आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कायद्याच्या पदवीसाठीही प्रवेश परीक्षा उत्तीर्ण अनिवार्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - कायद्याच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी नव्या सीईटीचा अध्यादेश शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नुकताच जारी केला आहे. वैद्यकीय तसेच अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षांना आता विद्यार्थी सरावले आहेत. त्यापाठोपाठ आता आता लॉ करण्यासाठीही प्रवेश परीक्षा घेण्याचा निर्णय शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केला आहे.

बारावी नंतर पाच वर्षे अथवा पदवीनंतर वर्षे या पॅटर्नसाठी कायद्याच्या अभ्यासक्रमाला थेट प्रवेश घेता येणार नाही. त्यासाठी सीईटी द्यावी लागेल. मात्र, परीक्षा कधी होणार, अभ्यासक्रम काय असेल, परीक्षेचे स्वरूप काय असेल याविषयी माहिती अद्याप जाहीर झालेली नाही. लॉची सीईटी तारीख तपशील नंतर जाहीर केले जातील, असे सांगितले जात आहे. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमात आहेत.

पुढे वाचा... तावडेंना पत्र पाठवले : वेलणकर