आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Basic Education Teach Life Lasting Security Guarantee

Management Fanda: मूलभूत शिक्षण देते जीवनभर सुरक्षेची हमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घटना : 43 वर्षीय विधवा इंदू सुरवदे, ज्यांना लोक प्रेमाने इंदूताई म्हणतात. त्या मुंबईत पश्चिमेकडे असलेल्या गोरेगाव येथे राहतात. त्यांच्या कुटुंबातील सात मुलांपैकी कुणीही कधीच शाळेत गेले नाही. त्यांचे पतीही शिकले नव्हते. त्यांची एक छाेटीशी झोपडी अाहे अाणि सगळे सरकारी दस्ताऐवज जसे की, आधारकार्ड, मतदानकार्ड, रेशनकार्ड अाहे.

खूप पूर्वीपासून त्यांच्याकडे हे सर्व दस्ताऐवज अाहेत. त्यामुळे त्यांना वाटायचे की, सरकारी योजनांचा लाभ सहजपणे घेऊन ते सुरक्षित जीवन जगू शकतील. २००८ मध्ये त्यांच्या १८ वर्षीय थोरल्या मुलाचा अंधेरीत धावत्या रेल्वेखाली पडून मृत्यू झाला. इंदूताईंना रेल्वे क्लेम ट्रिब्यूनलच्या वतीने २०१३ मध्ये चार लाख रुपयांची मदत मंजूर झाली. परंतु, धोक्याच्या संशयामुळे प्रशासनाने ही मदत थांबवली. कारण चुकीने त्यांच्या नावाच्या ठिकाणी इंदूताई लिहिलेले हाेते. इंदूताईंच्या शपथपत्र अाणि इतर दस्तावेजांवरील नाव वेगळे हाेते. त्यामुळे प्रशासनाने ते स्वीकार केले नाही.

ही गाेष्ट अापल्या देशात कित्येक प्रकारच्या अाेळखपत्रांच्या जुन्या पद्धतींच्या कार्यपद्धतीमुळे उद‌्भवणाऱ्या समस्या अधाेरेखित करते. इंदूताईंचे नाव पहिले मतदान कार्डवर वेगळे हाेते. अाता त्यांनी दुसरे कार्ड बनवून घेतले. यामुळे असे झाले की, सगळ्या दस्तावेजांवर त्यांचे नाव चुकीचे लिहिले गेले अाणि शपथपत्रावर वेगळे हाेते. सध्या त्या इतर दस्तावेजांवरही अापले नाव बराेबर करून घेत अाहेत. जितके पैसे त्यांना मदत स्वरूपात मिळणार अाहेत, त्याहून अधिक पैसे कदाचित याकामी खर्च हाेऊ शकतात.

घटना: गाेव्यात प्रवासादरम्यान माझी भेट शर्ली डिसुझा यांच्याशी झाली. त्या ५३ वर्षांच्या अाहेत, तरीही गेल्या दाेन वर्षांपासून शाळेत जात अाहेत. त्यांना या गाेष्टीवर गर्व नाही की, त्यांना या शिक्षणामुळे अाता मातृभाषा काेकणीमध्ये लिहिता येते अाणि काही सरकारी कागदपत्रांवर स्वाक्षरी करता येत अाहे. पहिल्या त्यांच्या दस्तावेजांवर अंगठ्याचे ठसे हाेते, पण अाता त्या या गाेष्टीनेदेखील खूश अाहेत की, त्यांना राेजच्या खरेदीसाठी बाजारात घेऊन जाणाऱ्या बसेसची पाटीही वाचता येते.

वाचता येऊ शकण्याची क्षमता अंगीकारल्याने अाता त्यांच्या डाेळ्यात चमक अाहे. त्या म्हणतात, ‘अाता मी बसवर लावलेली पाटी वाचू शकते. कंडक्टर, ड्रायव्हर मला सन्मानाची वागणूक देतात. मला वाईट वागणूक देणाऱ्या मुलांशी अाणि कंडक्टरशी याबाबत विचारण्याची गरज पडत नाही.’ दहा मिनिटांच्या या बाेलण्यात त्यांनी चार वेळा उल्लेख केला की, कशाप्रकारे त्या कुणाच्या मदतीविना गाेव्याची राजधानी पणजीला गेल्या अाणि चार दिवस तिथे एकट्या राहिल्या. जणू काही त्यांनी अमेरिकेचीच टूर केली असावी.

सध्या त्या अापल्या पूर्ण परिवारासाठी सरकारी कागदपत्रे, जसे की रेशनकार्ड, पॅनकार्ड, अाधारकार्ड बनवण्याच्या कामात अाहेत. त्यांचे वडील अाणि पतीची एक एकर जमीन अाहे. स्थानिक दलालाने जेव्हा कागदपत्रांच्या फेरफारीतून त्यांची फसवणूक करून कब्जा मिळवला, तेव्हा त्यांच्या कुटुंबाला शिक्षणाची गरज कळली. तेव्हा शर्ली यांना शिक्षण घेण्यास सांगण्यात अाले. हे कुटुंब गाेवा काेर्टात न्यायासाठी लढत अाहे अाणि यासाठी शर्लीला पुन्हा-पुन्हा गाेव्याला जावे लागते. भारत स्वतंत्र झाला तेव्हा २६विश्व विद्यालय, ६५० काॅलेजांत फक्त चार लाख लाेक शिक्षण घेत हाेते. सरकारी प्रयत्नातून २०१५ मध्ये १२ वर्षांपर्यंत जवळपास ९५ टक्के मुलं शिक्षण घेत अाहेत.