आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयआयटीतील प्रवेश हार्वर्ड आणि येल विद्यापीठांपेक्षाही कठीण, जाणून घ्‍या facts

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आदित्य पूजन। नवी दिल्ली, दीपक आनंद। कोटा, मनोज पुरोहित। जोधपूर - चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेचा पॅटर्न पुढच्या वर्षीपासून बदलत आहे. सध्या कॉमन प्रोफिशियंसी टेस्टमध्ये (सीपीटी) फक्त पर्यायी प्रश्नांचीच (ऑब्जेक्टिव्ह) उत्तरे द्यावी लागायची. मात्र, मे २०१७ पासून ५० गुण विषयनिष्ठ (सब्जेक्टिव्ह) असतील. आयसीएआयचे अध्यक्ष एम. देवराज रेड्डी यांच्या मते, सीपीटी उत्तीर्णांची संख्या आतापर्यंत खूप जास्त आहे. परंतु यातील ११ टक्केच सीए बनू शकतात असे चित्र मागच्या ५ वर्षांत पाहायला मिळाले आहे. अशा स्थितीत आम्ही अमेरिका आणि युरोपसारख्या देशांतील अभ्यासक्रम बदलाच्या पार्श्वभूमीवर सीपीटीत बदल करत आहोत. सीपीटीला आता "फाउंडेशन कोर्स' म्हटले जाईल. आतापर्यंत ही परीक्षा दरवर्षी जून आणि डिसेंबरमध्ये व्हायची. मात्र, आता नाेव्हेंबर आणि मे महिन्यात होईल. याचबरोबर देशातील अन्य प्रमुख परीक्षांतही विद्यार्थीहिताच्या दृष्टिकोनातून काही ना काहीतरी बदल केले जात आहे. एआयपीएमटी तज्ज्ञ ब्रजेश माहेश्वरी यांच्या मते, पाच वर्षांपूर्वीपर्यंत वैद्यकीय परीक्षा उत्तीर्ण हाेणाऱ्यांची संख्या शहरांतील किंवा कुटुंबीयांत कोणीतरी डॉक्टर असणाऱ्याशी संबंधित असायची. आता ही स्थिती बदलली असून मागच्या ३-४ वर्षांपासून लहान शहरे आणि गावांतील विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले आहे. एमसीआयच्या मते देशात दरवर्षी विविध राज्ये आणि संस्थाकडून वैद्यकीयच्या ६० पेक्षा अधिक प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. म्हणून सामाईक प्रवेशपूर्व परीक्षेची गरज असल्याची नेहमीच चर्चा होते. जेईई पॅटर्नमध्ये झालेल्या बदलाबाबत आयआयटी कानपूरचे डॉ. एच.सी. वर्मा म्हणाले की, दरवर्षी पॅटर्न बदलल्याने विद्यार्थ्यांवर प्रचंड दबाव राहील. आयआयटीचे प्रवेश कठीण असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनाच चांगल्या अध्ययनासाठी प्रेरित करावे लागेल.
पुढील स्‍लाइड्सवर जाणून घ्‍या, जाणून घ्या या पाच मोठ्या परीक्षांची स्थिती