आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IIT Kharagpur Invites Applications For The Joint Masters And Ph.D Programme

आयआयटी खरगपूरच्या मास्टर्स कोर्समध्ये प्रवेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रवेश सूचना
आयआयटी खरगपूरच्या
मास्टर्स कोर्समध्ये प्रवेश
खरगपूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये जॉइंट मास्टर्स आणि पीएचडी कोर्समध्ये प्रवेश प्रक्रिया 2 एप्रिलपासून सुरू झाली आहे. विद्यार्थी यासाठी 23 एप्रिलपर्यंत अर्ज करू शकतात. पाठ्यक्रमानुसार विद्यार्थ्यांना पहिल्यांदा टेक्नॉलॉजी आणि सिटी प्लॅनिंगच्या मास्टर्स कोर्समध्ये प्रवेश मिळेल. एक वर्ष पूर्ण झाल्यावर ते पीएचडी कोर्समध्ये प्रवेश घेऊ शकतात. मात्र, त्यासाठी त्यांचे सीजीपीए 8.0 पेक्षा जास्त असावे. एमटेकच्या काही शाखांमध्ये विद्यार्थ्यांना थेट गेट स्कोअरच्या आधारे प्रवेश मिळेल. काही शाखांसाठी मुलाखत देणे आवश्यक असेल. अशा कोर्सेसमध्ये प्रवेशासाठी 70 टक्के महत्त्व गेट स्कोअर आणि 30 टक्के मुलाखतीला दिले जाईल.
स्पर्धा
निश्चित नाही 15 हजार जवळपास 2 वर्षे
एकूण जागा अर्जदार कोर्स मुदत
पात्रता
60 टक्के गुणांसह अभियांत्रिकी, टेक्नॉलॉजी किंवा आर्किटेक्चरमध्ये पदवी किंवा विज्ञान शाखेत पदव्युत्तर पदवी. याव्यतिरिक्त गेटचा वैध स्कोअर. मास्टर ऑफ सिटी प्लॅनिंग कोर्ससाठी आर्ट्समध्ये पदव्युत्तर पदवी आणि यूजीसी-नेट पात्र विद्यार्थी अर्ज करू शकतात. एससी/एसटी विद्यार्थ्यांसाठी 55 टक्के गुण आवश्यक. या वर्षी शेवटच्या वर्षाची परीक्षा देणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात, मात्र ते 31 ऑक्टोबर 2014 पूर्वी पदवीप्राप्त असावेत.
शुल्क आणि विद्यावेतन
आयआयटी खरगपूरमध्ये एमटेक कोर्सचे प्रति सेमिस्टर शुल्क 5 हजार रुपये आहे. प्रवेशावेळी विद्यार्थ्यांना पहिल्या सेमिस्टरसाठी जवळपास 19 हजार रुपये शुल्क द्यावे लागेल. याव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना दरमहा 8 हजार रुपये विद्यावेतन मिळेल. आयआयटी कानपूरमध्ये एमटेक कोर्सची प्रति सेमिस्टर ट्यूशन फीस जवळपास 16 हजार 500 रुपये आहे.
दिल्ली विद्यापीठात नॅनो सायन्स आणि नॅनो टेक्नॉलॉजीच्या मास्टर्स कोर्समध्ये प्रवेश
दिल्ली विद्यापीठामध्ये नॅनो सायन्स आणि नॅनो टेक्नॉलॉजीच्या एमटेक कोर्समध्ये प्रवेशासाठी विद्यार्थी 18 एप्रिलपर्यंत अर्ज करू शकतात. तीन वर्षे मुदतीच्या या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना मुलाखतीच्या आधारे प्रवेश मिळेल. मुलाखत 15 जुलै रोजी होईल.
स्पर्धा
15 2 हजार(जवळपास) 3 वर्षे
एकूण जागा अर्जदार कोर्स मुदत
पात्रता
60 टक्के गुणांसह फिजिक्स किंवा केमिस्ट्रीमध्ये पदवी. एससी/एसटी विद्यार्थ्यांसाठी ही अट 55 टक्के. याव्यतिरिक्त आयआयटीची संयुक्त प्रवेश परीक्षा तसेच दिल्ली विद्यापीठाची एमएस्सी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण असावे. पदवी कोर्समध्ये कमीत कमी एक वर्ष गणित विषय असावा.
शुल्क
दिल्ली विद्यापीठात या कोर्सचे एकूण शुल्क जवळपास 30 हजार रुपये आहे. दिल्ली तंत्रज्ञान विद्यापीठात नॅनो टेक्नॉलॉजीच्या एमटेक कोर्सचे शुल्क जवळपास 1 लाख 50 हजार रुपये आणि एसआरएम विद्यापीठात जवळपास 3 लाख रुपये आहे.
निकाल : 18 जुलै 2014
सीएमसी, लुधियानाच्या एमबीबीएस कोर्ससाठी प्रवेश
ख्रिश्चन मेडिकल कॉलेज, लुधियानामध्ये एमबीबीएस अभ्यासक्रमातील प्रवेशाची प्रक्रिया 31 मार्चपासून सुरू झाली आहे. विद्यार्थी त्यासाठी 14 मेपर्यंत अर्ज करू शकतात. त्यासाठी प्रवेश परीक्षा 28 मे रोजी होईल. चाचणीत भौतिक, रसायन, जीवशास्त्रात किमान 50 टक्के गुण संपादन करणार्‍या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकेल.