आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेत नोकऱ्यांची मोठी संधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साधारणत: १३.३४ लाख कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने रेल्वे देशातील सर्वात मोठा नियोक्ता (रोजगार देणारा-नियुक्ती देणारा) आहे. एवढेच नव्हे तर जगातील उर्वरित नियोक्त्यांच्या यादीतही हा विभाग समाविष्ट आहे. गेल्या वर्षी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या संशोधनविश्वात जगभरातील सर्वोच्च रोजगार देणाऱ्यांच्या यादीत भारतीय रेल्वे जवळपास १४ लाख कर्मचाऱ्यांसह आठव्या स्थानावर आढळली आहे. २०१० च्या फॉर्च्युन व द इकॉनॉमिस्टच्या अहवालातही भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठ्या नियोक्त्यांच्या सूचित आठव्या स्थानावर होती.
देशातील लोकप्रिय नियोक्ता रेल्वे
भारतीय रेल्वेने आतापर्यंत लांब प्रवास निश्चित केला आहे. अमेरिका, चीन आणि रशियासह भारतही सर्वात मोठ्या रेल्वे जाळे असलेल्या प्रमुख देशांत समाविष्ट आहे. अशातच आय रेल्वेज : टार्निंग दि कॉर्नर, नावाचा अहवाल सांगतो आहे की, सरकारी प्रयत्न सुरू असताना पुढील दशकात भारतीय रेल्वे आर्थिक निकषांवर पुढील ग्रोथ इंजिनाच्या स्वरूपात उभारून येईल. इकॉनॉमीत महत्त्वपूर्ण योगदान देण्यासहच रोजगार निर्मितीत अव्वल असणारा हा उपक्रम सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांमध्ये खूपच लोकप्रिय पर्याय आहे. गेल्या वर्षी प्रथमच जेव्हा भारतीय रेल्वेने सीनियर सेक्शन इंजिनिअर्स व ज्युनियर इंजिनिअर्सच्या ३,२७३ रिक्त जागांसाठी ऑनलाइन परीक्षा आयोजित केली तेव्हा जवळपास १८ लाख उमेदवारांनी अर्ज केला. एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या या अर्जांचा हा आकडा या क्षेत्राची लोकप्रियताच दाखवत आहे.
१० ते उच्च पात्रतेसाठीही आहेत संधी
लाखो कर्मचारी आणि ७६,२४२ कोटींचा कामाचा मोबदला(बिले) वर्ष २०१४ सह भारतीय रेल्वे देशातील सर्वात मोठ्या नियोक्त्यांमध्ये समाविष्ट आहे.एकूण कर्मचाऱ्यांमध्ये १७,१०० अधिकारी आहेत, ज्यात २,५९७ डॉक्टरांचा समावेश आहे. याशिवाय पॅरामेडिकल व सुरक्षा विभाग सोडून एकूण रेल्वे कर्मचाऱ्यांची संख्या १२.२ लाख आहे. जगातील हे सर्वात मोठा सिव्हिलियन एम्पायर (नागरी रोजगार देणारी) मानले जाते ही भारतीय रेल्वेसाठी सर्वात चांगली गोष्ट आहे. कमीत कमी पात्रता दहावीपासून सुरू होते आणि उच्च योग्यता-पात्रता असणारी अधिकारी पदेदेखील इथे उपलब्ध आहेत. अशातच आपण आपल्या क्षमतेअनुसार स्वत:ला विकसित करू शकता.
व्यावसायिक वाढीच्या संधी
दरवर्षी रेल्वे मोठ्या प्रमाणात नोकरभरती करत असते. एकट्या २०१२-२०१३ मध्ये रेल्वेने अतिरिक्त १५६,००० कर्मचाऱ्यांची भरती केली, ज्यात ८,५०० (ग्रुप ए) अधिकाऱ्यांचा समावेश होता. व्यावसायिक वाढीसाठीही इथे उत्तम संधी आहेत. १९८० च्या दशकादरम्यान रेल्वेने आपले प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केले होते आणि आज अधिकाऱ्यांसाठी ७ ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यासाठी उपलब्ध आहेत. याशिवाय नॉन गॅझेटेड स्टाफसाठी २७० हून अधिक प्रशिक्षण केंद्रे आहेत. दरवर्षी जवळपास ३२०,००० स्टाफ मेंबर्स आणि ७५०० अधिकाऱ्यांना प्रशिक्षित केले जाते. याशिवाय दरवर्षी जवळपास एक लाख कर्मचारी रिफ्रेशर कोर्ससाठी घेतले जातात.

