आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • As Per Test Tenth Class Students Get Career Guidence

दहावीच्या विद्यार्थ्यांना चाचणीच्या निष्कर्षावर पुढील मार्गदर्शन देण्यात येईल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शालेय दशेतच विद्यार्थ्यांचा कल ओळखून योग्य मार्गदर्शन आणि समुपदेशन मिळाल्यास त्यांना आवडीनुसार करिअर निवडता येते. ही बाब लक्षात घेत नववीच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच दहावीच्या विद्यार्थ्यांचीदेखील चाचणी घेण्याचा विचार सुरू असल्याचे शिक्षण आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी सांगितले. चाचणीच्या निष्कर्षावर पुढील मार्गदर्शन देण्यात येईल, असेही ते म्हणाले.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत गुणवत्ता सुधारसाठी डॉ. भापकर यांच्या उपस्थितीत विभागीय माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने सोमवारी एक बैठक झाली. यात त्यांनी ही माहिती दिली. या वेळी सर्व डाएटचे प्राचार्य, प्राथमिक माध्यमिकचे शिक्षणाधिकारी, शहरातील सर्व शिक्षण विभागांचे अधिकारी, व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण विभागांचे अधिकारी उपस्थित होते. डॉ. भापकर म्हणाले, शैक्षणिक गुणवत्तेत महाराष्ट्राचे स्थान तिसरे असावे. पण 'असर'चे सर्वेक्षण चिंतेत भर घालणारे आहे. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना त्यांचा कल कोणत्या क्षेत्रात आहे याची कल्पना नसते. त्यामुळे आवड नसलेल्या क्षेत्रात ते जातात.

गुणवत्ता कमी
'असर'च्यामाहितीनुसार सर्वनिकष मूल्यमापन योजनेमुळे गुणवत्ता कमी झाली असा रिपोर्ट आला आहे. महाराष्ट्रातील शैक्षणिक गुणवत्ता ९४ टक्केवरून ७४ टक्के इतकी कमी झाली. विद्यार्थ्यांची मूल्यमापन पद्धती असली पाहिजे म्हणून शासनाने ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ असा निर्णय घेतला आहे. याचा मुख्य उद्देश हा शाळाबाह्य मुले शिकली पाहिजेत असा असल्याचे त्यांनी सांगितले.

तीन चाचण्या
प्रगतशैक्षणिक महाराष्ट्र या निर्णयानुसार वर्षभरातून तीन चाचण्या होतील. पहिली चाचणी ऑगस्टच्या शेवटी होईल. नंतर पायाभूत शैक्षणिक प्रगती किती प्रमाणात झाली हे समजेल. दुसरी चाचणी ही दिवाळी सुटीदरम्यान होईल. यात अभ्यासात कच्ची मुले, पक्की झाली काय? हे समजेल. तिसऱ्या चाचणीचे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल, असे भापकर म्हणाले.