आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

GATE चा पॅटर्न बदलला, सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रिया होणार सुरु

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूट टेस्ट इन इंजिनिअरिंग अर्थात गेट-२०१६ ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बदलत्या पॅटर्ननुसार तयारी करावी लागणार आहे. यंदा 'गेट'च्या पद्धतीत काही बदल करण्यात आले आहेत. त्यासंबंधीच्या सूचनादेखील संकेतस्थळावर टाकण्यात आल्या आहेत. यंदा ही परीक्षा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएस) बंगळुरू यांच्या वतीने घेण्यात येणार आहे. याबरोबरच सात आयआयटी संस्थांच्या प्रवेशासाठीही ही परीक्षा होईल. तज्ज्ञांच्या मते 'गेट'चे गुण हे तीन वर्षांसाठी ग्राह्य धरले जाईल.

'गेट'मध्ये झालेल्या बदलानुसार आतापर्यंत पेट्रोलियम इंजिनिअरिंग हा विषय 'गेट'मध्ये समाविष्ट नव्हता. तो यंदापासून समायोजित करण्यात आला आहे. याबरोबरच यंदापासून गेट-२०१६ मध्ये २३ पेपर असतील. सोडवलेल्या उत्तरपत्रिकेतील मिळालेल्या गुणांवर समाधान नसल्यास विद्यार्थ्यांना आपले आक्षेप नोंदवता येतील. त्यासाठी वेगळे शुल्क आकारले जाईल. गेटच्या अभ्यासक्रमातही बदल करण्यात आले आहेत. यासंबंधीची माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे. आतापर्यंत 'गेट'मध्ये विद्यार्थ्यांना आता ऑनलाइन परीक्षेसाठी व्हर्च्युअल कॅल्क्युलेटरचा वापर करता येणार आहे.
पुढे जाणून घ्‍या... कशी असेल प्रक्रिया?