आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिटेल, बँकिंग आणि आयटी क्षेत्राला हवेत अॅनालिटिक्स प्रोफेशनल्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर तुमच्या जवळ संख्‍याशास्त्र आणि गणितासह एमबीएची डिग्री आहे. तर बिझनेस अॅनालिटिक्समध्‍ये पदवीत्तर शिक्षण घेऊन तुम्ही अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्‍ये भविष्‍य शोधू शकता.
आवश्‍यक कौशल्ये
>विश्लेषणात्मक आणि तार्किक विचार
> उच्च पातळीवरील संख्‍यात्मक आणि आकडेवारीची माहिती.
> बिझनेस प्रोसेस आणि आऊटकम्स जाणून घ्‍या
> एसएएस, व्हीबीए आणि एसपीएसएस सारख्‍या सॉफ्टवेअर्ससह प्रोग्रॅमिंग लँग्वेजमधील गती
> गणिताचा मजबूत पाया
> फायनान्स, टेलिकॉम, रिटेल, इन्श्‍युरन्स आदींचा अनुभव
माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात प्रत्येक संस्थेचा एकमेव महत्त्वाचे मौल्यवान संपत्ती म्हणजे डेटा. याच आधारावर प्रगती होत असते. या डेटाचे विश्‍लेषण करण्‍यासाठी योग्य संख्‍याशास्त्रीय आणि गणितीय टूल्सचा वापर व्यवसाय यशासाठी आवश्‍यक आहे.येथे बिझनेस अॅनालिटिक्सची आवश्‍यकता भासत असते. ते कंपनीचे अंतर्गत आणि बाह्य भागीदारांची गुंतागुंतीच्या डेटा मॉडल्सच्या आधारावर अहवाल लेखन आणि व्यवसायाचे महत्त्वपूर्ण उद्देशासह व्युहात्मक सल्ला देत असतो. एकंदरीत या क्षेत्राशी संबंधित व्यावसायिक अॅनालिटिक्सशी संबंधित सूक्ष्‍म दृष्‍टी प्रदान करतात.
बिझनेस अॅनालिटिक्सचे काम काय असते?
कोणत्याही कंपनीच्या विकासामध्‍ये बिझनेस प्लॅन महत्त्वाची भूमिका बजावत असते. प्लॅनचा आराखडा बनवण्‍यासाठी व्यवसायाची मागील कामगिरीचे विश्‍लेषण आणि तपासणी खूप महत्त्वाची असते. हे काम बिझनेस अॅनालिटिक्सच्या माध्‍यमातून केले जाते.
पात्रता: बिझनेस अॅनालिसिस कोर्सच्या माध्‍यमातून तुम्हाला बिझनेस डेटा मॅनेजमेंट प्रोसेस आणि बिझनेस अॅनालिटिक अप्रोच, अॅनालिसिस अॅप्लिकेशनचे लाइव्ह डेटा सेट्सच्या मदतीने एक्सपीरियन्शियल प्रोजेक्ट मॅनेजमेंट, डेटा मॅनेजमेंट, डेटा मायनिंग, मार्केटिंग टेक्नॉलॉजी, अॅप्लाइड स्टॅटिस्टिक्स, डेटा अॅनालिसिसचे विश्‍लेषण आणि संवाद साधणे. डेटा अॅनालिसिसशी संबंधित एथिकल अँड इंटेलेक्च्युल प्रॉपर्टी इश्‍यूजसारखे विषय शिकायला मिळतात. बिझनेस अॅनालिटिक्स कोर्स करण्‍याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्‍यांनी संख्‍याशास्त्र आणि गणिताच्या पदवीसह एमबीए एक आदर्श पात्रता आहे. बिझनेस अॅनालिटिक्समध्‍ये कोणतेही फुलटाइम प्रोग्रॅम्स नाही. परंतु अनेक बी-स्कूल्सच्या एमबीएच्या अभ्‍यासक्रमात याचा समावेश आहे. संख्‍याशास्त्र, डिसिजन मेकिंग आणि ऑपरेशन्स मॅनेजमेंट आयआयएम अहमदाबादच्या फर्स्ट ईयर पीजीपीएम प्रोग्रॅमचा भाग आहे. या व्यतिरिक्त अॅडव्हान्स्ड स्टॅटिस्टिक्स आणि डेटा अॅनालिसिसही याचे मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्रॅममध्‍ये समावेश आहे. आयआयएम कोझीकोडही या क्षेत्रातील प्रमाणपत्र अभ्‍यासक्रम चालवते.

येथे करा कोर्स
>आयआयटी खडगपुर, आयआयएम कोलकाता आणि इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टीट्यूट कोलकाता बिझनेस अॅनालिटिक्समध्‍ये जॉइंट कोर्स.
> आयआयएम अहमदाबाद
> आयआयएम कोझीकोड
> एनआयटी त्रिची
> ग्रेट लेक इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट, चेन्नई
> नार्सी मोंजी इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट, मुंबई

संधी :
तीव्र स्पर्धा आणि गाहकाची मागणी यामुळे आधुनिक उद्योगांवर प्रभावी कामगिरीसाठी दबाव वाढत आहे. गुंतागुंतीच्या वर्तमान स्थितीत चांगला परिणाम साधण्‍यासाठी बिग डेटा अँड अॅनालिटिक्स महत्त्वाची भूमिका बजावते. या क्षेत्रात सर्वात अधिक मागणी रिटेल उद्योग आणि बँकिंग आणि इन्श्‍युरन्न क्षेत्रात असते. अॅनालिटिक्स सोल्यूशनची सेवा देणा-या आयटी कंपन्यामध्‍येही मोठ्याप्रमाणावर भरती चालू आहे. बिझनेस अॅनालिटिक्स असे क्षेत्र आहे जे सर्वर व्यावसायिक संघटनांना पुढील नियोजन बनवण्‍यास मदत करते. यामुळे बिझनेस अॅनालिटिक्समध्‍ये प्रचंड वाढ पाहावयास मिळत आहे. स्टार्ट अप्स मल्टिनॅशनल्ससह जवळ-जवळ 100 कंपन्यांनी बिझनेस अॅनालिटिक्सशी व्यवसाय करण्‍याच्या उद्देशाने वेगळ्या कंपन्या स्थापन केल्या आहेत. वास्तवात अॅनालिटिक्स उद्योगामध्‍ये बुध्‍दीमत्तेची खूप कमरता आहे.

मॅन्किझे ग्लोबल इन्स्टीट्यूटच्या एका अहवालानुसार, 2018 पर्यंत एकट्या अमेरिकेत उच्च प्रति‍चे अॅनालिटिक्स कौशल्य असणा-या 1 लाख 40 हजार पासून 1 लाख 90 हजार लोकांची आवश्‍यकता भासणार आहे. प्रभावी निर्णय घेण्‍यासाठी जवळ-जवळ 1 लाख 50 हजार मॅनेजर्स आणि अॅनालिस्टची मागणी असेल. जर तुमच्याकडे योग्य कौशल्य आहेत, तर तुम्हाला संधीची कमी नाही.
पगार : कनिष्‍ठ पातळीवर अॅनालिटिक्स व्यवसायिकाला पगार 6 ते 8 लाख रुपये वार्षिक, मध्‍यम स्तरावर 25 ते 30 लाख, तर संचालक स्तरावर 55 ते 60 लाख रुपयांपर्यंत असते.