आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Article On Divya Education, IIT Entrance Result, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Divya Education : आयआयटी प्रवेशपूर्व परीक्षेच्या निकालाचे विश्लेषण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशातील 16 इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि आयएसएम, धनबाद येथे प्रवेशासाठी जेईई- अ‍ॅडव्हान्सचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. जेईई- मेन परीक्षेच्या आधारे सुमारे एक लाख 54 हजार विद्यार्थ्यांची अ‍ॅडव्हान्सची निवड करण्यात आली होती. एकूण एक लाख 26 हजार नऊशे 97 विद्यार्थी अ‍ॅडव्हान्स परीक्षेत सहभागी झाले होते. यातील 27 हजार 151 विद्यार्थी हे 9 हजार 784 जागांसाठी पात्र ठरले. 2013 मध्ये 21 हजार 115 विद्यार्थ्यांची निवड झाली होती. दिव्य एज्युकेशनच्या तज्ज्ञांनी जाणून घेतली या निकालाची वैशिष्ट्ये
2013 च्या तुलनेत कमी झाल्या जागा, पात्र विद्यार्थ्यांची संख्या 28 टक्क्यांहून अधिक
गेल्या वर्षी आयआयटीत एकूण 9885 जागा होत्या. पण यंदा 9784 जागा आहेत. 2013 च्या तुलनेत 101 जागा कमी होऊनही पात्र होणा-या विद्यार्र्थ्यांची संख्या ही 28.5 टक्के वाढली आहे. यंदा एकूण 19,416 विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत स्थान मिळाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हा आकडा 3500 हजारांनी वाढला आहे. त्यामुळे विद्यार्थी आता नव्या पद्धतीला चांगले समजू लागले आहेत.

एका जागेसाठी 144 उमेदवार
2013 मध्ये सुरू झालेल्या जेईईच्या नव्या पद्धतीनुसार निवडीसाठी विद्यार्थ्यांना तीन परीक्षा द्याव्या लागतात. पहिल्यांदा जेईई- मेनमध्ये पात्र ठरावे लागते. त्यानंतर बारावी बोर्डात 20 जणांत स्थान मिळवावे लागते आणि जेईई अ‍ॅडव्हान्समध्ये चांगले गुण मिळवावे लागतात. यंदा जेईई मेनमध्ये जवळपास 14 लाख विद्यार्थ्यांनी 9784 जागांसाठी परीक्षा दिली. त्यानुसार पहिल्या फेरीसाठी प्रत्येक जागेसाठी सुमारे 144 विद्यार्थी होते. शेवटच्या टप्प्यात एक लाख 27 हजार विद्यार्थ्यांपैकी केवळ 19 हजार 416 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केली.

ट्रेंड्स
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गुण पद्धतीत वाढ, निवड पूर्वीपेक्षा जास्त कठीण
तज्ज्ञानुसार यंदा जेईई- अ‍ॅडव्हान्स परीक्षेत गुण पद्धतीत वाढ झाली आहे. गेल्या वर्षी सार्वधिक गुणसंख्या ही 332 एवढी होती. यंदा टॉपर असलेल्या चित्रांग मार्डिया याला 334 गुण मिळाले आहेत. याच प्रकारे सर्वोत्तम 100 मधील कट ऑफ लिस्टची गुणसंख्या ही 276 एवढी होती. यंदा हा आकडा वाढून 279 पर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे यंदा निवड प्रकिया ही अधिक जटिल झाली आहे. मात्र, यंदा आयआटीने आपल्या गुण पद्धतीत बदल केला होता. जेईई- अ‍ॅडव्हान्स पहिल्या पेपरमध्ये निगेटिव्ह गुणपद्धती नव्हती. दुस-या पेपरमध्ये निगेटिव्ह गुणपद्धती होती.
टॉप 100 मध्ये फक्त पाच मुली पात्र होणा-या मुलींची संख्या केवळ 11 टक्के
आयआयटी आणि आयआयएम या संस्थांत उत्तीर्ण होणा-या मुलींची संख्या ही यंदाही कमीच आहे. यंदा 100 मधील फक्त 5 मुलीच उत्तीर्ण झाल्या, तर पात्र होणा-या मुलींची संख्या ही केवळ 11 टक्के एवढीच आहे. आयआयटीजमध्ये मुले आणि मुलींचे प्रमाणे हे 10:1 असे आहे. आयआयएम येथे मुलींची संख्या वाढवण्यासाठी नियमांत अनेक बदल करण्यात आले आहेत. मात्र, आयआयटीमध्ये याचा काहीही परिणाम झाला नाही.

अधिक असेल कट ऑफ लिस्ट
तज्ज्ञानुसार यंदा गुण संख्या वाढल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कटऑफ लिस्ट हे अधिक असेल. गेल्या वर्षी 126 कटऑफ लिस्ट होती. मात्र, यंदा यात तीन चार गुणांनी वाढ होऊ शकते. यामुळे आवडते महाविद्यालयासाठी स्पर्धा वाढ शकते.

गुणवत्तेच्या आधारावर निवडा आपले पर्याय
अ‍ॅडव्हान्समध्ये पात्र होणा-या विद्यार्थ्यांना 20 ते 24 जूनपर्यंत आपले पर्याय निवडता येतील. आयआयटीने यंदा यासाठी नवीन व्यवस्था केली आहे. प्रत्येक विभागांत विद्यार्थ्यांना दुहेरी पर्याय मिळतील.गुणवत्तेच्या आधारावर विद्यार्थ्यांना असे पर्याय निवडता येतील.

गुणवत्ता यादी पर्याय
1-1000 महाविद्यालय आणि विषयाच्या निवडीसाठी बीटेक आणि एमटेक ड्यूअल अभ्यासक्रम
1000-3000 जुने आयआयटीमध्ये कोर आणि संशोधन विषयांशिवाय आयटी-बीएचयू,रुरकी आणि इंदूर, गांधीनगर किंवा हैदराबाद येथे नवे आयआयटी
3000-5000 जुने आयआयटीजमध्ये मायनिंग, जियोसायन्स याशिवाय नव्या आयआयटीजमध्ये कोअर ब्रँच
5000-70000 आयएसएम, धनबाद आणि रुरकी येथे मायनिंग, पेपर टेक्नॉलजी, अप्लाइड सायन्स यासारखे विषय

दिव्य मराठीच्या अर्काइव्हसाठी लॉग इन करा...
www.dainikbhaskar.com
दिव्य मराठी तज्ज्ञांचे पॅनल
यंदा निकालांत काही विशेष असे काहीच नाही. गुणवत्ता वाढीचे एक कारण म्हणजे या परीक्षेच्या नव्या पद्धतीचे विद्यार्थ्यांना चांगले आकलन झाले आहे. विद्यार्थी त्यांचे विकल्प कसे निवडतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
- डॉ. विवेक विजयवर्गीय, फॅक्टली, आयआयटी, जोधपूर

टॉपर्समध्ये गुणांची संख्या कमी झाल्याने आवडते इन्स्टिट्यूट आणि विषय निवडण्यासाठी स्पर्धा अधिक होईल. जे विद्यार्थी मागे राहतील त्यांना एनआयटीज हे पर्याय खुले असेल. जेईई-मेनचे कॉमन मेरिट लिस्ट ही जुलैच्या पहिल्या आठवड्यात येईल.
-ब्रजेश माहेश्वरी, कोटा

प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या नंबरवर किंवा ई-मेल करा
education@dainikbhaskargroup.com