आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामिडीया व अभिनयाच्या कोर्ससाठी प्रवेश परिक्षा
जामिया मिलीया इस्लामिया विद्यापीठाच्या एजेके मास कम्युनिकेशन रिसर्च सेंटरच्या वृत्तपत्रविद्या,संवाद आणि अभिनयाच्या पदव्युत्तर आणि डिप्लोमा कोर्ससाठी मे महिन्याच्या विविध तारखांना प्रवेश परिक्षा होणार आहे.
पात्रता
मास कम्युनिकेशन,कन्व्हर्जंट जर्नालिझम आणि डेव्हलपमेंट कम्युनिकेशनचे पीजी कोर्सेस,त्याचप्रमाणे स्टील फोटोग्राफी आणि व्हिज्युअल कम्युनिकेशन,अॅक्टींग च्या पीजी डिप्लोमा कोर्ससाठी 50 टक्के गुणांसह पदवी हवी. एमए इन व्हिज्युअल इफेक्टस आणि अॅनिमेशनसाठी पदवीसोबतच विडोंज व अॅडोबची माहिती आवश्यक.ब्रॉडकास्ट टेक्नॉलॉजीसाठी फिजीक्स,इलेक्ट्रॉनिक्स अथवा इंजिनियरींगमध्ये पदवी हवी.
निकाल - जून 2013
शुल्क : मास कम्युनिकेशनमध्ये एमए कोर्ससाठी शुल्क सुमारे 1 लाख 35 हजार रुपये.कन्व्हर्जंट जर्नालिझमसाठी 1.30 लाख,पीजी डिप्लोमा अॅक्टींग 55 हजार रु., पीजी डिप्लोमा इन ब्रॉडकास्ट टेक्नो.सुमारे 77 हजार रु.,पण नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा अॅक्टींग कोर्सचे शुल्क सुमारे 30 हजार रु. व माखनलाल चतुर्वेदी विद्यापीठाच्या पत्रकारिता एम.ए.कोेर्ससाठी 34 हजार रुपये.
प्रवेश परिक्षेच्या तारखा
एम.ए.कन्व्हर्जंट जर्नालिझम - 18 मे
एम.ए.मास कम्यु. - 19 मे
एम.ए.डेव्ह.कम्यु.- 25 मे
एम.ए.व्हिज्युअल इफेक्टस, अॅनिमेशन- 26 मे
पीजी डिप्लोमा इन स्टील फोटोग्राफी अँड व्हिज्युअल कम्यु. - 27 मे
पीजी डिप्लोमा इन ब्रॉडकास्ट टेक्नो. - 28 मे
पीजी डिप्लोमा इन अॅक्टींग - 29 मे
परिक्षेची पध्दत
पीजी डिप्लोमा इन ब्रॉडकास्ट टेक्नॉलॉजीसाठी 170 गुणांची परिक्षा असेल.तर मुलाखत 30 गुणांची असेल.उर्वरित सर्वच प्रवेश परिक्षा 200 गुणांची असेल तर मुलाखतीसाठी 45 गुण असतील.पोर्टफोलियोचे वेटेज 55 गुणांचे असेल.परिक्षेत दोन पेपर असतील.पहिल्या प्रश्नपत्रिकेत बहुविधपर्यायी 100 प्रश्न तर 100 अंकाचा दुसरी प्रश्नपत्रिका डिस्क्रिप्टीव्ह असेल.
अलीगडमधून जामियाची सुरूवात
जामिया मिलिया इस्लामियाची सुरूवात 1920 मध्ये मुस्लिम बुद्धिजीविंकडून उत्तर प्रदेशातील अलीगडमधून झाली. हे राष्ट्रीय मुस्लिम विद्यापीठ म्हणून गौरवले गेले. स्वातंत्र्य युद्धात 1924 मध्ये खिलाफत आंदोलन संपल्यानंतर विद्यापीठाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला होता. 1925 मध्ये त्याला दिल्लीत स्थलांतरीत करण्यात आले. 1962 मध्ये यूजीसीने त्यास अभिमत विद्यापीठाचा दर्जा दिला. 1988 मध्ये केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा मिळाला.
प्रसिद्ध चित्रपटातील न ऐकलेल्या गोष्टी
* मॉन्सटर्स इंकमध्ये बु ला आवाज देणारी मॅरी गिब्ज त्यावेळी इतकी लहान होती की तिला नीटपणे बोलताही येत नव्हते. या मुलीस एका ठिकाणी बसवून ठेवणे, माईकची प्लेसमेंट सांभाळणे, संवाद म्हणायला लावण्याचे काम प्रॉडक्शन टीमसाठी जिकिरीचे ठरले होते.
* अल्फ्रेड हिचकॉकचा चित्रपट द बर्ड्स मध्ये शेवटी द एंड देखील लिहिलेले नव्हते. प्रेक्षकांना चित्रपट संपल्यानंतरही पक्ष्यांचे भय कायम वाटावे, असा हिचकॉकचा उद्देश होता.
* चित्रपट 300 मध्ये सुमारे 1500 कट आहेत. 1300 व्हिज्युअल इफेक्ट आहेत.
दिव्य मराठी एक्स्पर्ट पॅनल
प्रोफेसर एम. ओमेद सिद्दीकी, संचालक, ए. जे.किडवई मास कम्युनिकेशन रिसर्च सेंटर
ज्यांची नॉलेज बँक आणि रायटिंग स्किल चांगली आहे, अशाच विद्यार्थ्यांना एजेके एमसीआरसीमध्ये प्रवेश मिळू शकतो. विद्यार्थ्यांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय राजकारण, व्यक्तीमत्वांची माहिती असली पाहिजे. त्याशिवाय सामान्य ज्ञान, चित्रपट, टीव्ही, मीडियाच्या इतर स्त्रोतांविषयी चांगले ज्ञान आवश्यक आहे. मुलाखत 10-20 मिनिटांची असते. 55 गुणांचा पोर्टफोलिओ असतो. त्यात विद्यार्थ्यांनी प्रसारमाध्यमाच्या क्षेत्रात केलेले कार्य, लेख, माहितीपट, इंटर्नशिप, डिबेट, संगीत, नाटकाच्या माध्यमातून ऑडिओ-व्हिज्युएल कामातून गुण दिले जातात. सिनेस्टार शाहरूख खान आणि पत्रकार बरखा दत्त यांनी देखील येथे शिक्षण घेतले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.