आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Divya Education: आयआयएम ट्रेंड्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढून
46 टक्क्यांवर मात्र, बंगळुरूत घट, दहापैकी
नऊ विद्यार्थी अभियांत्रिकी पार्श्वभूमीचे

आयआयएम संस्थांमधील 2014 वर्षासाठीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. बहुतांश संस्थांमधील या अभ्यासक्रमांच्या विद्यार्थीसंख्येत यंदा वाढ झाली आहे. मात्र, बंगळुरूच्या संस्थेत मागील दोन वर्षांच्या तुलनेत त्यात घट झाली आहे. अभियांत्रिकी पार्श्वभूमी नसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी संस्थांनी विशेष प्रयत्न केले होते. बहुतांश ठिकाणी अभियांत्रिकी पार्श्वभूमी नसलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण घटले. तरीसुद्धा, सर्व संस्थांमध्ये सरासरी दहामागे एकच विद्यार्थी अभियांत्रिकी पार्श्वभूमी नसलेला आहे.

विद्यार्थिनींना प्रवेशासाठी ग्रेस गुणांची सवलत
विद्यार्थिनी तसेच अभियांत्रिकी पार्श्वभूमी नसलेल्या विद्यार्थ्यांना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट संस्थांमधील प्रवेशासाठी 2011 पासूनच ग्रेस गुणांची सवलत दिली जाते. नव्याने सुरू झालेल्या सहा आयआयएम संस्थांनी याची सुरुवात केली होती. लखनऊच्या आयआयएममध्येसुद्धा ही सवलत 2011 मध्येच लागू करण्यात आली. कोलकाता आणि अन्य आयआयएम संस्थांनी 2012 पासून याचा अवलंब केला. यंदा जवळपास सर्वच आयआयएम संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना सवलती देण्यात आल्या.

प्रत्येक चार विद्यार्थ्यांमागे एक मुलगी, बंगळुरू सर्वात मागे
सर्व आयआयएम संस्थांमध्ये प्रथमच किमान 25 टक्के विद्यार्थिनींना प्रवेश मिळाला आहे. फक्त बंगळुरूच्या आयआयएमध्येच हे प्रमाण 23 टक्के राहिले. 2012 आणि 2013 मध्ये या संस्थेत 26 टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थिनी होत्या. जुन्या आयआयएम संस्थांपैकी लखनऊच्या संस्थेतच विद्यार्थिनींची संख्या सर्वाधिक आहे. 2013 मध्ये येथे 38 टक्के विद्यार्थिनी होत्या.

आयआयएम अहमदाबाद कोलकाता बंगळुरू लखनऊ इंदूर
विद्यार्थ्‍यांचे प्रमाण 30% 25% 23.39% 46% 27.94%
कोलकात्यात दोन वर्षांत अडीचपट झाली विद्यार्थिंनींची संख्या, मात्र अद्यापही सरासरीपेक्षा
कमीच
कोलकात्याच्या आयआयएममध्ये 2012 मध्ये फक्त 10 टक्के विद्यार्थिनींनाच प्रवेश मिळाला होता. यावर्षी येथे 25 टक्के विद्यार्थिनी आहेत, तरीसुद्धा ही संस्था बंगळुरूच्या पुढे आहे. अहमदाबादच्या आयआयएममध्येही 2012 च्या तुलनेत 2014 मध्ये विद्यार्थिनींच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. दोन वर्षांपूर्वीपर्यंत येथे फक्त 17 टक्केच विद्यार्थिनी होत्या.
अभियांत्रिकी पार्श्वभूमी नसलेले केवळ 10 टक्केच विद्यार्थी, लखनऊ यातही पुढे
2013 मध्ये सर्व आयआयएम संस्थांमध्ये प्रवेश घेणारे 83 ते 95 टक्के विद्यार्थी अभियांत्रिकी शाखेतील होते. यंदा जवळपास सर्वच संस्थांमधील अभियांत्रिकी पार्श्वभूमी नसलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले आहेत. मात्र, सुमारे 90 टक्के विद्यार्थी अद्यापही अभियांत्रिकी शाखेतीलच आहे. यापैकी सर्वाधिक 25.2 टक्के लखनऊ संस्थेत आहेत. परदेशातील हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये विज्ञान आणि अभियांत्रिकी पार्श्वभूमी नसलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण 39 टक्के आणि स्टॅनफोर्ड ग्रॅज्युएट बिझनेस स्कूलमध्ये 37 टक्के इतके आहे.

