आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • JEE Advance 2013 Result: Process For IIT Admission

जेईई अ‍ॅडव्हान्स-2013 निकाल: आयआयटीमध्ये प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेच्या निकालानंतर देशातील सर्व आयआयटी आणि आयएसएम धनबादमध्ये प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. ऑनलाइन समुपदेशन प्रक्रियेत 9 हजार 885 जागा भरण्यात आल्या आहेत. समुपदेशन सामायिक गुणवत्ता यादीवरून केले जाईल.


ऑनलाइन समुपदेशन
आयआयटीने जेईई-अ‍ॅडव्हान्स पोर्टलवर ऑनलाइन समुपदेशन सुरू केले आहे. समुपदेशनासाठी शॉर्टलिस्ट झालेल्या विद्यार्थ्यांना जेईई-अ‍ॅडव्हान्सच्या पोर्टलवर श्रेणीनुसार पर्याय निवडता येईल. 30 जून सायंकाळी 5 वाजेपर्यंत अंतिम पर्याय निश्चित करावा लागेल.


ऑनलाइन समुपदेशन
आयआयटीने जेईई-अ‍ॅडव्हान्स पोर्टलवर ऑनलाइन समुपदेशन सुरू केले आहे. समुपदेशनासाठी शॉर्टलिस्ट झालेल्या विद्यार्थ्यांना जेईई-अ‍ॅडव्हान्सच्या पोर्टलवर श्रेणीनुसार पर्याय निवडता येईल. 30 जून सायंकाळी 5 वाजेपर्यंत अंतिम पर्याय निश्चित करावा लागेल.


सामायिक गुणवत्ता यादी
आयआयटीच्या एकूण 9 हजार 885 जागांसाठी सुमारे दीडपट म्हणजे 15 हजार 947 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. सर्वसाधारण गटात एक गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात जेईई-अ‍ॅडव्हान्स परीक्षेत 156 हून (43.33 टक्के) अधिक गुण संपादन करणारे 7 हजार 436 विद्यार्थी सर्वसाधारण वर्गातील 4 हजार 835 जागांसाठी समुपदेशन प्रक्रियेत सहभागी होऊ शकतील. ओबीसी, एससी, एसटी वर्गवारीतील गुणवत्ता यादी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.


यंदा 238 जागा अधिक
सर्व आयआयटी व आयएसएम धनबादमध्ये बीटेक अभ्यासक्रमासाठी एकूण जागा 9 हजार 647 हून 9 हजार 885 एवढ्या वाढवण्यात आल्या आहेत. त्यात सर्वसाधारण गटात 4, 835, ओबीसी (नॉन क्रिमीलेअर) 2,599, एससी-1,437, एसटी-721 जागा आहेत. सर्व वर्गातील अपंगांसाठी 284, सर्वाधिक 1, 341 एवढ्या जागा आयआयटी खरगपूरमध्ये आहेत.


श्रेणीनुसार पर्याय असू शकतो
श्रेणी पर्याय
1-1000 महाविद्यालय व शाखेच्या निवडीमध्ये बी टेक व एम टेक ड्यूअल अभ्यासक्रमासाठी पर्याय निवडणे योग्य
1000-2000 जुन्या आयआयटीमध्ये कोअर व रिसर्च शाखेसारख्या सिव्हिल, एरोस्पेसचा पर्याय निवडू शकता.
2000-3500 आयटी बीएचयू आणि रुडकीसोबत इंदुर, गांधीनगर आणि हैदराबादच्या नवीन आयआयटीचा पर्याय निवडता येऊ शकतो.
3500-5000 नवीन आयआयटीमध्ये मुख्य शाखेसोबत नवीन सुरू झालेल्या बायोटेक्नॉलॉजी सारख्या शाखांचा पर्याय आहे.
5000-7000 आयएसएम धनबाद आणि रूडकीमध्ये मायनिंग, पेपर टेक्नॉलॉजी, उपयोजित गणित, जिओसायन्स सारख्या शाखांचा पर्याय आहे.


