आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MI CAT 2014 : Mudra Institute Of Communication Entrance

एमआय - कॅट 2014 : मुद्रा इंस्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशमध्ये प्रवेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबादच्या मुद्रा इंस्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशनच्या(माइका) पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा इन मॅनेजमेंटमध्ये(कम्युनिकेशन) प्रवेशासाठी विद्यार्थी आता अर्ज करु शकतील. यासाठी मुद्रा इंस्टिट्यूट कॉमन अ‍ॅडिमिशन टेस्ट(एमआय-कॅट) फेब्रुवारी-मार्चमध्ये होईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2014 आहे. या कोर्ससाठी 180 जागा आहेत.


पात्रता
कोणत्याही शाखेच्या पदवी परीक्षेत 50 टक्के गुण आवश्यक. कॅट्र जॅट्र मॅट्र, सीमॅट, एमटीएमए आणि जीमॅटच्या स्कोअरच्या आधारे प्रवेश घेता येईल.


शुल्क : कोर्सची ट्यूशन, निवास आणि खाण्यापिण्याचा एकूण खर्च सुमारे 12.5 लाख रुपये. देशातील खासगी संस्था- सिंबॉयोसिस इंस्टिट्यूट ऑफ मीडिया अ‍ॅँड कम्युनिकेशन, पुण्यात या कोर्सचे वार्षिक शुल्क 4.81 लाख रुपये.


निवड प्रक्रिया
एमआय-कॅट स्कोअरच्या आधारे विद्यार्थ्यांना ग्रुप डिस्कक्शन आणि वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल. यानंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार केली जाईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कोर्सच्या दुस-या वर्षी ब्रॅँड मॅनजमेंट, अकाउंट प्लॅनिंग, मार्केटिंग रिसर्च, मीडिया मॅनजमेंट आणि न्यू मीडिया/ डिजिटल कम्युनिकेशन मॅनेजमेंटमध्ये कोणत्याही एका विषयात स्पेशलायजेशन करू शकतो.


निकाल : एप्रिल, 2014


हार्वर्डसोबत तयार केला पहिला
फोटोनॉव्हेल केस स्टडी

माइकाने हार्वर्ड बिझनेस स्कूलसोबत छायाचित्र आणि संवादाशिवाय वेगळ्या पद्धतीचे कॉमिक बुक तयार केले आहे. याला फोटोनॉव्हेल म्हटले जाते. यामध्ये बिझनेस केस स्टडीला फोटोनॉव्हेलच्या रुपात सादर करण्यात आले आहे. भारतीय इंस्टिट्यूटने हार्वर्डसोबत या पद्धतीने पहिल्यांदाच काम केले आहे.


न्यूज
आता शाळांमध्ये वाचणार ओरॅकल
सॉफ्टवेअर आणि कॉम्प्युटर हार्डवेअर कंपनी ओरकॅलने शाळांमध्ये आपला कोर्स सुरु करण्याचा प्रस्ताव दिला आहे. शाळांसोबतच व्यावसायिक प्रशिक्षण व उच्च तंत्रशिक्षण संस्थांमध्येही ओरॅकलचे प्रशिक्षण सुरु करण्याचा प्रस्ताव आहे. ट्रेन द ट्रेनर या आपल्या कंपनीच्या मोहिमेतंर्गत हा प्रस्ताव दिला आहे. या मोहिमेअंतर्गत कंपनी शिक्षकांना प्रथम आपले सॉफ्टवेअर ऑपरेट करण्याचे प्रशिक्षण देणार आहे. प्रशिक्षणानंतर शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना या सॉफ्टवेअरची माहिती देतील.ओरॅकल एज्युकेशन इनिशिएटिव्हचे अजय कपूर यांनी सांगितले की हे तीन पातळ्यांवर होणार आहे. त्याची सुरुवात नोएडा येथील शाळा आणि विद्यापीठापासू होईल. शाळेपासूनच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी मुलांना तयार करण्याच्या हेतून कंपनीने ही मोहिम सुरु केली आहे.

समेटिव्ह असेसमेंटचे 25 टक्के गुण
सीबीएसईने नववी आणि दहावी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी पहिल्या व दुस-या समेटिव्ह असेसमेंटसाठी वेगवेगळे कमीतकमी 25 टक्के गुण अनिवार्य केले आहेत. त्यानंतर त्यांना उत्तीर्ण घोषित केले जाईल. आतापर्यंत चार फॉर्मेटिव्ह असेसमेंट आणि दोन समेटिव्ह असेसमेंट मध्ये मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारावर उत्तीण घोषित केले जात होते. यामुळे दोन समेटिव्ह असेसमेंटमध्ये शून्य गुण मिळवणारा विद्यार्थी फॉर्मेटिव्ह असेसमेंटमधील गुणांच्या आधारे उत्तीर्ण होत होता.या विद्यार्थ्यानाही समेटिव्ह असेसमेंटमध्ये सहभागी होणे अनिवार्य करण्यात आले आहे. समेटिव्ह असेसमेंट एखाद्या विशिष्ठ विषयासाठी आणि फॉर्मेटिव्ह असेसमेंटमध्ये भाषा,गणित,विज्ञान तथा विविध शैक्षणिक अभ्याक्रमातील विद्यार्थ्याची प्रगती, कामगिरीचे मूल्यमापन होते.


English Sayings
1.The grass is always greener on the other side of the fence.
Meaning : Life always seems to be better than where you are yourself.
Fact : Sheep and cattle have a tendency to break through fences and gates into a neighbouring field, as though expecting the next door grass to be better.

2. As you sow, so you reap.
Meaning : You will eventually have to accept the consequences of your actions.
Fact : The proverb has its origin in the Bible (Glatation: 6.5-8). It is based on the idea of sowing seeds and gathering the crops that the seed grow into.

3. An apple a day keeps the doctor away.
Meaning : Eating apple everyday will keep you healthy and free from illness.
Fact : It is one of the best fruits as it contains high quantity of vitamins, minerals, fibers and iron.

4. A stich in time saves nine.
Meaning : If you deal with a problem straight away, you will prevent it from getting any worse and so save your time and efforts.
Fact : If you mend a piece of clothing as soon as a small hole appears, you will prevent the hole from becoming bigger and requiring more drastic stitching up later.
शब्द - लफ्ज- word
> कर्कश्य - शोर -cacophony
> कधी कधी - शाजा ओ नादर - seldom
> कठिण - सख्‍त- Arduos


प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या क्रमांकावर किंवा इ-मेल करा
education@dainikbhaskargroup.com