आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Divya Education: मॅट सप्टेंबर 2014 च्या मॅनेजमेंटच्या संस्थांत प्रवेशासाठी अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनतर्फे आयोजित मॅनेजमेंट अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट (मॅट) साठी विद्यार्थ्यांना 25 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येतील. मॅटची परीक्षा ही 7 सप्टेंबर रोजी होणार आहे. कॉम्प्युटरवर आधारित परीक्षा ही 13 सप्टेंबर रोजी होणार आहे. मॅटच्या गुणांवर विद्यार्थ्यांना देशातील वेगवेगळ्या संस्थांत प्रवेश घेता येईल.

स्पर्धा
210 इन्स्टिट्यूट
1.20 लाख अर्जदार
2 वर्षांचा अभ्यासक्रम

पात्रता
कोणत्याही शाखेत पदवी आवश्यक. यंदा अंतिम वर्षाची परीक्षा देणारे विद्यार्थीदेखील अर्ज करू शकतात. निकाल सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात

शुल्क
सर्व संस्थांत वेगवेगळे शुल्क आहे. एमिटी युनिव्हर्सिटीमध्ये एमबीएचे वार्षिक शुल्क 2 लाख 48 हजार रुपये तर जेपी बिझनेस स्कूल नोएडा येथे 3 लाख रुपये .

एक वर्षाचा अभ्यासक्रम, परदेशी संस्थांत प्रवेश
बहुतांश मॅनेजमेंट संस्थांत मॅटचे गुण हे एक वर्षापर्यंत वैध असतात. म्हणजेच विद्यार्थ्यांना एकदा परीक्षा देऊन त्या आधारावर वर्षभर प्रवेश मिळवता येऊ शकतो. सप्टेंबरमध्ये होणा-या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना स्पेन युनिव्हर्सिटी कार्लोस-3 ऑफ माद्रिद येथेही प्रवेश घेता येऊ शकतो. येथे एमबीएचे अंदाजे शुल्क हे 11 लाख रुपये एवढे आहे.

आयआयएफटीच्या एमबीए अभ्यासक्रमाला प्रवेश
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड, नवी दिल्ली येथे एमबीए अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना 3 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येतील. लेखी परीक्षा, सामूहिक चर्चा आणि मुलाखतीच्या आधारे येथे प्रवेश मिळतील. लेखी परीक्षा ही 23 नोव्हेंबर रोजी होईल.

पात्रता
कोणत्याही शाखेत पदवी. यंदा अंतिम वर्षाला असलेले विद्यार्थीदेखील अर्ज करू शकतात. मात्र, त्यांनी 7 ऑक्टोबरपूर्वी पदवी मिळवणे आवश्यक आहे.

शुल्क
आयआयएफटीमध्ये एमबीएचे वार्षिक शुल्क हे 6 लाख 75 रुपये एवढे आहे. सिम्बायोसिस येथे एमबीएचे वार्षिक शुल्क हे अंदाजे 4 लाख 50 हजार रुपये एवढे आहे.
डीवाय पाटील विद्यापीठाच्या यूजी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश
पुण्यातील डी. वाय. पाटील विद्यापीठात बीएस्सी आणि एमबीए अभ्याक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना 26 जुलैपर्यंत अर्ज करता येतील. पात्रता परीक्षा गुणांच्या आधारे येथे प्रवेश मिळतील. यानंतर विद्यार्थ्यांना नर्सिंगच्या पदवी आणि पदव्युत्तर तसेच बायोटेक्नॉलॉजी, बायोइन्फर्मेटिक्स आणि मॅनेजमेंटच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश मिळेल.

पात्रता
बीएस्सी नर्सिंगसाठी जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक. बायोइन्फर्मेटिक्स आणि बायोटेक्नॉलॉजीच्या एमएस्सी कोर्ससाठी संबंधित विषयाची पदवी. एमएस्सी नर्सिंगसाठी एक वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.

शुल्क
डीवाय पाटील विद्यापीठात बीएस्सी नर्सिंगचे वार्षिक शुल्क हे 55 हजार रुपये आणि एमएस्सी नर्सिंगचे शुल्क 80 हजार रुपये आहे. बायोइन्फर्मेटिक्स आणि बायोटेक्नॉलॉजीच्या मास्टर कोर्सचे शुल्क 75 हजार व एमबीएचे शुल्क दीड लाख आहे.

पुणे विद्यापीठात प्रमाणपत्र अभ्यासक्रमांना प्रवेश
पुणे विद्यापीठाच्या अ‍ॅडव्हान्स कम्प्युटिंग आणि एम्बेडेड सिस्टिम डिझाइनच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना 7 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येतील. 9 व 10 ऑगस्ट रोजी होणा-या ऑनलाइन प्रवेशपूर्व परीक्षेनंतर या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळेल.

पात्रता
अ‍ॅडव्हान्स कम्प्युटिंग कोर्ससाठी कोणत्याही शाखेत बीई किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशनमध्ये पदव्युत्तर पदवी. एम्बेडेड सिस्टिमसाठी संबंधित शाखेत बीई किंवा बीटेक

शुल्क
पुणे विद्यापीठांतर्गत आयसीआयटी लिमिटेडकडून संचालित होणा-या अ‍ॅडव्हान्स कम्प्युटिंग कोर्ससाठी 70 हजार रुपये आणि एम्बेडेड सिस्टिम डिझाइनचे शुल्क 65 हजार आहे.

सर्व कोर्सेसची विस्तृत माहिती मिळवण्यासाठी लॉग इन करा....
www.dainikbhaskar.com
एक्स्चेंज प्रोग्रॅमअंतर्गत जपानला जातील सीबीएसई विद्यार्थी
द जपान ईस्ट एशिया नेटवर्क ऑफ एक्स्चेंज फॉर स्टुडंट्स अँड यूथ प्रोग्रॅम (जेनेसिस) अंतर्गत सीबीएसई आपल्या 182 विद्यार्थ्यांना जपानला पाठवण्याची तयारी करत आहे. यासाठी देशातील विद्यार्थ्यांची नावे मागवण्यात आली आहेत. शाळांना 23 जुलैपर्यंत विद्यार्थ्यांची नावे पाठवता येतील. नववी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी या योजनेत सहभागी होऊ शकतील. 28 ऑक्टोबरपासून 16 डिसेंबरपर्यंत तीन बॅचमध्ये विद्यार्थ्यांना जपानला पाठवण्यात येणार आहे. खर्च जपान सरकार करेल.

विद्यार्थ्यांसाठी यूजीसीचे ग्रीवान्स पोर्टल
यूजीसी मान्यताप्राप्त संस्थांत शिकत असलेले विद्यार्थी लवकरच आपल्या अडचणी ऑनलाइन ग्रीवान्स पोर्टल येथे मांडू शकतील. आयोग लवकरच याची सुरुवात करणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करून नवीन पॉलिसी तयार करण्यात येईल. कमिशनने सर्व संस्थांना पोर्टलची माहिती देण्यासाठी एका नोडल अधिका-याची नियुक्ती केली आहे.

प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या नंबरवर किंवा ई-मेल करा
education@dainikbhaskargroup.com