आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य एज्यूकेशन: सुपर 30 बंद करण्याचा विचार केव्हा आला ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यशाच्या पहिल्या टप्प्यातच लालसा व असत्याच्या जाळ्यात अडकलेल्या एका विद्यार्थ्याने त्यातून स्वत:ची सुटका करून घेत एका प्रसिद्ध कंपनीत अभियंता म्हणून मिळवलेले यश आनंदकुमार या अंकात सांगणार आहेत.


आनंदकुमार,
संस्थापक, सुपर 30, पाटणा


काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. 2007 मध्ये आयआयटी परीक्षेचा निकाल जाहीर झाला होता. सुपर 30 च्या परिसरामध्ये आनंदाचे वातावरण होते. त्या वेळचाही निकाल चांगला होता. 30 पैकी 28 विद्यार्थ्यांची निवड झाली होती. प्रणव प्रिन्सही त्यापैकी एक होता.त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी अतिशय गरीब होती. वडील बेरोजगार होते. आई शिलाईकाम करून घर चालवत होती. आयआयटी-जेईईमध्ये त्याची रॅँक 162 होती. प्रवेश घेण्याआधी सर्व विद्यार्थी आपल्या घरी जात होते. हे केवळ त्यांच्या एकट्याचे स्वप्न नव्हते. गावात आई-वडिलांनाही त्याची मोठी आशा होती. अशा वेळी अचानक सुपर 30 च्या दरवाजाला कुलूप लागले. सर्व आनंद हिरावून नेला.


कोचिंगमधील व्यावसायिकांनी प्रणवला आपल्या जाळ्यात अडकवले. त्याला लालूच दाखवली. आपला विद्यार्थी असल्याचे भासवत त्याचा सत्कार केला व जाहिरात केली. विशेष म्हणजे तो संपूर्ण वर्षभर सुपर 30 बॅचमध्ये शिकला. अन्य कोचिंग क्लासमध्ये जाण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. प्रणवने उचललेल्या पावलामुळे माझे स्वप्न भंगले. गरिबी कुटुंबातील प्रतिभावंत मुलांचे स्वप्न साकार करण्याच्या प्रक्रियेत आम्ही फक्त निमित्तमात्र होतो. तो असा काही करेल असे मला वाटत नव्हते. त्या वेळी निर्माण झालेल्या भावनेत मी सुपर 30 बंद करण्याचा निर्णय घेतला. यावर नंतर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. प्रसारमाध्यमातून प्रश्न उपस्थित झाले. विद्यार्थी संघटनांनी निदर्शने केली. प्रकरण एवढे लांबेल याची प्रणवने कल्पनाही केली नसेल. त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली. तो माझ्याकडे आला व सुपर 30 बंद करण्याचा निर्णय घेऊ नये, अशी विनवणी रडक्या स्वरात केली. निर्णय मागे न घेतल्यास मी आयआयटीत प्रवेश घेणार नसल्याचे त्याने मला कळवले. त्याने सर्वांसमक्ष सत्य स्वीकारले. त्यानंतर सर्वकाही सुरळीत सुरू झाले. दिल्ली आयआयटीमध्ये त्याने प्रवेश घेतला. तो ज्या-ज्या वेळी सुपर 30 मध्ये येतो तेव्हा तो विद्यार्थ्यांना शिकवायलाही विसरत नाही. आज तो एका नामांकित कंपनीमध्ये अभियंता आहे.


माहिती
पुढील वर्षांपासून जेईई अ‍ॅडव्हान्स संगणक आधारित होऊ शकते
2014 पासून जेईई अ‍ॅडव्हान्स पेपर-पेन्सिलऐवजी संगणक आधारित परीक्षा होऊ शकते. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मंडळाच्या रविवारच्या बैठकीत यावर चर्चा झाली. सप्टेंबर महिन्यात होणा-या मंडळाच्या बैठकीत त्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल. आयआयटी मुंबईचे संचालक देवांग खाखर यांनी सांगितले की, जेईई अ‍ॅडव्हास परीक्षा देणा-यांची संख्या दीड लाख असल्याने ही परीक्षा संगणक आधारित करता येणे शक्य आहे. आयआयटी खरगपूर 2014 ची जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षा घेईल. आगामी वर्षाच्या आयआयटी-जेईई पॅटर्नमध्ये कुठलाही बदल केला जाणार नाही, असे या बैठकीत ठरले आहे.


Did you know ?
Everyday Latin phrases
Viz.
Viz. is an abbreviated contraction of the Latin term videre licit which became videlicet meaning "namely" or "that is to say." The term introduces a description or clarification of an idea stated earlier. Viz. has a fascinating etymology in that the addition of the "z" was not originally a letter but a twirl, representing the Medieval Latin shorthand symbol for the suffix "-et," as in videlicet.[1] Cicero, M.T. Latin 101 (Rome: Academic,
21 BCE), p. 4.
Sic
Sic is the first term on our list that is not an abbreviation or acronym. The Latin word sic means "so" or "thus" and most often appears bracketed within quoted passages. [Sic] indicates that the quoted text has been transcribed exactly, thus accounting for any grammatical or spelling errors that may appear: "Cusack
tweeted often during the show, stating that it "was a privilege to honor a great artist--bit of fun at the masters [sic] request."
Quid pro quo
This phrase is on loan to English directly from the Latin meaning "one thing in return for another." Quid pro quo functions as a noun referring to a fair trade or reciprocal exchange. The phrase often appears in diplomacy. For example, let's look at this imagined quotation by the director of the Central Park Zoo. "The Bronx Zoo has finally agreed to give us a polar bear, but they're asking for a quid pro quo. How many grizzlies should we give them?"
Ipso facto
Ipso facto was adopted into English directly from the Latin. The phrase means "by the fact itself" or "by the very nature of the deed." In a sentence, ipso facto indicates that the event that follows it is a direct consequence of the event that precedes it. For example: "I'm forswearing all technology. Ipso facto you can have my stereo." Like many deeply integrated loanwords, there is no need to italicize ipso facto in common usage.

प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या क्रमांकावर किंवा इ-मेल करा
education@dainikbhaskargroup.com