आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Admission Alert: इन्स्टिट्यूट ऑफ रूरल मॅनेजमेंट आणि इतर संस्थांमधील प्रवेश सुरु

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इन्स्टिट्यूट ऑफ रूरल मॅनेजमेंट, एसआरएम युनिव्हर्सिटी, एसआरएम युनिव्हर्सिटी ,जामिया हमदर्द, व्हीआयटी युनिव्हर्सिटी आणि सिंबायोसिस युनिव्हर्सिटी या भारतातील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश प्रक्रियेविषयी सुरु झाली आहे. तर चला जाणून घेऊ या प्रवेशाविषयी...
इन्स्टिट्यूट ऑफ रूरल मॅनेजमेंट, आणंद (इरमा)
इरमाच्या पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम इन रूरल मॅनजमेंटमध्ये प्रवेशासाठी ३१ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल. कॅट २०१५, जेट २०१६ या परीक्षांचे गुण, संस्थेद्वारा आयोजित ऑनलाइन प्रवेश परीक्षा, ग्रुप अॅक्टिव्हिटी, तसेच मुलाखत यावर आधारित प्रवेश दिला जाईल. इरमाची इश्यूज ऑफ सोशल कन्सर्न ही ऑनलाइन टेस्ट १४ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

पात्रता : ५०टक्के गुणांसह बॅचलर डिग्री यासाठी आवश्यक आहे. १३ जून २०१६ पूर्वी जर डिग्री मिळत असेल तर त्यांनाही अर्ज करता येईल.

फी: लाख५० हजार रुपये.

पार्श्वभूमी: ग्रामीण व्यवस्थापन क्षेत्रातील ही देशातील सर्वोच्च संस्था आहे. गेल्या काही वर्षांपासून १०० टक्के नोकरी आणि चांगले पॅकेज या संस्थेच्या विद्यार्थ्यांना मिळत आहे. २०१३-१५ बॅचच्या पीआरएम विद्यार्थ्यांना सरासरी ८.२२ लाखांचे पॅकेज मिळाले. सर्वाधिक पॅकेज १५.५० लाखांचे होते. २०१२-१४ मध्ये सरासरी पॅकेज ७.८७ लाख तर जास्तीत जास्त पॅकेज १९ लाख होते.

एसआरएम युनिव्हर्सिटी
एसआरएम युनिव्हर्सिटीच्या चेन्नईसह देशभरातील सहा कँपसमध्ये बीटेक कोर्ससाठी १५ मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. संस्थेच्या वतीने एसआरएमजेईई प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात येते. अंदाजे हजार जागांवर याद्वारे प्रवेश दिला जाईल. यंदाच्या वर्षी प्रथमच ही परीक्षा ऑनलाइन होत आहे.

पात्रता: फिजिक्स,केमेस्ट्री, मॅथ्स या विषयांमध्ये ६५ टक्के गुणांसह दहावी, बारावी केलेले असावे. काही शाखांसाठी बायोलॉजी विषय घेतलेलेही अर्ज करू शकतात.
फी: कुत्तनकुलाथूर कँपसमध्ये बीटेकची वार्षिक फी लाख ८५ हजारांपासून ते लाख ३५ हजारांपर्यंत आहे. एनसीआर कँपसमध्ये फी दीड लाख रुपये.

जामिया हमदर्द, नवी दिल्ली
जामिया हमदर्दच्या एमबीए कोर्स प्रवेशासाठी १२ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येतात. कॅट, मॅट, सीमॅट किंवा जीपॅटच्या गुणांवर तसेच ग्रुप डिस्कशन, मुलाखत या आधारावर निवड केली जाईल. डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात हे केले जाईल.

पात्रता : ५०टक्के गुणांसह बँचलर डिग्री.
फी: जामिया हमदर्द येथे एमबीएची वार्षिक फी दीड लाख रुपये आहे. बीएचयूच्या फॅकल्टी ऑफ मॅनजमेंट स्टडीजमध्ये एमबीएची वार्षिक फी ३० हजार ७६५ रुपये आहे.

व्हीआयटी युनिव्हर्सिटी
व्हीआयटी युनिव्हर्सिटीच्या एमबीए कोर्स प्रवेशासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येईल. विद्यार्थ्यांना कॅट, जेट, मॅट, जीमॅट किंवा सीमॅटच्या गुणांवर तसेच ग्रुप डिस्कशन मुलाखतीवर आधारित निवडले जाईल. मुलांना फायनान्स, मार्केटिंग, ह्युमन रिसोर्सेस, आयटी, इंटरनॅशनल बिझनेस, आणि बिझनेस अॅनालिटिक्सच्या कोर्ससाठी प्रवेश मिळेल.

पात्रता: ६०टक्के गुणांसह कोणत्याही शाखेची बॅचलर डिग्री. व्यावसायिक अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल. दहावी आणि बारावीच्या गुणांचाही प्रवेश देताना विचार केला जाईल.
फी: एमबीएचीवार्षिक फी लाख ४७ हजार रुपये आहे. क्राइस्ट युनिव्हर्सिटीमध्ये पहिल्या वर्षाची फी लाख ४५ हजार रुपये आहे.

सिंबायोसिस युनिव्हर्सिटी
सिंबायोसिस युनिव्हर्सिटीमध्ये एमबीए कोर्स प्रवेशासाठी १९ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येतील. २० डिसेंबर रोजी होणारी सिंबायोसिस नॅशनल अॅप्टिटयूड टेस्ट, मुलाखत आणि लिहिण्याची क्षमता यावर आधारित प्रवेश मिळेल. अॅग्री बिझनेस, इंटरनॅशनल बिझनेस, एनर्जी अँड इनव्हायर्नमेंटमध्ये विद्यार्थी स्पेशलायझेशन करू शकतात.
पात्रता: ५०टक्के गुणांसह बॅचलर डिग्री. अॅग्री बिझनेस मॅनेजमेंटसाठी अॅग्रिकल्चरल सायन्सेस, एनर्जी अँड इनव्हायर्नमेंटसाठी सायन्स, इंजिनिअरिंग किंवा आर्किटेक्चरची डिग्री असणे गरजेचे.
फी: इंटरनॅशनलबिझनेस कोर्सची वार्षिक फी अंदाजे साडेसहा लाख रुपये आहे. वेगवेगळ्या संस्थांमध्ये फी वेगवेगळी आहे.
प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200012345 वर किंवा मेल करा education @dbcorp.in वर ...