आयआयटी फीस फॅक्ट्स
1953 मध्ये केवळ 500 रुपये फीस
1953 मध्ये आयआयटी संस्थेची वार्षिक फीस केवळ 500 रुपये होती. 2008 मध्ये फीस 25 हजाराहून वाढून 50 हजार रुपये करण्यात आली. आता आयआयटीच्या प्रत्येक विद्यार्थ्यावर वार्षिक 2 लाख रुपये खर्च होतो. उर्वरित रक्कम केंद्र सरकार भरते. आयआयटीने 2013 पासून बी-टेकची अध्यापन शुल्क 50 हजारांहून वाढून 90 हजारांवर पोहचले आहे. सर्वसाधारण विभागात विद्यार्थ्यांना आता गेल्या वर्षीपेक्षा 80 टक्के अधिक शुल्क भरावे लागणार आहे. ओबीसी, एससी किंवा एसटी वर्गाला ही लागू राहणार नाही.


आघाडीच्या 10 संस्थांची फी लाखांत
जगातील अव्वल 10 तंत्रज्ञान संस्थांची वार्षिक अध्यापन शुल्क 20 ते 25 लाख रुपये असेल. मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये (एमआयटी) वार्षिक शुल्क 22.55 लाख रुपये आहे. अमेरिकेतील कॉर्नेगी मेलॉन इन्स्टिट्यूटचे वार्षिक शुल्क 24.23 लाख रुपये आहे. स्टॅनफोर्ड विद्यापीठात बी टेक अभ्यासक्रमासाठी वार्षिक शुल्क सुमारे 21.86 लाख रुपये आहे.


तीन नव्या आयआयटी, जुन्यांना इमारत नाही
सरकारने 2008 मध्ये नव्या आठ आयआयटीची स्थापना केली. 2013 मध्ये तीन नव्या आयआयटी- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ माइन्स, धनबाद, आयआयटी पलक्कड(केरळ) आणि युनिव्हर्सिटी विश्वेश्वरय्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कर्नाटक सुरू होतील. आठ आयआयटींसाठी 6,080 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली होती. केंद्रीय मंत्रिमंडळाने यानंतर 760 कोटी रुपये अतिरिक्त निधीची तरतूद केली . मात्र, सुमारे 840 कोटी रुपयांची आणखी आवश्यकता आहे. सर्व आठ आयआयटींना कायमस्वरूपी इमारती नाहीत.


43 टक्के फॅकल्टीची कमतरता
नव्या आयआयटीमध्ये जागा वाढल्या, मात्र आयआयटीला सध्या अनुभवी प्रोफेसर मिळत नाहीत. आयआयटीतील 5,356 पदांना मंजुरी देण्यात आली, मात्र केवळ 3,158 प्रोफेसर नियमित फॅकल्टी म्हणून कार्यरत आहेत. उर्वरित तासिका गेस्ट फॅकल्टीद्वारे घेतल्या जात आहेत.


संस्था पद रिक्त
जुन्या आयआयटी 2198 41%
नव्या आयआयटी 410 57%
एकूण रिक्त पदे 2608 43%


दिव्य मराठी एक्स्पर्ट पॅनल
पायाभूत सुविधेअभावी आयआयटी सुरू केल्यामुळे शिक्षणाच्या दर्जावर त्याचा निश्चित परिणाम होईल. सरकारने नव्या आयआयटीची घोषणा करण्यापूर्वी आवश्यक साधनसामग्रीचा विचार करायला हवा होता, अन्यथा आयआयटीसारख्या जागतिक संस्थेची ‘ब्रॅँड व्हॅल्यू’ कमी होईल.
जितिन चावला, करिअर कौन्सिलर,
नवी दिल्ली

गुणवत्ता यादीत 1 ते 1000 पर्यंत रॅँक असणाºया विद्यार्थ्यांसाठी कॉलेज व शाखेच्या निवडीमध्ये बीटेक व एमटेक ड्युअल कोर्सचा पर्याय चांगला ठरू शकतो. 2000 पर्यंत रॅँकिंग असणारे विद्यार्थी जुन्या आयआयटीमध्ये कोअर व रिसर्च ब्रॅँच, उदाहरणार्थ सिव्हिल, एअरोस्पेस आदींचा पर्याय निवडू शकतील.
अमित आहुजा
करिअर, कौन्सिलर, कोटा


प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 यावर
किंवा मेल करा education@dainikbhaskargroup.com