आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BHU Admission Notice: MBA And MBA Internatioanal Admission

बीएचयू प्रवेश सूचना : बनारस हिंदू विद्यापीठाच्या एमबीए आणि एमबीए इंटरनॅशनल बिझनेसमध्ये प्रवेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बनारस हिंदू विद्यापीठाच्या फॅकल्टी ऑफ मॅनजमेंट स्टडीजच्या एमबीए व एमबीए इंटरनॅशनल बिझनेसमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थी आता अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर आहे. दोन्ही कोर्ससाठी 46-46 जागा आहेत.


पात्रता
दोन्ही कोर्ससाठी कृषी, तंत्रज्ञान, औषधशास्त्र, शिक्षण किंवा विधी पदवी किंवा कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी. संबंधित पदवीत 50 टक्के गुणांची अट. अनुसूचित जाती, जमाती वर्गासाठी 45 टक्के.
फीस : दोन्ही कोर्ससाठी वार्षिक फीस 28,492 रुपये आहे. होस्टेल फीस वार्षिक 6400 रुपये आहे. आयआयटी मद्रासच्या डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये एमबीएची एकूण फीस 2 लाख 70 हजार रुपये आहे. खासगी संस्था सिम्बायोसिसमध्ये या कोर्सचे एकूण वार्षिक शुल्क सुमारे पाच लाख रुपये आहे.


निवड प्रक्रिया
आयआयएमच्या कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट(कॅट) परीक्षेच्या आधारावर दोन्ही कोर्समध्ये प्रवेश दिला जाईल. अर्जदार विद्यार्थ्यांची तीन मानकानुसार निवड केली जाईल. कॅट स्कोअरला 50 टक्के, अकॅडमिक्स रेकॉर्ड्सला 20 टक्के आणि वैयक्तिक मुलाखतीला 30 टक्के महत्त्व दिले जाईल. विद्यार्थी या वर्षीच्या कुठल्या पात्रता परीक्षा देत असेल तर गेल्या दोन किंवा तीन वर्षांतील (दोन्हीपैकी एक) गुण लक्षात घेतले जातील.


जास्त वयाच्या विद्यार्थ्याला प्राधान्य
एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना समान गुण असतील तर पात्रता परीक्षेच्या आधारे त्यांची निवड केली जाईल. मात्र, या परीक्षेतही सारखेच गुण पडल्यास ज्या विद्यार्थ्याचे वय जास्त आहे त्याला प्राधान्य दिले जाईल.


न्यूज
वेबसाइटवर विद्यालयाची माहिती नसेल
तर विद्यार्थ्यांना परीक्षेत सहभागी होणे कठीण
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची (सीबीएसई) मान्यता असलेल्या सर्व विद्यालयांना वेबसाइट धोरणाची सक्ती करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 15 सप्टेंबरपर्यंत सर्व ती आवश्यक माहिती संकेतस्थळावर अपलोड करावी, अन्यथा विद्यार्थ्यांना मंडळाच्या परीक्षेला बसताना अडथळा येऊ शकतो. मंडळाकडून दोन वर्षांपासून विविध शाळांना अशी ताकीद देण्यात आली आहे. परंतु बहुतेक शाळांमध्ये असे बदल झालेले दिसत नाहीत. जर या शाळा अजूनही असे करू शकणार नसतील तर नववी व दहावीमधील त्यांच्या विद्यार्थ्यांची नोंदणी होऊ शकणार नाही आणि त्याला शाळाच जबाबदार असेल.


हिंदू धर्माच्या ज्ञानकोशाच्या सन्मानार्थ
अमेरिकी विद्यापीठात वर्षभर जल्लोष

25 वर्षांच्या परिश्रमानंतर साऊथ कॅरोलिनाच्या प्रोफेसर डॉ. मीरा नरसिंहन यांच्या नेतृत्वाखाली अलीकडेच ‘एनसायक्लोपीडिया ऑफ हिंदुइझम’ तयार करण्यात आला. त्यानिमित्ताने विद्यापीठाने वर्षभर भारत महोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीयीकरण कार्यक्रमाचा एक भाग आहे. त्याअंतर्गत दरवर्षी एका देशाची निवड केली जाणार आहे. 11 खंडांत हा ज्ञानकोश तयार करण्यात आला असून त्यात हिंदू धर्माविषयी 7 हजारांहून अधिक इंग्रजी लेख आहेत. डॉ. नरसिंहनसोबत एक हजाराहून अधिक विद्वानांनी त्यात सहभाग घेतला होता.


Things that define these uncommon colors...


1. Teal: The greenish-blue hue of teal has become a common presence in corporate offices. The name derives from a much more natural source: the colors that surround the eye of the Common Teal, a duck that thrives in Europe and Asia.
2. Periwinkle: Periwinkle is the name of a plant and a sea snail, but the color is linked to the cool blue flower of the vine-like evergreen. The word derives from the Latin “pervincire,” to entwine.
3. Capri: Imagine living in a place where the water is such a vibrant blue that a color is named after the aquatic sight. Capri is described as a blue between azure and cyan. It is also a Mediterranean island off the coast of Italy.
4. Vermilion : The odd reddish portions of this crystal are a nasty mix of mercury and sulfur. If vermilion, another name for this color, reminds you a little of the word “worm,” congratulations. Vermilion derives from a term meaning larva because ingredients for a related dye came from the crushed bodies of insects.


शब्द - लफ्ज - word
> उष्‍णता- उमस- intense heat
> तहक्कुम- अधिकार- authority
> Endurance - सहनशीलता - तहम्मुल


प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या क्रमांकावर किंवा ई-मेल करा
education@dainikbhaskargroup.com