आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वात कठीण परीक्षा उत्तीर्ण तरीही घेतला नाही प्रवेश! आयआयटी मिळूनही घेतला ड्रॉप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या वर्षी सुमारे ३०० मुलांनी आयआयटीत सीट मिळूनही प्रवेश घेतला नाही. मनाप्रमाणे शाखा आणि मनपसंत कॉलेज मिळावे अशी त्यांची अपेक्षा आहे. हे आश्चर्यकारक यासाठी की आयआयटी ही जगातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. या पार्श्वभूमीवर ज्यांनी या वर्षीच आयआयटी सोडले आहे, अशा देशातील काही मुलांची कहाणी येथे देत आहोत. त्यामागील कारण काय याचा शोध घेण्याचा प्रयत्न ‘दिव्य मराठी’च्या दीपक आनंद यांनी केला आहे.
विभोर मेंदीरत्ता|मला सीएस शाखेतच हवाय प्रवेश, इतरत्र नको
रुरकीत राहणाऱ्या विभोर मेंदीरत्ताला या वर्षी रुरकी आयआयटीत स्थापत्य शाखा मिळाली होती. जेईई- अॅडव्हान्समध्ये त्याची रँक ३४३९ होती. पण त्याने सीएस शाखा मिळावी म्हणून प्रवेश रद्द करून पुन्हा तयारी सुरू केली आहे. त्याच्यावर मोठी टीका झाली, पण विभोरचा प्रश्न असा आहे की, एकदा आयआयटीसाठी पात्र ठरलो, मग दुसऱ्यांदा का होणार नाही? रेल्वेत अभियंता असलेले दुष्यंतकुमार आणि पूनम यांचा मुलगा असलेल्या विभोरने सांगितले की, गेल्या वर्षीच्या चुकीपासून धडा घेतला आहे. या वर्षी वेळेचे व्यवस्थापन आणि धैर्य यांच्यावर नियंत्रण ठेवून पेपर सोडवेन. सीएस ही शाखा मिळवण्यासाठी किमान ३०० ते ४०० या दरम्यानची रँक मिळवावी लागेल. विभोरने सांगितले की, स्वत:ला सिद्ध करता यावे यासाठी मला रुरकी सीएस शाखा हवी होती. आयआयटी रुरकीत स्थापत्य शाखा मिळाल्यानंतर प्रवेश घ्यावा, असा सल्ला मित्रांनी दिला होता. पण त्याने त्यांचा सल्ला ऐकला नाही आणि पुन्हा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. तो म्हणतो, आई-वडिलांनी माझ्या या निर्णयाला कुठलाही आक्षेप घेतला नाही. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. अभ्यासाचा पॅटर्न मला माहीत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या परीक्षेत चांगली रँक मिळेल, असा विश्वास त्याला वाटत आहे.
पुष्कर सिंह|माझ्या करिअरबाबतचा निर्णय मीच घेणार
गुजरातच्या राजकोटजवळ राहणाऱ्या पुष्करसिंहला या वर्षी अॅडव्हान्स रँक ४३१९ च्या आधारावर आयआयटी बीएचयूमध्ये सिरॅमिक शाखा मिळाली होती, पण त्याला आयआयटी कानपूरच्या कोणत्याही प्रमुख शाखेत प्रवेश हवा आहे. त्यामुळे तो आता पुन्हा आयआयटीची तयारी करत आहे. एक वर्षासाठी करिअरशी तडजोड करता येणार नाही,असे त्याचे म्हणणे आहे. पुष्करने सांगितले की, मी कॅलक्युलेटेड रिस्क घेतली आहे. आता तयारी कशी करायची याची माहिती आहे. त्यामुळे अपयशाचा धोका वाटत नाही. लोकांच्या म्हणण्यानुसार समझोता करण्यापेक्षा स्वत: अभ्यास करून आपल्या करिअरची जबाबदारी घेणे चांगले असे मला वाटले. त्याचे वडील विमलेश कुमार हे स्वत: सिरॅमिक इंडस्ट्रीत आहेत. वडिलांनी सुरुवातीला त्याला याच शाखेत प्रवेश घेण्यास सांगितले होते, पण त्याला महत्त्वाच्या शाखेत शिकायचे होते. विमलेशने सांगितले की, गेल्या वर्षी होमवर्क नियमित नव्हते, या वर्षी त्यावर जास्त लक्ष देईन. आयआयटी बीएचयू ड्रॉप केल्यानंतर पुष्करलाही मोठी टीका सहन करावी लागली, पण त्याला कानपूरच्या मेकॅनिकल शाखेला प्रवेश हवा आहे. बीएचयूत एक वर्ष सिरॅमिकचा अभ्यास करून दुसऱ्या वर्षी शाखा बदलण्याची संधी होती, पण त्याने पुन्हा परीक्षा देण्याचाच निर्णय घेतला आहे.
मनीत सिंह|मला फक्त आयआयटीचा टॅग नकोय
बिहारच्या लखीसरायमध्ये राहणाऱ्या मनीत सिंहला ३४८१ रँकच्या आधारावर आयआयटी पलक्कडमध्ये प्रवेश मिळाला. पण तेथे प्रवेश घेण्याऐवजी त्याला आयआयटी मुंबई किंवा दिल्लीत सीएस शाखेत प्रवेश घ्यायची इच्छा आहे. त्यामुळे मी पुन्हा परीक्षा देत आहे. त्याचे वडील शेतकरी आहेत. आर्थिक स्थिती चांगली नसतानाही मनीत आत्मविश्वासाच्या बळावर ही रिस्क घेत आहे. मनीत म्हणतो की, मित्रांनी पुन्हा परीक्षा देऊन चांगल्या आयआयटीत प्रवेश घेतला आहे. ते जर तसे करू शकतात तर मी का नाही? नव्या आयआयटीत प्रवेश मिळाला तरी नंतर स्कोप मिळत नाही. फक्त आयआयटीचा टॅग पुरेसा ठरत नाही, भविष्याची सुरक्षितताही आवश्यक आहे. शिक्षक आणि पालकांच्या याच विचाराने प्रेरित होऊन तो पुन्हा परीक्षा देणार आहे. आयआयटी दिल्ली, मुंबई आणि कानपूरच्या कोअर शाखेत प्रवेशाचे उद्दिष्ट ठेवूनच अभ्यास केला होता. मनीतने सांगितले की, माझ्या काकाच्या मुलानेही तेथेच प्रवेश घेतला होता आणि मला भविष्यातील स्कोपबाबत सांगितले होते. एक वर्ष आणखी मेहनत कर, चांगली रँक मिळेल, असे आई-वडिलांनी सांगितले. पलक्कड आयआयटीच्या गुणवत्तेबद्दल शंकाच नाही. प्रश्न माझ्या क्षमतेचा आहे. मला ती सिद्ध करायची आहे.
बातम्या आणखी आहेत...