आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेईई मेन - 2014 निकाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेईई मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर होताच देशात अभियांत्रिकी महाविद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. साधारण 13 लाख 57 हजार विद्यार्थ्यांनी या वर्षी जेईई-मेन परीक्षा दिली होती. 2013 च्या तुलनेत हे प्रमाण जवळपास 6.5 टक्के जास्त होते. यामध्ये 1.5 लाख विद्यार्थी जेईई-अ‍ॅडव्हान्स देतील. दिव्य एज्युकेशनने तज्ज्ञांच्या मदतीने या निकालातील ट्रेेंड आणि अन्य पैलू जाणून घेतले.
7 जुलै रोजी सामायिक गुणवत्ता यादी
जेईई- मेन आणि बारावीच्या गुणांच्या आधारे 7 जुलै रोजी कॉमन मेरिट लिस्ट प्रसिद्ध केली जाईल. यामध्ये 60 टक्के महत्त्व जेईई- मेनच्या स्कोअरला, तर 40 टक्के महत्त्व बारावीच्या गुणांना दिले जाईल. याच आधारे विद्यार्थ्यांना एनआयटी, ट्रिपल आयटी आणि केंद्र तसेच राज्य सरकारांकडून आर्थिक मदत प्राप्त संस्थांमध्ये प्रवेश मिळेल. या वर्षी एनआयटी संस्थांमध्ये जवळपास 15 हजार 500, ट्रिपल आयटीमध्ये 850 आणि जवळपास 15 हजार जागा खासगी संस्थांमध्ये आहेत. याव्यतिरिक्त आयआयटी संस्थांमध्ये जवळपास 10 हजार जागा आहेत.
ट्रेंड्स
कट ऑफ
सामान्य ओबीसी एससी एसटी
115 74 53 47

केमिस्ट्रीमध्ये जास्त स्कोअर, मॅथ्स-फिजिक्समध्ये सरासरी
प्राथमिक माहितीनुसार या वर्षी जेईई-मेनमध्ये विद्यार्थ्यांनी केमिस्ट्रीमध्ये जास्त स्कोअर केला. फिजिक्स आणि मॅथ्समध्ये सरासरी स्कोअर राहिला. केमिस्ट्रीचा पेपर अपेक्षेपेक्षा सोपा होता आणि त्यामध्ये चुकाही नव्हत्या. फिजिक्स आणि मॅथ्सच्या पेपरमध्ये एक-दोन चुका होत्या.
सामान्य ज्ञानाचे प्रश्न नसल्यामुळे

स्कोअरिंग जास्त
2013 च्या तुलनेत 2014 मध्ये सामायिक गुणवत्ता यादीचे कट ऑफ जास्त होते. गेल्यावर्षी हे 113 तर यावर्षी ते 115 होते. वेगवेगळ्या वर्गातील कट ऑफ गेल्यावर्षीच्या तुलनेत जास्त आहे. सरासरी स्कोअरिंग जास्त असल्यामुळे कट ऑफमध्ये वाढ झाली. या वेळच्या परीक्षेत जनरल सायंटिफिक अवेरनेसशी संबंधित प्रश्न विचारले नव्हते.

9 मेपर्यंत अ‍ॅडव्हान्ससाठी नोंदणी
मेन्स निकालाच्या आधारे 4 ते 9 मेपर्यंत जेईई-अ‍ॅडव्हान्ससाठी नोंदणी करू शकता. परीक्षा 25 मे रोजी होईल. 19 जून रोजी निकाल लागल्यानंतर सर्व आयआयटी आणि आयएसएम धनबादमध्ये प्रवेशासाठी कौन्सिलिंग प्रक्रिया सुरू होईल.

दोन वर्षांपर्यंत जेईई-मेनचे गुण वैध
जेईई-मेनचे गुण दोन वर्षांपर्यंत वैध असतात. अर्थात जे विद्यार्थी जेईई-अ‍ॅडव्हान्ससाठी निवडले गेले आहेत, ते यंदा किंवा पुढील वर्षी परीक्षा देऊ शकतील.
भास्कर तज्ज्ञ समिती
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गुणवत्तेच्या दृष्टीने मेनचा निकाल चांगला राहिला. स्पर्धा अधिक असल्यामुळे गुण देखील जास्त होते. म्हणून अ‍ॅडव्हान्समध्ये स्पर्धा अधिक होण्याची शक्यता आहे.
-प्रो. विवेक विजयवर्गीय, आयआयटी, जोधपूर.
मेनमध्ये 300 पेक्षा जास्त गुण संपादन करणारे विद्यार्थी अ‍ॅडव्हान्सच्या अव्वल विद्यार्थ्यांमध्ये सामील होऊ शकतात. जे विद्यार्थी अ‍ॅडव्हान्ससाठी पात्र नसतील. तसे विद्यार्थी इतर पर्याय शोधू शकतील.
-बृजेश माहेश्वरी, कोटा.

आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी बनवला मेसेज ट्रान्सलेट करणारा स्मार्टफोन
आयआयटीच्या तीन माजी विद्यार्थ्यांनी संदेशाचे भाषांतर करणारा स्मार्टफोन तयार केला आहे. एका कंपनीच्या प्रकल्पांतर्गत त्याची निर्मिती करण्यात आली. त्याच्या व्हर्च्युअल की-बोर्डमध्ये 48 की आहेत. भारतीय प्रादेशिक भाषेच्या मुळाक्षरांशी जुळणारे डिझाइन या माध्यमातून तयार करण्यात आले आहे. राकेश देशमुख, आकाश डोंगरे, सुधीर बांगरमबंडी यांनी त्याचे पेटंट मिळवले आहे. स्मार्टफोनचे पहिले उत्पादन गुजराती भाषेसाठी असेल. लवकरच ते बाजारात उपलब्ध होईल. त्याची किंमत सहा हजार रुपये असेल. जूनमध्ये हिंदी आणि मराठी असणारे स्मार्टफोनही येतील. स्मार्टफोनमध्ये मेसेजला भाषांतरीत करण्यासाठी स्क्रीनला केवळ एकदा स्वाइप करावे लागेल.
आयआयटीयनवर स्पर्श जाणणार्‍या रोबोटच्या निर्मितीची जबाबदारी
स्पर्शाची जाणीव होणार्‍या रोबोटच्या निर्मितीची जबाबदारी डॉ. रविंदर दाहिया यांना मिळाली आहे. ते आयआयटी दिल्लीत माजी प्राध्यापक आहेत. सध्या ते ग्लासगो विद्यापीठात इलेक्ट्रॉनिक आणि नॅनोस्केल इंजिनिअरिंगचे वरिष्ठ प्राध्यापक आहेत. दाहिया फ्लेक्झिबल इलेक्ट्रॉनिक्सचे तज्ज्ञ आहेत. ते संगणक व टॅब्लेटसाठी लवचिक स्क्रीन तयार करण्यासाठी देखील संशोधन करत आहेत. रोबोटसाठी त्यांना 10 लाख पौैंड एवढा निधी मिळाला आहे.