आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारावी पास तरुणांना नोकरीची संधी, पगार 39 हजारांपुढे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय लष्‍करात 90 टेक्निकल पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी उमेदवार फिजिक्स, रसायनशास्त्र आणि गणित हे विषय घेऊन बारावी पास असावा. टेक्निकल पदांसाठी अर्ज करण्‍याची मुदत 30 नोव्हेंबर आहे. या पदांकरिता 35 वे टेक्निकल इंट्री स्कीम कोर्स जुलै 2016 मध्‍ये सुरु होईल.

एकूण पदे : 90
पात्रता : 12 वीत फिजिक्स, रसायनशास्त्र आणि गणित विषयांसह 70 टक्के गुण असावे.
पे स्केल : 15 हजार 600 ते 39 हजार 100 रुपये दर महिना.
वय : कमीत कमी 16 ½ वर्ष आणि जास्तीत जास्त 19 ½ वर्ष (1 जानेवारी 1977 पूर्वी आणि 1 जानेवारी 2000 नंतरचा जन्म झालेला नसावा.)
असा करा अर्ज : पात्र उमेदवार 20 ऑक्टोबर 2015 ते 30 नोव्हेंबर 2015 पर्यंत भारतीय
लष्‍कराच्या www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर अर्ज करु शकतात.
पुढे क्लिक करा आणि जाणून घ्‍या एम्स, रिझर्व्ह बँकेतील भरतीविषयक