोन डिस्ने चित्रपट आहेत, यात शेवटपर्यंत पात्रांचे आई-वडील जिवंत राहतात.
० द बर्ड्स फिल्ममध्ये टिप्पी हेनड्रेनला एका पक्ष्याने जखमी केले होते.
० अ‍ॅडॉल्फ हिटलरचा पहिला आवडता चित्रपट किंग कॉँग होता.


दिव्य मराठी एक्स्पर्ट पॅनल
आनंद प्रधान , शिक्षणतज्ज्ञ, नवी दिल्ली
अमित आहुजा, करिअर कौन्सेलर, कोटा


इंटरेस्टिंग कोट
“We journalists tell the public which way the cat is jumping. The public will take care of the cat.”
- Arthur Hays Sulzberger
वारा कोणत्या दिशेने वाहणार हे पत्रकार लोकांना सांगतो. वा-याची दिशा कशी बदलायची हे सर्वस्वी लोकांवर अवलंबून आहे.


प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा 8082005060
यावर किंवा मेल करा
education@dainikbhaskargroup.com