आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनेक संकटांतून बाहेर पडत प्रज्ञाचे अमेरिकेत संशोधन कार्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कठीण परिस्थितीला तोंड देत परदेशात शिक्षण घेणा-या एका विद्यार्थिनीची यशकथा सांगत आहेत सुपर 30 चे संस्थापक आनंद कुमार. आई-वडील विभक्त झाल्यानंतर मुलीने आईला आधार दिला. कष्टाच्या जोरावर ती आज अमेरिकेत रिसर्च स्कॉलर आहे.


आनंद कुमार,
संस्थापक, सुपर 30, पाटणा, बिहार


फोनची घंटी वाजली अन् आठ वर्षांपूर्वीची आठवण ताजी झाली. समोर प्रज्ञा उभी होती. अमेरिकेच्या मिनेसोटा विद्यापीठातील संशोधक विद्यार्थिनी. यावर्षी सुपर 30 च्या 28 मुलांमध्ये तिची निवड झाली. याची माहिती तिला इंटरनेटवर मिळाली आणि तिने मला फोन केला. दार्जिलिंगमध्ये सुरुवातीचे शिक्षण, पाटण्यात पुढील शिक्षणासाठी झगडण्याचे दिवस तिच्या डोळ्यासमोर उभे राहिले. सुपर 30 तील काही निवडक आठवणीमध्ये प्रज्ञा एक भाग बनली.
आयुष्यात फार कमी लोकांना कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागते. 2000 मध्ये प्रज्ञाच्या वडिलांनी अचानक आईपासून काडीमोड घेतला व कुटुंब उद्ध्वस्त झाले. वडिलांना मुलांचा विसर झाला. परिणाम आई व मुले रस्त्यावर आली. या घटनेपूर्वी ती दोन भावांसोबत दार्जिलिंगमध्ये एका प्रतिष्ठित विद्यालयात शिकत होती. वडिलांच्या निर्णयामुळे आई-मुलांना हलाखीचे जीवन जगणे भाग पडले. माणसाची खरी परीक्षा अशा कठीण प्रसंगात होते. प्रज्ञाच्या दृढनिश्चयी आईने नव्याने आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला. तेथून ते गया शहरात आले. आईने शिलाईकाम सुरू केले.
प्रज्ञा तोपर्यंत एक सर्वसाधारण विद्यार्थिनी होती. मात्र, परिस्थितीनुसार तिच्यात बदल झाला. आई शिलाई कामातून घर चालवत होती, तिचे मात्र शिक्षणावर लक्ष केंद्रित होते. अभ्यासाव्यतिरिक्त ती आईला हातभार लावत होती. प्रज्ञा दहावीची परीक्षा चांगल्या गुणाने उत्तीर्ण झाली आणि तिच्या स्वप्नांना पंख फुटले. दरम्यानच्या काळात तिला सुपर 30 ची माहिती मिळाली. पाटण्यात एक दिवस ती मला भेटली. तिच्या वयाच्या अन्य मुलींच्या तुलनेत प्रज्ञा खरोखरच प्रज्ञावंत होती, याचा प्रत्यय मला आला. एका प्रश्नाची उकल विविध पद्धतीतून करण्याची माझी शैली तिला भावली तसेच ती स्वत: तसा प्रयत्न करत होती. तिने आपला संपूर्ण वेळ अभ्यासासाठी खर्ची केला. 2006 मधील एक चांगला संदेश त्यांच्या आयुष्यात प्रकाश घेऊन आला. तिची आयआयटीमध्ये निवड झाली होती. देशातील अव्वल संस्था आयआयटी-मुंबईमध्ये तिला प्रवेश मिळाला होता. शुल्क भरण्यासाठी तिने कर्ज काढले. आयआयटीचा चांगला अभ्यास केला व पदवी मिळवली. अमेरिकेच्या मिनेसोटा युनिव्हर्सिटीमध्ये केमिस्ट्रीच्या रिसर्च प्रोजेक्टसाठी तिची निवड झाली.
पाटण्यात या काळात दरवर्षी विविध विद्यार्थ्यांशी संपर्क आला. प्रज्ञाच्या फोनमुळे माझ्या आयुष्याचा भाग बनलेले तिचे यश आठवले. देशातील गरीब, असाह कुटुंबातील मुलांना आयआयटीत स्थान मिळवून दिल्याचा मला गर्व नाही. मात्र, माझ्या वाटचालीत मातीत मिसळलेली रत्ने शोधून काढल्याचा मला नक्कीच अभिमान आहे. अपार कष्ट करण्याची क्षमता त्यांच्यात होतीच, मात्र त्याचबरोबर मी त्यांच्यात कमालीची ऊर्जा व उत्साह पाहिला. दोन वर्षांची
माझी मदत एक निमित्त आहे. माझ्या स्मृतिपटलात प्रज्ञाचा प्रकाश सदैव तेवत राहील.
ज्ञान
अकॅडमिक्स नव्हे तर सॉफ्ट स्किल्स आवश्यक
परदेशी संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी केवळ अकॅडमिक्स चांगले असून उपयोग नाही. अभ्यासाव्यतिरिक्त विषयांवर लक्ष देणे तेवढेच आवश्यक आहे. अमेरिकेच्या नॅशनल असोसिएशन फॉर कॉलेज अ‍ॅडमिशन कौन्सलिंगच्या 2011 च्या अहवालात काही गोष्टींना दिलेले महत्त्व आणि विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या टिप्स...
अ‍ॅडमिशन टेस्ट स्कोर्स
महत्त्व : कॉलेजमधील आपली कामगिरी पाहिली जाईल
टीप : कॉलेजच्या अ‍ॅकॅडमिक्स बळकट बनवण्याशिवाय केवळ पुस्तकी ज्ञान आवश्यक नाही.
कॉलेज ग्रेड्स
महत्त्व : अन्य विद्यार्थ्यांच्या तुलनेत आपल्या क्षमतेची मोजमाप
टीप : अन्य विद्यार्थ्याच्या तुलनेत चांगले गुण नसतील तर तुम्ही दुस-यांदा परीक्षा देऊ शकता.
अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अन्य उपक्रमात सहभाग
महत्त्व : आपल्याला कशात आवड आहे ते यातून दिसते.
टीप : नेतृत्वगुण गुणवत्ता दाखवतो. त्यामुळे अन्य उपक्रमात तुमचा भरपूर सहभाग असावा.
निबंध किंवा लेख
महत्त्व : आपले विचार लोकांना सांगण्याची संधी
टीप : दुस-यांना आपला लेख वाचायला सांगा. त्यामुळे चुका सुधारण्यास मदत मिळेल.
शिक्षकांची शिफारस
महत्त्व : आपल्या बलस्थानाबाबत चर्चा करण्याची संधी
टीप : शिक्षकाकडून आपल्यासाठी क्वालिटी कव्हर लेटर लिहून घ्यावे.
मुलाखत
महत्त्व : आपले व्यक्तिमत्त्व जाणण्याची संधी
टीप : मुलाखत एकतर्फी होऊ नये. प्रश्नांची उत्तरे पूर्ण द्यावीत, प्रश्नही विचारावेत.
इंटरेस्टिंग कोट
“If we knew what it was we were doing, it would not be called research, would it?”- Albert Einstein
आपण काय करत आहोत हे आधीपासूनच माहित झाले असते शिवाय त्याचा उपयोग कळाला असता तर त्याला कशीच संशोधन मानले गेले नसते.
प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या क्रमांकावर किंवा इ-मेल करा
education@dainikbhaskargroup.com