आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article In Divya Education, JAM 2015, Divya Marathi

जॅम 2015 : आयआयटी आणि आयआयएससीच्या प्रवेशासाठी परीक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि आयआयटी संस्थेमध्ये एमएससी कोर्सच्या प्रवेशासाठी जॉइंट टेस्ट फॉर एमएससी (जॅम) 8 फेब्रुवारी 2015 रोजी परीक्षा होईल. विद्यार्थी यासाठी 9 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करू शकतात. या माध्यमातून विद्यार्थ्यांना एमएसीशिवाय इंटिग्रेटेड पीएचडी, एमएससी-एमएस आणि ड्यूएल डिग्री प्रोग्राम्समध्येही प्रवेश घेता येईल. यंदा जॅमचे आयोजन आयआयटी, गुवाहटी करणार आहे.

पात्रता
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगळुरू व आयआयटी, गुवाहाटीसाठी 60 टक्के गुणांसह पात्रता पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. बाकी सर्व आयआयटीजमध्ये 55 टक्के गुण आवश्यक आहेत.

निकाल : 19 मार्च 2015

शुल्क
एमएससी, इंटिग्रेटेड पीएचडी आणि ड्यूएल डिग्री कोर्सेसचे शुल्क सर्व संस्थांत वेगवेगळे आहे. आयआयटी, गुवाहाटी येथे एमएसीचे प्रतिसेमिस्टर शुल्क 3 हजार रुपये आणि आयआयटी, बॉम्बेमध्ये ड्यूएल डिग्रीचे शुल्क 45 हजार रुपये आहे.

-सात विषयांसाठी संगणकीकृत चाचणी
जॅम 2015 मध्ये जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र, गणित, जैवविज्ञान, भौतिकशास्त्र आणि गणितीय सांख्यिकी या सात विषयांसाठी परीक्षा घेतली जाईल. संपूर्ण संगणीकृत असणा-या या परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. मात्र, हे तीन वेगवेगळ्या नमुन्यात असतील.
एआयपीजीएमईई : मेडिकल कॉलेजात पीजी आणि डिप्लोमाच्या प्रवेशासाठी परीक्षा
वैद्यकीय महाविद्यालयांतील पदव्युत्तर आणि डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑल इंडिया पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एंट्रन्स एग्झामिनेशन (एआयपीजीएमईई)कडून 1 ते 6 डिसेंबरदरम्यान परीक्षा घेतली जाईल. विद्यार्थी यासाठी 10 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करू शकतात. यात उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोट्यातील 50 टक्के जागांसाठी एमडी, एमएस आणि पीजी डिप्लोमा अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जाईल.

स्पर्धा
6000 एकूण जागा (सुमारे)
75 हजार अर्ज (सुमारे)
पात्रता
एमबीबीएसच्या पदवीसोबतच एक वर्षाची अनिवार्य इंटर्नशीप आवश्यक. सध्या इंटर्नशीप करत असलेले विद्यार्थीसुद्धा अर्ज करू शकतात. मात्र, त्यांची इंटर्नशीप 31 मार्च 2015 पूर्वी पूर्ण व्हायला हवी.
शुल्क
सर्व संस्थांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी वेगवेगळे शुल्क आहे. पंजाबमधील पतियाळाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वार्षिक 33 हजार रुपये, तर हरियाणाच्या पीजीआयएमएसमध्ये 21 हजार रुपये वार्षिक शुल्क आहे.

मणिपाल विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश
मणिपाल विद्यापीठातील अ‍ॅनिमेशनच्या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थी 29 ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकतात. पात्रता परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे या अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जाईल.

पात्रता
कोणत्याही शाखेत बारावी उत्तीर्ण. परदेशी संस्थांमधून शिक्षण घेणारे विद्यार्थीसुद्धा यासाठी अर्ज करू शकतात.

शुल्क
अ‍ॅनिमेशनच्या पदवी अभ्यासक्रमासाठी वार्षिक 2 लाख रुपये शुल्क आहे. मेसराच्या बीआयटी संस्थेत यासाठी 1 लाख 15 हजार शुल्क आकारले जातात.
स्कूल ऑफ अर्काइव्हल स्टडीजच्या डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी प्रवेश
नॅशनल अर्काइव्हज ऑफ इंडियाची मान्यताप्राप्त स्कूल ऑफ अर्काइव्हल स्टडीज, नवी दिल्लीच्या डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थी 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकतात. प्रवेश पूर्व परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे या अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जाईल. यात उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अर्काइव्हज अँड रेकॉडर््स मॅनेजमेंटच्या डिप्लोमा अभ्यासक्रमाला प्रवेश मिळेल.

पात्रता
इतिहास, सामाजिकशास्त्र, शरीरविज्ञान विषयात 50 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण. इतिहासाच्या विद्यार्थ्यांसाठी 10 जागा आरक्षित आहेत.

शुल्क आणि स्कॉलरशीप
स्कूल ऑफ अर्काइव्हल स्टडीजच्या डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी 1500 रुपये शुल्क आहे. निवड झालेल्या दहा विद्यार्थ्यांना दरमहा 1500 रुपयांची स्कॉलरशीप दिली जाईल.

सर्व अभ्यासक्रमांची विस्तृत माहिती मिळवण्यासाठी लॉग इन करा...
www.dainikbhaskar.com

आयआयएम संस्थांना मिळणार इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनलला इम्पॉर्टन्सचा दर्जा
व्यवस्थापन शिक्षणाच्या बाबतीत देशात अव्वल असलेल्या आयआयएमला लवकरच इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्सचा दर्जा मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्र्यांच्या मते, याबाबतीत विधयेकाचा मसुदा तयार करण्यात आला असून कॅबिनेटची मंजुरी मिळताच तो लोकसभेत सादर केला जाईल. देशातील चार ट्रिपल आयटी संस्थांनासुद्धा हा दर्जा मिळण्याची शक्यता असून यात अलाहाबाद, जबलपूर, ग्वालियर आणि कांचीपुरम येथील संस्थांचा समावेश आहे. दर्जा प्राप्त झाल्यानंतर या संस्था विद्यार्थ्यांना पदवी देऊ शकतील आणि सरकारकडून मिळणा-या विशेष निधीसाठीही पात्र असतील.
बोर्डाच्या 19 टॉपर्सना बिट्स पिलानीमध्ये थेट प्रवेश
पिलानी, हैदराबाद आणि गोवामधील बिट्स पिलानीच्या तीन कॅम्पसमध्ये वेगवेगळ्या बोर्डाच्या 19 टॉपर्सना थेट प्रवेश देण्यात आला आहे. यात आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, उत्तर प्रदेश इत्यादी राज्यांतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. बिट्स पिलानीच्या पदवी अभ्यासक्रमासाठी विविध बोर्डाच्या टॉपर्सना कोणत्याही पूर्वपरीक्षेशिवाय थेट प्रवेश दिला जातो.

प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या नंबरवर किंवा ई-मेल करा
education@dainikbhaskargroup.com