आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्याची कर्जाची कार, मात्र आज जगप्रसिध्‍द \'फीयाट क्रिसलर कार\'चे होतेय उत्पादन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉल्टर क्रिसलर कारसह. - Divya Marathi
वॉल्टर क्रिसलर कारसह.
कर्ज काढून खरेदी केली कार, जगातील टॉप टेन ऑटोमोबाइल ब्रँडमध्‍ये मिळवले स्थान
अमेरिकेचे बिग थ्री आणि जगातील टॉप टेन ब्रँडमध्‍ये समावेश असलेला ऑटोमोबाइल ब्रँड क्रिसलर. क्रिसलर एका अशा इंजिनिअरने बनवले आहे ज्याने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले नव्हते. यंत्रांवर प्रेम करणारे वॉल्टर क्रिसलर म्हणायचे, मी कवीलाच समजू शकतो जो की कार कशा पध्‍दतीने डिझाइन करायचे. त्यांच्यासाठी कवितेप्रमाणे कार बनवण्‍याचे काम होते.

कंपनी: क्रिसलर
स्थापना:1925
संस्थापक: वॉल्टरपर्सी क्रिसलर
मुख्यालय:मिशिगन,अमेरिका
फीयाट क्रिसलर ऑटोमोबाइल कॉर्पोरेशनची संपत्ती आहे. मुळात एक रेल्वे ट्रॅक इंजिनिअर हेन्री क्रिसलरची चार मुलांपैकी एक वॉल्टर पर्सी क्रिसलर आहेत. 2 एप्रिल, 1875 रोजी वॉल्टर क्रिसलर यांचा जन्म झाला. वडिलांची इच्छा होती, की मुलांने शिकावे. मात्र लहानपणापासून यंत्रांविषयी जिज्ञासा असलेली वॉल्टर वयाच्या 17 व्या वर्षी शिक्षणाला रामराम ठोकला. त्यांनी एका रेलरोड मशीन शॉपमध्‍ये प्रशिक्षिणार्थी म्हणून जॉइन केले. मिडवेस्टमध्‍ये 20 वर्षांपर्यंत वॉल्टर यांनी 6 पेक्षा जास्त रेल रोड कंपन्यांमध्‍ये काम केले.
कर्जकडून घेतलेल्या कारकडून खूप गोष्‍टी शिकल्या
'रेस्टलेस' स्वभावाचे वॉल्टर क्रिसलर खूप लवकर सर्वकाही शिकत. या धडपड्या वृत्तीने विना डिग्री त्यांना सेल्फ मेड लोकोमोटिव्ह इंजिनिअर बनवून टाकले. फोरमॅन, सुपरिटेंडंट, मास्टर मॅकेनिक यासारख्‍या पदांवर बढती मिळवत ते 1910 मध्‍ये अमेरिकन लोकोमोटिव्ह कंपनी पिट्सबर्गचे वर्क्स मॅनेजर बनले. या दरम्यान 1908 मध्‍ये शिकागो ऑटो शोमध्‍ये वॉल्टर क्रिसलरने एक कार पाहिली. तिची किंमत होती 5 हजार डॉलर. मोटारकारला लोकोमोबाइल म्हणणारे वॉल्टर यांच्या जवळ तेव्हा केवळ 700 डॉलर होते. त्यांनी 4 हजार 300 डॉलरचे कर्ज घेऊन ती कार खरेदी केली. वॉल्टर क्रिसलर यांना कार चालवता येत नव्हते. रेल्वेने कार त्यांच्या गावी आली. कार कशी बनवली जाते, यासाठी वॉल्टर यांनी नवी गाडी अनेक वेळा खोलली आणि पुन्हा जोडली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...