आयआयटी, आयआयएमपासून परदेशातही प्रशिक्षण
भारतीय रेल्वेत सात केंद्रिकृत प्रशिक्षण इन्स्टिट्यूट (सीटीआय) आहेत. तथापि, सहा इतर सीटीआय मुख्य स्वरूपात विशिष्ट क्षेत्राच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देत आहे. अधिकाऱ्यांसाठी वेगवेगळ्या पातळीवर भारतीय रेल्वे अनेक उत्तमोत्तम प्रशिक्षण कार्यक्रम उपलब्ध करून देते. जिथे आयआयटी, आयआयएमपासून ते प्रतिष्ठित परदेशी संस्थांमधून उत्तम प्रशिक्षण मिळवले जाऊ शकते. याअंतर्गत १ ते २ वर्षांच्या सेवेनंतर सीटीआयमध्ये प्रोबेशनरी ट्रेनिंगपासून अनुभवातील वाढीनंतर परदेशातील संस्थांमध्ये प्रशिक्षण उपलब्ध केले जाते. उदाहरणार्थ १२ वर्षांपर्यंतच्या अनुभवी कर्मचाऱ्यांना संबंधित सीटीआयमध्ये पाठवले जाते.

१५-१८ वर्षांच्या अनुभवींना एनएआयआर, वडोदरा येथे पाठवले जाते. त्यानंतर सिंगापूरच्या प्रतिष्ठित बिझनेस स्कूल इन्सीड आणि क्वालालंपूरमध्ये नेतृत्वगुण प्रशिक्षण केंद्र आयसीएलआयएफमध्ये प्रशिक्षण दिले जाते. उपप्रादेशिक व्यवस्थापक पातळीवर पोहोचणाऱ्यांना पॅरिसच्या बिझनेस स्कूल एचईमध्ये पाठवले जाते. विविध पद्धतीच्या गुणवत्तेला सुपोषित करण्याचा पर्यायदेखील इथे उपलब्ध आहे. फिल्म मेकिंगमध्ये आवड असणारे उमेदवार रेल्वेवर माहितीपट तयार करू शकतात. संशोधक वृत्ती असेल तर लखनऊस्थित रिसर्च डिझाइन अँड स्टँडडर्स ऑर्गनायझेशनशी जोडले जाऊ शकते.

कमतरता आहे पात्र कर्मचाऱ्यांची
रेल्वे विभाग कर्मचाऱ्यांच्या कमतरतेतूनही जात आहे. २०१२ च्या सरकारी आकड्यांनुसार या वर्षी रेल्वेत २.१ लाख पदे रिक्त आढळली आहेत. त्यात सुरक्षा विभागातील पदांसह कार्यशाळा, व्यावसायिक विभाग, पॅरामेडिकल व कार्यालयीन स्टाफमध्ये मोठ्या संख्येने रिक्त पदे होती. सातव्या वेतन आयोगाच्या अहवालानुसार जानेवारी २०१४ पर्यंत २३५,५२७ रिक्त जागांसह रेल्वे मंत्रालयात मनुष्यबळाची १५ टक्के कमतरता आढळून आली.
उत्कृष्ट शिक्षणाकडे
रेल्वेचे शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या दिशेने अनेक संस्था कार्यरत आहेत. पण आता देशातील पहिले रेल्वे विद्यापीठ गुजरातमध्ये स्थापन होईल. जिथे बीटेक व एमटेक कोर्सेस उपलब्ध असतील. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठीही रेल्वे सातत्याने प्रयत्नरत आहे. इनहाऊस रिसर्चसाठी भारतीय रेल्वे एक विशेष युनिट तयार करत आहे. विशेष रेल्वे एस्टॅब्लिशमेंट फॉर स्ट्रॅटेजिक टेक्नॉलॉजी अँड हॉलिस्टिक अॅडव्हान्समेंट नावाच्या या तुकडीत अधिकांश संशोधक व रेल्वे विशेषज्ञ सहभागी होतील. रेल्वेची वर्तमान रिसर्च शाखा आरडीएसओ फक्त दैनंदिन मुद्द्यांवरच लक्ष केंद्रित करेल, त्याचप्रमाणे रेल्वे कार्यप्रणालीच्या गुणवत्तेसाठी दीर्घकाळाच्या संशोधनावर काम करेल.