रॉयल एनफील्डने 1956 मध्ये भारतात प्रवेश केला होता. 1971 मध्ये रॉयल एनफील्ड, ब्रिटनने बाइकचे उत्पादन बंद केले. मात्र भारतात बुलेटची निर्मिती चालूच राहिली. 1994 मध्ये आयशर ग्रुपने एनफील्ड इंडियाची खरेदी केली आणि त्याचे रॉयल एनफील्ड असे नामकरण केले. असा एक काळ आला की बुलेटची वार्षिक विक्री कमी होऊन 2 हजारावरच राहिली. बुलेटला भारतातच नाही, तर ब्रिटन, अमेरिका, जपान, युएई, कोरिया, बहरिन, फ्रान्स आणि जर्मनीसह 40 पेक्षा जास्त देशांमध्ये मिडवेट लेझर मोटार बाइक(250 सीसी ते 750 सीसी) सेग्मेंट प्रकारात अग्रेसर ठेवण्याचे काम आयशर ग्रुपचे माजी अधिकारी विक्रम लाल यांचे सुपूत्र सिध्दार्थ लाल यांनी मिळवून दिला.
पुढील स्लाइड्सवर वाचा...