आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेईई अ‍ॅडव्हान्सचा निकाल: आयआयटी जेईई निकालाचे विश्लेषण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवीन पॅटर्नअंतर्गत झालेल्या जेईई परीक्षेचा निकाल 21 जूनला जाहीर झाला. जेईई मुख्य परीक्षेच्या आधारे 1.5 लाख विद्यार्थी अ‍ॅडव्हान्ससाठी पात्र ठरले होते. यातील 21 हजार 115 विद्यार्थ्यांची 9 हजार 885 जागांसाठी निवड झाली आहे. एज्युकेशन तज्ज्ञांच्या मदतीने जाणून घेऊया निकालाचा ट्रेंड, अर्थ व इतर पैलू.


आयआयटीकडून 3 पातळ्यांवर टॅलेंटचे परीक्षण
यंदाच्या वर्षी आयआयटी प्रवेशासाठी वेगवेगळ्या परीक्षांऐवजी सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यात आली. दोन टप्प्यांत एआयईईई आणि आयआयटी-जेईई यांना मिळून ही परीक्षा झाली. 7 एप्रिलला जेईई प्रमुखमध्ये 12.50 लाख विद्यार्थी सहभागी झाले होते. आयआयटी प्रवेश परीक्षेत एवढ्या मोठ्या संख्येने पहिल्यांदाच विद्यार्थी बसले होते. यातील आघाडीचे 1.50 लाख जेईई-अ‍ॅडव्हान्ससाठी पात्र ठरले. 2 जूनच्या जेईई-अ‍ॅडव्हान्स परीक्षेत 1.26 लाख विद्यार्थ्यांनी पेपर दिला होता.


एका जागेसाठी 125 विद्यार्थी
आयआयटीने निवडीसाठी पहिल्यांदाच तीन पातळ्यांवर चाळणी लावली होती. पहिले-जेईई मुख्य उत्तीर्ण होणे, दुसरे-12 वी मंडळात टॉप-20 पर्सेंटाइल यादीत समावेश, तिसरे-अ‍ॅडव्हान्समध्ये चांगले गुण. जेईई मुख्य परीक्षेत आयआयटीच्या 9 हजार 885 जागांसाठी 12.50 लाख विद्यार्थ्यांनी भाग्य आजमावले. अर्थात पहिल्या टप्प्यात एका जागेसाठी 125 विद्यार्थ्यांत मुकाबला होता. अंतिम फेरीत 1.26 लाखातून सुमारे 15 हजार समुपदेशनासाठी पात्र ठरले.


पहिल्या परीक्षेपेक्षा अधिक कठीण
आयआयटीने अ‍ॅडव्हान्स चाचणीचा स्तर आपल्या दर्जानुसार वाढवला आहे. 360 गुणांच्या दोन पेपरमध्ये संकल्पना आणि विश्लेषणात्मक अशा स्वरूपाचे प्रश्न विचारून विद्यार्थ्यांचे कौशल्य जोखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. वास्तविक गुणदान पद्धतीत काही प्रमाणात बदल झाला आहे. आतापर्यंत ज्या क्षेत्रासाठी निगेटिव्ह गुण दिले जात होते, त्या क्षेत्रात निगेटिव्ह गुणे दिले गेले आहेत.
ट्रेंड्स
कट ऑफ
सर्वसाधारण

35.0%

ओबीसी
31.5%
एससी
17.5%
एसटी
17.5%
परीक्षेच्या पद्धतीत बदल झाला असला तरी कट ऑफ टक्केवारीत काहीही बदल नाही. अ‍ॅग्रिगेट गुणांनुसार गेल्या वर्षी आयआयटीचे कट ऑफ 143 होते. आता ते वाढून 156 वर पोहोचले आहे.


पहिल्यांदा टॉप-10 मध्ये मुली
आयआयटी प्रवेश परीक्षेत पहिल्यांदाच टॉप-10 मध्ये दोन विद्यार्थिनींनी स्थान पटकावले आहे. त्यात मध्य प्रदेशातील अदिती लढ्ढा सहावी, तिरुपतीची सिब्बला लीना माधुरी आठव्या स्थानी आहे. 2 हजार 392 विद्यार्थिनींपैकी 1500 जणींना समुपदेशनासाठी बोलावण्यात येईल.


सर्वसाधारण वर्गात सर्वात पुढे चेन्नई विभाग
आयआयटीमध्ये चेन्नई विभागाने 36 कॅटेगरी विद्यार्थ्यांत अव्वल 100 मध्ये बाजी मारली आहे. त्यानंतर आयआयटी मुंबई विभागाचे 25 विद्यार्थी आहेत. आयआयटी -दिल्ली विभागाचे 17 विद्यार्थी आणि कानपूर विभागाचे 6 विद्यार्थी आहेत.


13 वर्षांचा सत्यम सर्वात
कमी वयाचा पात्र विद्यार्थी
बिहारचा सत्यमकुमार याने केवळ 13 व्या वर्षी आयआयटी परीक्षेत यश मिळवले होते. त्याने 12 व्या वर्षी बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली होती. यंदा त्याला आयआयटीची 679 अशी ऑल इंडिया रँकिंग मिळाली आहे. सत्यमने गेल्या वर्षीदेखील या परीक्षेत यश संपादन केले होते. त्या वेळी त्याला 8, 137 श्रेणी मिळाली होती. आपल्या श्रेणीत वाढ व्हावी, यासाठी त्याने यंदा पुन्हा परीक्षा दिली. परीक्षा देण्यासाठी त्यास सीबीएसईकडून परवानगी घ्यावी लागली होती. गेल्या वर्षी सत्यमने दिल्लीच्या 14 वर्षीय कौशिकचा आयआयटी उत्तीर्ण होण्याचा विक्रम मोडला होता. या वर्षी त्याने पुन्हा त्यात सुधारणा केली.


दिव्य एज्युकेशन तज्ज्ञ
‘‘अव्वल-1.5 लाख विद्यार्थ्यांना पात्र ठरवून उर्वरित विद्यार्थ्यांनी ड्रॉप न घेता इतर इंजिनिअरिंग महाविद्यालयात प्रवेश घ्यावा, असा संदेश या माध्यमातून मिळाला आहे. खरे तर नवीन पद्धतीचा परिणाम जे विद्यार्थी उत्तीर्ण होऊन चार वर्षांनंतर बाहेर पडतील, तेव्हाच दिसून येईल.’’
डॉ. विवेक विजयवर्गीय
आयआयटी, जोधपूर.


‘‘आयआयटीच्या परीक्षा पद्धतीमध्ये बदल अगोदरही झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या ज्ञान, सर्जनशीलता आणि नवीन परिस्थितीत विचार करण्याच्या पद्धतीला जोखण्यासाठी पद्धतीत असे बदल केले जातात. खरे तर नवीन पद्धतीबद्दलही प्रश्न निर्माण झाले होते. म्हणूनच पुढेही अनेक बदल होतील.’’
आर.के.
वर्मा एमडी, रॅजोनेन्स, कोटा.
प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 यावर
किंवा मेल करा education@dainikbhaskargroup.com