आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयआयटी-जेईईच्या तयारी करिता एक्सपर्ट्सचे सक्सेस टीप्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या वर्षी आयआयटी परीक्षेच्या पॅटर्नबाबत आतापर्यंत कोणताही निर्णय झालेला नाही. जॉइन्ट एंट्रान्स एक्झाम (जेईई) अॅडव्हान्स या परीक्षेसाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी(आयआयटी), गुवाहाटीने वेबसाइट(www.jeeadv.ac.in) सुरु केली आहे. मात्र वेबसाइटवर माहिती पत्रिका, पेपर क्रमांक 1 व 2 ची तारीख आणि अॅडव्हान्स पॅटर्नविषयक कोणतीही माहिती अपलोड केलेली नाही. विद्यार्थ्‍यांना अद्यापही 2016 मध्‍ये होणारी परीक्षा ऑनलाइन आहे कि ऑफलाइन याबाबत अद्यापही स्पष्‍ट झालेले नाही. पॅटर्नच्या भागनगडीत न पडता आयआयटी-एनआयटीची तयारी करणा-या विद्यार्थ्‍यांनी एका प्रश्‍नाची वेगवेगळ्या पैलूंचा अभ्‍यास करावा, असे तज्ज्ञ अनिल अग्रवाल सांगतात.
सराव करा
कोचिंग क्लासचे संचालक असलेले मितेश राठी म्हणाले, की आयआयटी नेहमी विद्यार्थ्‍यांना आश्‍चर्यचकित करत आलेली आहे. विद्यार्थ्‍यांनी पॅटर्नचा विचार न करता संकल्पना समजून घ्‍यावे. जेव्हा विद्यार्थी प्रश्‍न शिक्षकांसह तयार करा. याचा तुम्हाला फायदा होईल.
काही महत्त्वाची मुद्दे :
- मागील 10 ते 15 वर्षांतील प्रश्‍नपत्रिका सोडवा.
- 10 ते 30 हजारांपर्यंत प्रश्‍न सोडवण्‍याचा सराव करा.
- मॉक टेस्ट आणि स्टेट सीरिजमध्‍ये सहभागी व्हा.
- अवघड प्रकरणांवर अधिक मेहनत घ्‍या.
या वर्षी एकाच दिवशी परीक्षा होईल की नाही ?
- आयआयटी, गुवाहाटीमध्‍ये याबाबत चर्चा झाली आहे. मात्र यावर सविस्तर चर्चा होणे बाकी आहे.
बदलाची गरज का आहे?
आयआयटी कौन्सिलच्या निरीक्षणानुसार, विद्यार्थ्‍यांना प्रथम जेईई(मुख्‍य) आणि नंतर अॅडव्हान्स दोन पेपरमुळे प्रचंड तणावाला समोरे जावे लागते.

पॅटर्नबाबत?
- आयआयटी एकच असे निश्चित पॅटर्न सांगत नाही. मात्र काही बदल करायचे असतील तर संस्था दोन महिन्यांपूर्वीच याची सूचना प्रसिध्‍द करते. (असे जेईईचे प्राध्‍यापक देवांग वी. खाकर यांनी सांगितले. )
जर परीक्षेतील पॅटर्न बदलाची सूचना 5-6 महिन्यांपूर्वीच विद्यार्थ्‍यांना मिळाल्यास त्यांना अभ्‍यास करायला अधिक मदत होईल. मात्र आयआयटी गुवाहाटीने परीक्षेतील बदलांविषयी काहीही सांगितलेले नाही. जॉइन्ट एंट्रान्स समितीने आयआयटी कौन्सिलला 2013 पूर्वी होणात-या एक परीक्षा पध्‍दत सुरु करण्‍याचा प्रस्ताव दिलेला आहे.
आनंद कुमार, संचालक, सुपर-30