आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजच्या एमबीए व डिप्लोमा कोर्सेसला प्रवेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये एमबीए आणि पीजी डिप्लोमा अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना 24 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येतील. हे अभ्यासक्रम मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरू कॅम्पस येथे आहेत. एमबीए अभ्यासक्रमासाठी 7 ऑक्टोबर ते 20 डिसेंबर या कालावधीत होणा-या ऑनलाइन टेस्ट एनमॅट, केस डिस्कशन आणि वैयक्तिक मुलाखतीच्या आधारावर प्रवेश मिळेल.

स्पर्धा
800 एकूण जागा
70 हजार अर्जदार (अंदाजे)
2 वर्षांचा अभ्यासक्रम

पात्रता
सर्व अभ्यासक्रमांसाठी 50 टक्के गुणांसह पदवी आवश्यक. एमबीए फार्मास्युटिकल मॅनेजमेंट कोर्सेसाठी फार्मसी, मेडिसिन, सायन्स, लाइफ सायन्स, बायोटेक्नॉलॉजीमध्ये पदवी असलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात.
निकाल : 22 जानेवारी

शुल्क
नरसी मोनजी इन्स्टिट्यूट येथे एमबीएचे वार्षिक शुल्क हे 2 लाख 30 हजार रुपये आहे. आयआयएम संस्थांत मॅनेजमेंट कोर्सेचे वार्षिक शुल्क हे 8 ते 16.60 लाख रुपयांपर्यंत असेल. एक्सएलआरआय जमशेदपूर येथे 2.60 शुल्क आहे.

चांगल्या गुणांसाठी पुन्हा परीक्षा देऊ शकतील विद्यार्थी
एनमॅटच्या पहिल्या प्रयत्नात विद्यार्थी समाधानी नसतील, तर त्यांना पुन्हा ही परीक्षा देता येईल. आपल्या युझर नेम आणि पासवर्डच्या आधारावर विद्यार्थ्यांना 17 डिसेंबरपर्यंत नोंदणी करता येईल. यातून ते 7 ऑक्टोबर ते 19 डिसेंबरपर्यंत सहभागी होऊ शकतील. दुस-या प्रयत्नात कटऑफमध्ये चांगले गुण घेतल्यास विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत जागा मिळेल.

सीटीईटी : शाळांत शिक्षक पदाच्या नियुक्तीसाठी होणार परीक्षा
केंद्र सरकारकडून नियंत्रण असलेल्या शाळांत शिक्षक पदाच्या नियुक्तीसाठी सीबीएसईकडून सेंट्रल टीचर इलिजिबिलिटी टेस्ट (सीटीईटी) 21 सप्टेंबर रोजी होईल. यासाठी विद्यार्थ्यांना 4 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येतील. या परीक्षेत उत्तीर्ण होणारे उमेदवार हे इयत्ता आठवीपर्यंत शिकवण्यास पात्र असतील. सीटीईटीचे पात्र उमेदवार हे राज्य शासनाच्या व खासगी शाळांत नियुक्तीस पात्र असतील.

पात्रता
पहिली पात्रता (पहिली ते पाचवीपर्यंत) : 50 टक्के गुणांसह 10+2 पद्धतीनुसार परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असून एलिमेंट्रीमध्ये पदवी किंवा पदविका अभ्यासक्रम आवश्यक आहे.
दुसरी पात्रता (सहावी ते दहावीपर्यंत) : पदवी आणि दोन वर्षांचा डिप्लोमा इन एज्युकेशन अभ्यासक्रम पूर्ण असावा किंवा 50 टक्के गुणांसह पदवी आवश्यक आणि एक वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण असावा. 10+2 उत्तीर्ण झाल्यानंतर बॅचलर इन एलिमेंट्री एज्युकेशन किंवा एज्युकेशनमध्ये पदवी आवश्यक आहे.

केमॅट : एमबीए, एमसीए आणि डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी परीक्षा
कर्नाटकच्या वेगवेगळ्या महाविद्यालयांत एमबीए, एमसीए व मॅनेजमेंटच्या पीजी डिप्लोमा कोर्सेसना प्रवेशासाठी केमॅट 3 ऑगस्ट रोजी होणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना 24 जुलैपर्यंत अर्ज करता येतील.

स्पर्धा
170 इन्स्टिट्यूट
50 हजार अर्जदार (सुमारे)
1 ते 2 वर्षांचा अभ्यासक्रम

पात्रता
50 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेत पदवी आवश्यक. यंदा अंतिम वर्षाला असलेले विद्यार्थीसुद्धा अर्ज करू शकतात.

शुल्क
सर्व संस्थांत वेगवेगळे शुल्क आहेत. व्हीआयटी, बंगळुरू येथे एमबीएचे वार्षिक शुल्क 72 हजार रुपये व व्हीआयटीएम बेल्लारी येथे 60 हजार रुपये.

जिंदाल ग्लोब युनिव्हर्सिटीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश
ओपी जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ इंटरनॅशनल अफेअर्सच्या मास्टर कोर्सला प्रवेशसाठी 18 जुलैपर्यंत अर्ज करता येतील. 20 जुलै रोजी होणा-या प्रवेशपूर्व परीक्षेनंतर येथे प्रवेश मिळतील.

पात्रता
कोणत्याही शाखेत पदवी. यंदा अंतिम वर्षांला असलेले विद्यार्थीदेखील अर्ज करू शकतात.
शुल्क
जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटीत एमए (डिप्लोमेसी, लॉ अँड बिझनेस) कोर्सेचे वार्षिक शुल्क 3 लाख रुपये आहे.
सर्व कोर्सेसची विस्तृत माहिती मिळवण्यासाठी लॉग इन करा....
www.dainikbhaskar.com
ओडिशात सीबीएसई धर्तीवर होणार शाळांचा अभ्यासक्रम
ओडिशा सरकार राज्यातील शाळांतील अभ्यासक्रम बदलण्याची तयारी करत आहे. आठवी ते बारावी वर्गापर्यंतचे अभ्यासक्रम सीबीएसईच्या धर्तीवर बदलण्याची योजना आहे. जेईई आणि एआयपीएमटीसारख्या परीक्षांत विद्यार्थ्यांना अडचण न येण्यासाठी हा बदल होत आहे. यंदा ओडिशात सुमारे 49 हजार विद्यार्थी जेईईमध्ये सहभागी झाले होते. मात्र, त्यापैकी केवळ 3200 विद्यार्थी पात्र झाले होते. एआयपीएमटी आणि एम्स प्रवेशपूर्व परीक्षेत राज्यातील विद्यार्थी चमकू शकले नाहीत. राज्य सरकार यात सुधारणा करण्यासाठी या अभ्यासक्रमात बदल करण्यास उत्सुक आहे.

प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या नंबरवर किंवा ई-मेल करा
education@dainikbhaskargroup.com