आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12वी नंतर फूड अँड न्यूट्रिशन एक्स्पर्ट म्हणून करिअरची संधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फूड आणि न्यूट्रिशन एक महत्त्वाचे आणि वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. या क्षेत्रात रोजगाराची संधी प्रचंड उपलब्ध आहेत. बारावी विज्ञान उत्तीर्ण झाल्यानंतर बीएस्सी होम सायन्समध्‍ये प्रवेश घेऊन फूड अँड न्यूट्रिशन एक्स्पर्ट म्हणून करिअर करता येऊ शकते. डायटेटिक्स म्हणजे आहारशास्त्र हे आपल्या आरोग्याशी संबंधित असे शास्त्र आहे. यात अन्न आणि पोषण अर्थात न्यूट्रिशनवर पूर्ण लक्ष दिले जाते. रोजगाराचा विचार केल्यास हे एक नवे करिअर तरुणाईसाठी उपलब्ध झाले आहे.
एकीकडे आहारशास्त्र आपल्या खाणपानाच्या व्यवस्थापनाशी संबंधित आहे तर दुसरीकडे न्यूट्रिशन प्रत्यक्ष आपल्या आरोग्याशी जोडलेले आहे. आज शहरी लोकांची आहारपध्‍दती बदल्याने फूड अँड न्यूट्रिशन एक्स्पर्टची भूमिका खूप महत्त्वाची बनली आहे. एक्स्पर्ट हे लोकांचे वय, त्यांच्या कामाच्या स्वरुपावरुन आणि रुग्णाला चांगले आहार सूचवू शकतात. यामुळे लोक आरोग्यदायी राहतात. तसेच ती लोकांना अन्न पदार्थ तयार करण्‍याच्या पध्‍दती शिकवतात. याने खाण्‍यात पौष्टिक घटकद्रव्ये टिकून राहतात.

डायटिशियन आणि न्यूट्रिशनिस्ट यांच्या दरम्यान एक महिन्याचा अंतर असतो. डायटिशियन किंवा आहारतज्ज्ञ हे सर्वसाधारणपणे हॉस्पीटल्स, क्लीनिक, हेल्थ केअर सेंटर, सार्वजनिक समारंभ किंवा फीटनेस सेंटरशी संबंधित किंवा आपले क्लिनिक्स चालवतात. दवाखान्यात आणि क्लीनिकमध्‍ये रुग्णांसाठी कशा पध्‍दतीचे जेवण शिजवले जावे या सर्वांची काळजी आहारतज्ज्ञ घेत असतात. दुसरीकडे न्यूट्रिशनिस्ट अन्नपदार्थांच्या विश्‍वात संशोधनाशी जोडले गेलेले असतात. आहारशास्त्रच्या क्षेत्रातील तज्ज्ञ फास्ट मुव्हिंग कंझ्युमर गुड्सच्या विश्‍वात नेहमी संशोधन करित असतात.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...