आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यू avenue: एमबीए इन आंत्रप्रेन्युअरशिप, व्यावसायिक कौशल्यांची शिकवण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका गॅरेजवर आपला व्यवसाय सुरू करणारे स्टीव्ह जॉब्स, लॅरी पेज, सर्जी ब्रिन आणि किरण मुजूमदार शॉ यांसारख्या उद्योजकांचे यश नव्या पिढीला उद्योजकता हेच करियर म्हणून निवडण्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे. यासाठी काही खास कौशल्ये विकसित व्हायला हवीत. ती प्रशिक्षण आणि सरावातून शिकता येतील. आंत्रप्रिन्युअरशिपमध्ये एमबीए हा अभ्यासक्रम तुम्हाला अापल्यात उद्योग-व्यवसायातील सर्व पैलू शिकवतो. याशिवाय या उद्योगात यश मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांचा विकासही करतो.
कामाच्या संधी
आंत्रप्रेन्युअरशिपमध्ये व्यवस्थापनाची पदवी कोणत्याही व्यक्तीसाठी संधीची नवी दारे खुली करते. यानंतर स्वत:चा उद्योग सुरू करण्याबरोबरच कंपन्यांमध्ये सीईओपासून कार्पोरेट मॅनेजर, डिपार्टमेंट मॅनेजर, बिझनेस कन्सलटंट आणि एम्प्लॉई सुपरवायझर अशा पदांपर्यंत मजल मारता येईल. शिवाय कॉम्प्युटर व माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात स्वयंरोजगाराच्या संधी आहेत. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, ग्राफिक डिझायनिंग व वेबसाईट डेव्हलपमेंटसारख्या सेवांमध्येही संधी मिळेल.
पात्रता
आंत्रप्रेन्युअरशिपमध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रमापासून पदवीपर्यंतचे अभ्यासक्रम अनेक संस्थांमध्ये करता येतात. एमबीए इन आंत्रप्रेन्युअरशिपसाठी किमान पदवी असणे आवश्यक आहे. या अभ्यासक्रमानंतर एखादा व्यवसाय सुरू करण्यापासून त्याच्या व्यवस्थापनाचे प्रशिक्षणही देता येऊ शकेल. याशिवाय इंटलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स आणि फंडिंगसंबंधी माहिती मिळवण्यातही यामुळे मदत होऊ शकते.

येथे करा कोर्स
>>आयआयएम अहमदाबाद, बंगळुरू आणि कोलकाता.
>> ऑल इंडिया मॅनेजमेंट असाेसिएशन सेंटर फॉर मॅनेजमेंट एज्युकेशन, नवी दिल्ली.
>>इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरिन ट्रेड (आयआयएफटी), नवी दिल्ली.
>>आंत्रप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, गुजरात.
>>नॅशनल सायन्स अँड टेक्नॉलॉजी आंत्रप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट, नवी दिल्ली.