आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मि‍शन-अॅडमिशन: आयआयटीच्या प्रवेश प्रक्रियेत बदल होणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - देशभरातील नामांकित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) संस्थेत होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेत २०१७ पासून बदल करण्यात येणार आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर विद्यार्थ्यांची गुणवत्ता सिद्ध व्हावी यासाठी हे बदल केले जाणार आहेत.

आतापर्यंत या संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना (जेईई – जॉइंट एंट्रन्स एक्झाम) मेन आणि अॅडव्हान्स द्यावी लागत असे. तज्ज्ञांच्या मते, आयआयटीच्या परिसरात आंतरराष्ट्रीय स्तरावरील इंजिनिअर्स तयार व्हावेत, या दृष्टिकोनातून काही बदल करण्यात येणार आहेत.
हे बदल २०१७ पासूनच्या नव्या शैक्षणिक वर्षात होतील. त्यासाठीची तयारी सुरू करण्यात आली असून समितीदेखील नेमण्यात आली आहे. या समितीने लेखी परीक्षेचा एक प्रस्ताव दिला असून, जेईई अॅडव्हान्स परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा एक लेखी परीक्षा द्यावी लागेल. त्यानंतरच त्यांना आयआयटीमध्ये प्रवेश देण्यात येईल.

महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे; परंतु शिक्षणातील गुणवत्ता टिकवण्यासाठी आणि देशातच नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही विद्यार्थ्यांची गुणवत्ता सिद्ध व्हावी, त्यांना बाहेरील स्पर्धेत टिकता यावे यासाठी हे बदल करण्यात येणार आहेत, असेही तज्ज्ञांनी सांगितले.

पुढे वाचा, अाॅक्टोबरमध्ये अंतिम निर्णय