आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Divya Education, Divya Marathi, Career, Kolkata

Divya Education: आयआयएसडब्ल्यूबीएम, कोलकाताच्या मॅनेजमेंट कोर्समध्ये प्रवेश सूचना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाताच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वेल्फेअर अ‍ॅँड बिझनेस मॅनेजमेंटच्या मॅनेजमेंट कोर्सेसमध्ये प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. रिटेल मॅनेजमेंटच्या पीजी डिप्लोमा कोर्ससाठी विद्यार्थी 30 मेपर्यंत आणि पब्लिक सिस्टिम्स मॅनेजमेंटच्या मास्टर कोर्ससाठी 6 जूनपर्यंत अर्ज करू शकतात. पब्लिक सिस्टिम्स मॅनेजमेंट कोर्सअंतर्गत विद्यार्थी एनव्हायर्नमेंट, एनर्जी, ट्रान्सपोर्टेशन अ‍ॅँड लॉजिस्टिक्स तसेच हेल्थ केअर अ‍ॅँड हॉस्पिटल मॅनेजमेंटमध्ये स्पेशलायझेशन प्राप्त करू शकतात. सर्व कोर्सेस दोन वर्षांच्या मुदतीचे आहेत.
पात्रता
कोणत्याही शाखेचा पदवी प्राप्त विद्यार्थी या कोर्सेससाठी अर्ज करू शकतो. प्रवेशावेळी एनर्जी मॅनेजमेंट कोर्ससाठी विज्ञान आणि अभियांत्रिकी पदवीधर आणि हेल्थ केअर अ‍ॅँड हॉस्पिटल मॅनेजमेंट कोर्ससाठी मेडिकल किंवा बायोलॉजिकल सायन्सेसमध्ये पदवीधारक विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल.
निवड प्रक्रिया
पब्लिक सिस्टिम्स मॅनेजमेंट कोर्ससाठी विद्यार्थ्यांना कॅट, मॅट किंवा जीमॅट स्कोअरच्या आधारावर ग्रुप डिस्कशन आणि वैयक्तिक मुलाखतीसाठी निवडले जाईल. या तिघांना एकत्र करून गुणवत्ता यादी तयार केली जाईल. रिटेल मॅनेजमेंटच्या पीजी डिप्लोमा कोर्ससाठी विद्यार्थ्यांना लेखी परीक्षा, ग्रुप डिस्कशन आणि मुलाखत द्यावी लागेल. कॅट किंवा मॅटचा वैध स्कोअर असल्यास लेखी परीक्षा देण्याची आवश्यकता नाही.
शुल्क
आयआयएसडब्ल्यूबीएममध्ये पब्लिक सिस्टिम्स मॅनेजमेंट कोर्सचे वार्षिक शुल्क 1 लाख 50 हजार रुपये आणि रिटेल मॅनेजमेंट कोर्सचे 1 लाख 10 हजार रुपये आहे. बिट्स-पिलानीमध्ये एमबीए कोर्सचे वार्षिक शुल्क जवळपास 2 लाख 50 हजार रुपये आणि एक्सएलआरआय, जमशेदपूरमध्ये जवळपास 8 लाख रुपये आहे.


मॅनिट, भोपाळच्या एमबीए कोर्समध्ये प्रवेशासाठी कॅटचा वैध स्कोअर आवश्यक
मौलाना आझाद नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, भोपाळमध्ये एमबीए कोर्समध्ये प्रवेशासाठी विद्यार्थी 17 एप्रिलपर्यंत अर्ज करू शकतात. विद्यार्थ्यांना कॅट-2013च्या स्कोअरवर आधारित ग्रुप डिस्कशन आणि मुलाखतीसाठी निवडले जाईल. या तिन्ही बाबींतून गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
पात्रता
60 टक्के गुणांसोबत कोणत्याही शाखेची पदवी. एससी/एसटी विद्यार्थ्यांसाठी 55 टक्के गुण आवश्यक. या वर्षी शेवटच्या वर्षाची परीक्षा देत असलेले विद्यार्थीही अर्ज करू शकतात. याव्यतिरिक्त कॅट-2013चा वैध स्कोअर बंधनकारक आहे.
शुल्क
मॅनिटमध्ये एमबीए कोर्सचे शुल्क जवळपास 37 हजार प्रती सेमिस्टर आहे. एनआयटी, वारंगलमध्ये एमबीए कोर्सचे शुल्क जवळपास 50 हजार रुपये प्रती सेमिस्टर आणि एमएनएनआयटी, अलाहाबादमध्ये जवळपास 25 हजार रुपये प्रती सेमिस्टर आहे.
ज्ञान
शरीराच्या आतमध्ये जाऊन फोटो काढतो सर्वात लहान कॅमेरा
कीचेन एवढी मोठी बंदूक, पेनड्राइव्हसारखा दिसणारा संगणक- दैनंदिन जीवनात उपयोगी येणा-या या वस्तू दिखाऊ नव्हे, तर वास्तावातील आहेत. सर्वात छोट्या वस्तूंची माहिती जाणून घेऊयात...
टीव्ही स्क्रीन
2007 मध्ये गिनीज बर्ल्ड रेकॉडर््सने एमई-1602 ला जगातील सर्वात लहान टीव्ही स्क्रीन म्हणून मान्यता दिली. स्कॉटलंडची कंपनी मायक्रोएमिसिव्हने त्यांची निर्मिती केली आहे. 4 मि.मी. लांबी आणि 3 मि.मी. रुंदीच्या या स्क्रीनची जास्तीत जास्त क्षमता 30 हजार पिक्सल आहे.
कृत्रिम हृदय
अमेरिकी डॉ. रॉबर्ट जारविक यांनी ते तयार केले आहे. मे 2012 मध्ये 16 महिन्यांच्या एका मुलाच्या शरीरात ते 13 दिवसांसाठी ठेवले होते. याचे वजन 11 ग्रॅम होते, दुसरीकडे प्रौढ माणसाच्या कृत्रिम हृदयाचे वजन 900 ग्रॅम असते.
कॅमेरा
जर्मनीच्या फ्राउनहोफर इन्स्टिट्यूटच्या संशोधकांनी 2011 मध्ये हा डिस्पोजेबल कॅमेरा तयार केला होता. एक घनमिलिमीटर मोठा हा कॅमेरा शरीरामध्ये जाऊन फोटो काढू शकतो. 0.06 मेगापिक्सलचा हा कॅमेरा भविष्यात एंडोस्कोपीमध्ये वापरला जाऊ शकतो.
पर्सनल कॉम्प्युटर
यूएसबी डिव्हाइसप्रमाणे दिसणारा हा सर्वात लहान पर्सनल कॉम्प्युटर आहे. तो अ‍ॅँड्रॉइड ओएसवर चालतो. यामध्ये 1.2 गीगा हटर्झचे प्रोसेसर, एक जीबी रॅम आणि डाटा स्टोअरेजसाठी 64 जीबीचे मायक्रो एसडी कार्ड लावण्यात आले आहे.
मिनी गन
स्वित्झर्लंडच्या एक कंपनीने तयार केलेल्या या बंदुकीतील सर्व वैशिष्ट्ये सामान्य रिव्हॉल्व्हरप्रमाणे आहेत. यामध्ये 2.3 कॅलिबरच्या सहा गोळ्या आहेत. गोळी झाडल्यास 400 फूट प्रती सेकंदाच्या वेगाने ती बाहेर पडते.
प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या नंबरवर किंवा ई-मेल करा