आयआयए अहमदाबाद बंगळुरू लखनऊ इंदूर
आयआयएमची पार्श्‍वभूमी नसलेले विद्यार्थी 11% 10% 25.2% 11%

जुन्या आयआयएमच्या तुलनेत
नवीन संस्था आघाडीवर

अकादमिक विविधतेच्या बाबतीत नव्याने सुरू झालेल्या आयआयएम संस्था जुन्या संस्थांपेक्षा आघाडीवर आहेत. बहुतांश नवीन संस्थांनी 2014 ची आकडेवारी जारी केली नसली तरी 2013 च्या तुलनेत यामध्ये विद्यार्थिनी आणि अभियांत्रिकी पार्श्वभूमी नसलेल्या विद्यार्थ्यांत अपेक्षेप्रमाणे वाढ झाली आहे. कोझीकोडच्या आयआयएममध्ये मागच्या वर्षी सुमारे 33 तर रोहतकच्या आयआयएममध्ये 25 टक्के अभियांत्रिकी पार्श्वभूमी नसलेले विद्यार्थी होते. संस्थांमध्ये यावर्षी अशाप्रकारच्या 10 टक्के विद्यार्थ्यांनाच कसबसा प्रवेश मिळाला आहे. रोहतकच्या आयआयएममध्ये 47.2 टक्के तर रायपूरच्या आयआयएममध्ये 35.2 टक्के विद्यार्थिनी होत्या. नव्याने सुरू झालेल्या आयआयएम संस्थांकडे स्वत:ची इमारत नाही आणि प्राध्यापकांच्या सुमारे 20 टक्क्यांपर्यंत जागा रिक्त आहेत.

विस्तृत माहिती मिळवण्यासाठी लॉग इन करा....
www.dainikbhaskar.com
लोकसेवेची पूर्वपरीक्षा देणारे विद्यार्थी फाउंडेशन कोर्स करू शकणार नाहीत
2013 मध्ये लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पुन्हा पूर्वपरीक्षा देत असतील तर ते यंदा फाउंडेशन कोर्समध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत. यापूर्वी ज्यांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे त्या विद्यार्थ्यांना पुन्हा हा कोर्स करणे अनिवार्य नसल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारा आयोजित नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करणा-या सर्वच विद्यार्थ्यांना मसुरीच्या लालबहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ अ‍ॅडमिनिस्ट्रेशनचा फाउंडेशन कोर्स करणे अनिवार्य असते. यानंतर त्यांना त्यांच्या सेवेनुसार विशेष प्रशिक्षणासाठी पाठवले जाते. 2013 च्या नागरी सेवा परीक्षेतून एकूण 1122 विद्यार्थ्यांची निवड झाली होती. त्यापैकी 982 उमेदवारांना अखिल भारतीय आणि केंद्रीय सेवेत नियुक्ती देण्यात आली आहे.

खरगपूरच्या आयआयटीत डिजिटल हॉल ऑफ फेम बनणार
देशातील आयआयटी सिस्टमचा विकास आणि यात योगदान देणा-या लोकांविषयी माहिती करून देण्यासाठी खरगपूरच्या आयआयटीमध्ये डिजिटल हॉल ऑफ फेम तयार केले जाणार आहे. संस्थेच्या 63 व्या स्थापना दिवसाच्या मुहूर्तावर मंगळवारी याची घोषणा करण्यात आली. यासाठी सुमारे 10 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. सोबतच संस्थेत एक लीडरशीप डेव्हलपमेंट सेंटर बनवण्याचीही योजना आहे. विवेकानंद सेंटर फॉर ह्युमन एक्सलन्स, थॉट लीडरशीप अँड हॉलिस्टिक डेव्हलपमेंट नामक हे केंद्र बनवण्यासाठी 15 कोटी रुपये खर्च येणार आहे. याच्या निर्माणासाठी दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे.

प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या नंबरवर किंवा ई-मेल करा
education@dainikbhaskargroup.com