आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • TPPE 2013 : Thermal Power Plant Engineering Post Diploma Course Entrance

टीपीपीई- 2013 : थर्मल पॉवर प्लँट इंजिनिअरिंगच्या पोस्ट डिप्लोमा कोर्समध्ये प्रवेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्लीच्या सेंट्रल बोर्ड ऑफ इरिगेशन अँड पॉवरच्या पोस्ट डिप्लोमा कोर्स इन थर्मल पॉवर प्लँट इंजिनिअरिंग कोर्समध्ये प्रवेशासाठी विद्यार्थी 28 ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकतील.


जागा व मुदत
60 जागा
10 टक्के जागा 1 वर्षाचा अनुभव असणा-या विद्यार्थ्यांसाठी


52 आठवडे मुदत


पात्रता
इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा झालेले विद्यार्थी अर्ज करू शकतील. डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा देणारे विद्यार्थीही पात्र आहेत. वयोमर्यादा : 26 वर्षे


निकाल : 7 सप्टेंबर 2013


शुल्क : कोर्सचे शुल्क 95 हजार रुपये आहे. वसतिगृहाचे शुल्क तीन टप्प्यांत द्यावे लागेल. प्रायोजित उमेदवारांसाठी एकूण शुल्क 1 लाख 30 हजार रुपये आहे. याव्यतिरिक्त 5 हजार रुपये अनामत रक्कम असेल. सुमारे 13 हजार रुपये प्लेसमेंट चार्ज, वसतिगृह व भोजनासाठी जमा करावे लागतील.


निवड प्रक्रिया
निवडीमध्ये 10 वी, 12 वी आणि डिप्लोमाच्या गुणांना महत्त्व दिले जाईल. विद्यार्थ्यांची निवड या गुणानुसार तयार केलेल्या गुणवत्ता यादीनुसार केली जाईल.


प्रशिक्षण, भेट व नोक-या
विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ऊर्जा केंद्रांवर प्रशिक्षण दिले जाईल. यामध्ये अनेक मॅन्युफॅक्चरिंग प्लँट्स, लॅब्ज, सबस्टेशन, काँट्रॅक्टर साइट्स आदींचा समावेश असेल. सीआयबीपीची देशातील अनेक पॉवर युटिलिटी कंपन्यांशी भागीदारी आहे. प्रशिक्षणासोबत विद्यार्थ्यांना आपल्या गुणवत्तेनुसार नोकरी मिळू शकेल.


औष्णिक ऊर्जा प्रकल्पाची माहिती मिळेल
औष्णिक ऊर्जा प्रकल्पाची कार्यपद्धती, दुरुस्ती-देखभाल, सुरक्षा, व्यवस्थापन, ऊर्जा प्रकल्पाच्या योजना, प्रोसेस फ्लो आदी संपूर्ण माहिती मिळावी या उद्देशाने अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.


ज्ञान
जगातील सर्वात मोठा औष्णिक ऊर्जा प्रकल्प
अमेरिका, चीन, जपान जगात सर्वाधिक वीजनिर्मिती करणारे देश आहेत. या यादीमध्ये भारताचा पाचवा क्रमांक असून येथील क्षमता 152 गीगावॅट्स आहे. जगातील अन्य काही मोठे ऊर्जा प्रकल्प.
थ्री जॉर्ज्स डॅम, चीन : क्षमता - 18,460 मेगावॅट्स. जगातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प. यांग्त्जे नदीवर या प्रकल्प बांधकामाची सुरुवात 1994 मध्ये झाली होती. या प्रकल्पातून साधारण 22.5 गीगावॅट वीजनिर्मिती होते.
इटाइपू ऊर्जा प्रकल्प, ब्राझील : क्षमता : 14,750 मेगावॅट्स. जगातील सर्वात मोठा दुसरा जलविद्युत प्रकल्प. या ठिकाणी वीसहून अधिक जनरेटर युनिट्स आहेत.

सिमोन, बोलिवर, व्हेनेझुएला : क्षमता - 10,055 मेगावॅट्स. व्हेनेझुएलातील 82 टक्के वीजनिर्मिती या प्रकल्पातून होते.
जगातील पहिला भूमिगत औष्णिक विद्युत प्रकल्प : कोरिया मिडलॅँड पॉवर कंपनीनुसार, 2013 मध्ये मापो जिल्ह्यात भूमिगत औष्णिक ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे. जगातील हा पहिला भूमिगत प्रकल्प असेल. सेऊलमधील प्रकल्प 2017 पासून बंद करण्यात येणार आहे. त्याचे रूपांतर सांस्कृतिक व क्रीडा संकुलामध्ये होईल.


रंजक
प्रकाशाएवढा विजेचा वेग
@ विजेचा वेग प्रकाशाएवढाच म्हणजे 186,000 मैल प्रतिसेकंद एवढा असतो.
@ चंद्रावर बल्ब लावला आणि त्याचे बटण घरी बसून दाबल्यास केवळ 1.26 सेकंदामध्ये त्याचा प्रकाश पडेल.
@ विजेच्या वेगाने तुम्ही 1 सेकंदात जगाला आठ परिक्रमा करू शकता.


प्रेरणादायी विचार
“We should learn to live more with our climate and rely less on electricity to alter our climate.”
-James Dyson
आपण हरितगृह वायूसोबत अधिक राहायला शिकले पाहिजे तसेच हरितगृह वायू रूपांतरित होणा-या विजेचा कमीत कमी वापर करायला हवा.


प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या क्रमांकावर किंवा इ-मेल कराeducation@dainikbhaskargroup.com