आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एआयएमए मॅट-डिसेंबर: 2 लाखांहून अधिक विद्यार्थी देणार परीक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनची (एआयएमए) व्यवस्थापन पात्रता परीक्षा डिसेंबरमध्ये होणार आहे. 1 डिसेंबरला पेपर व 7 डिसेंबरला संगणक आधारित चाचणी होईल. सुमारे 2 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत. परीक्षेच्या माध्यमातून देशातील अनेक व्यवस्थापन महाविद्यालये व परदेशी विद्यापीठांच्या व्यवस्थापन अभ्यासक्रमात प्रवेश मिळेल. दोन परदेशी विद्यापीठात अमेरिकेची सिएटल व स्पेनची कार्लाेस-3 ऑफ मॅद्रिद मॅट स्कोरच्या विद्यार्थ्यांना एमबीएसाठी प्रवेश देण्यात येणार आहे. अर्जाची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर आहे.

पात्रता
कोणत्याही शाखेतील पदवी. जे विद्यार्थी अंतिम वर्षाची परीक्षा देत आहेत. तेदेखील अर्ज करू शकतात.
परीक्षा पद्धती
150 मिनिटांच्या पेपरमध्ये भाषा, कॉम्प्रिहेंशन, गणितीय कौशल्य, डेटा अनॉलिसिस, विश्लेषण, पर्यावरणावर 40-40 प्रश्न.

शुल्क
>एमीटी विद्यापीठात एमबीएसाठी वार्षिक अध्ययन शुल्क सुमारे 2 लाख 36 हजार रु.
>उर्वरित कॉलेजात एमबीएसाठी सुमारे 2 ते 3 लाख रुपये वार्षिक
>सिएटल विद्यापीठात या कोर्ससाठी एकूण सुमारे 19 लाख 61 हजार रुपये.

निकाल : जानेवारी 2014

जाणून घ्या विद्यार्थ्यांचा कल
यंदा स्टुडंट्स ग्लोबल अ‍ॅप्टिट्यूड इंडेक्स (एसजीएआय) 16 नोव्हेंबरला होईल. त्याची ही चौथी वेळ आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने या अगोदर त्याचे आयोजन जानेवारीत होईल, अशी शक्यता वर्तवली होती; परंतु आता त्यात बदल करण्यात आला आहे. एसजीएआयचा उद्देश विद्यार्थ्यांचा करिअरविषयी असलेला कल जाणून त्याला प्रोत्साहन देणे असा आहे. आतापर्यंत यात सहा हजारांहून अधिक शाळांतील चार लाख विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

पात्रता पूर्ण नसली तरी, ईस्ट लंडन विद्यापीठात प्रवेश
ईस्ट लंडन विद्यापीठाने अलीकडेच दोन नवीन अभ्यासक्रमांची सुरुवात केली आहे. ती अशी- इंटरनॅशनल फाउंडेशन प्रोग्रॅम व प्री-मास्टर्स कोर्स. सामान्य प्रवेश प्रक्रियेत आवश्यक असणारे निकष पूर्ण करू न शकणाºया विद्यार्थ्यांनाही त्यात प्रवेश घेता येऊ शकेल, हेच याचे वैशिष्ट्य आहे. अनेकवेळा विद्यार्थ्यांना वय पूर्ण होण्यास काही दिवस, महिने असल्याने प्रवेश नाकारला जातो. अशा विद्यार्थ्यांना त्यामुळे दिलासा मिळणार आहे. भारतीय विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी लंडन विद्यापीठात दिल्लीमध्ये 7 नोव्हेंबरपासून आपले कार्यालय सुरू करणार आहे. लंडनची प्रवेश परीक्षा, तेथे राहण्याबद्दलची माहिती देणारी एक विशेष टीम चोवीस तास उपलब्ध असेल. फेब्रुवारी 2014 मध्ये सुरू होणाºया पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी इंडियन नॅशनल स्कॉलरशिपदेखील होणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल.

मॅनेजर्स माइंड
जमिनीत रोवलेल्या एका खांबाची उंची मोजा असे एकदा व्यवस्थापकांच्या एका चमूला सांगण्यात आले. सर्वच व्यवस्थापक हातात टेप घेऊन उंची मोजायला निघाले. प्रत्येकानेच आळीपाळीने खांबाची उंची मोजण्यास सुरुवात केली. कुणी उंचावर चढू शकला नाही तर कुणी शिडीवरूनच घसरून पडला. क धी वर पोहोचल्यानंतर हातातून मेजरमेंटचे टेपच खाली पडले. तर कधी शिडीच हलली. अनेक व्यवस्थापक प्रयत्न करीत होते. तेथून एक इंजिनिअर जात होता. सर्व हकिगत कळल्यानंतर त्याने तो खांब उपसून काढला आणि जमिनीवर आडवा टाकला. टेप घेतला, त्याची लांबी मोजली. सर्व व्यवस्थापकांना माप सांगितले व तो निघून गेला. इंजिनिअर गेल्यानंतर सर्वच व्यवस्थापक त्याची खिल्ली उडवू लागले. आपल्याला उंची हवी होती. त्याने लांबी सांगितली.. स्वत:ला फार शहाणा समजतो.
तात्पर्य : आपण काहीही केले, तरी कोणतेही व्यवस्थापक नेहमीच आपल्या कामातील त्रुटी काढतात.

मॅनेजमेंट फंडा
कंपन्यांमध्ये वापरल्या जाणाºया काही खुसखुशीत वाक्यप्रचार, म्हणी. परंतु त्या शाब्दिक अर्थापेक्षा थोड्या वेगळ्या आहेत.
> ‘आपण करू’ याचा वास्तविक अर्थ ‘तुम्ही करा’
> ‘तुम्ही खूप चांगले काम केले ’(अर्थात आता तुम्हाला आणखी काम दिले जाण्याची शक्यता आहे )
> यंदा आम्ही विचार करतोय (म्हणजे आम्ही आतापर्यंत कामास सुरुवात केलेली नाही )
> उद्या ऑफिसमध्ये आल्यानंतर सर्वप्रथम याच कामाच्या मागे लागायचे (अर्थात उद्याच्या उद्या हे काम पूर्ण होण्यासारखे नाही हे निश्चित.)
> आपण यावर नंतर चर्चा करू (निर्णय मी घेतलाच आहे फ क्त उद्या सांगेन एवढेच)
प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या नंबरवर किंवा इ-मेल करा
education@dainikbhaskargroup.com