आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉलेज प्रोजेक्ट्समधून मिळाली बिझनेस आयडिया, आता कमवतोय कोट्यावधी रुपये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना शिलादित्य मुखोपाध्‍यायला महाविद्यालयीन जीवनात टेक्नॉलॉजीच्या मदतीने सर्जनशील प्रयोग करण्‍याची आवड होती. आपल्या या आवडीमुळे महाविद्यालयाच्या सांस्कृतिक महोत्सवाशी संबंधित सर्जनशील कामे शिलादित्य करत असे. महोत्सवासाठीचे पोस्टर्स डिझाइन तयार करण्‍यापासून तिचे छापील प्रत काढण्‍यापर्यंतचे काम तो करत होता.
डिझाइनिंग आणि प्रिंटिगशी निगडित तंत्रज्ञानात्मक बाजूंवर त्याला विशेष रुची होती. शिलादित्यला मिळालेल्या प्रोत्साहनामुळे तो अशीच कामे दुस-या महाविद्यालये आणि कंपन्यांसाठी करु लागला. यासाठी तो फ्र‍िलान्स प्रकल्प घेऊ लागला होता. आपल्या या अनुभवाविषयी शिलादित्यने सांगितले, की या प्रोजेक्ट्समधून मिळणारे उत्पन्न हे त्याचे जास्तीचे पॉकेट मनी होते.
सुरुवातीला तर एका कामातून दुसरे काम मिळत गेले. येथे त्याला वेगवेगळे तंत्रज्ञानाचा वापर करण्‍याची संधी मिळाली. आता त्याने एएसपी डॉट नेटवर अॅप्लिकेशन बनवण्‍याबरोबरच अशा अनेक प्रोजेक्ट्सचा अनुभव घेतलाय. या प्रोजेक्ट्सच्या दरम्यान शिलादित्यला पहिला ब्रेक मिळाला.
कंपनी : रेसिलेंट टेक्नॉलॉजी
संस्थापक : शिलादित्य मुख्‍योपाध्‍याय, साहिल आनंद
काय आहे विशेष?
एक टेक्नॉलॉजी सोल्यूशन व कन्सल्टींग कंपनी स्थापन केली. जी रेडिओ फ्रीक्वेन्सी आयडेंटिफीकेशन सोल्यूशन आणि सिस्टिम इंटीग्रेशन सर्व्हिसेजमध्‍ये विशेष काम करते.
पुढील स्लाइड्सवर करिअरमध्‍ये कसे आले नवी वळण, कुटूंबाच्या मदतीने कशी केली सुरुवात, व्यवसायात कशा आल्या अडचणी, मंदगतीच्या विकासातून पुढे गेले आणि आज अनेक क्षेत्रांमध्‍ये देत आहेत सेवा...