आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य एज्युकेशन: कचरा व्यवस्थापनात करिअर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येत्या 10 वर्षांत सात लाखांहून अधिक नोकर्‍या, 10 टक्के उमेदवारांनाच चांगले पॅकेज मिळणार
‘नेचर’ या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, पुढील 12 वर्षांत दक्षिण आशिया आणि विशेषत: भारत कचरा व्यवस्थापनात जगात सर्वात अग्रेसर असेल. 2100 पर्यंत दक्षिण आशियात दररोज 20 लाख टन कचरा निर्मिती होईल. हे प्रमाण 34 विकसित देशांच्या कचर्‍याएवढ्या असेल. केवळ भारतात तयार होणारा कचरा सर्व विकसित आणि ओईसीडी देशांमध्ये तयार होणार्‍या एकूण कचर्‍याच्या 70 टक्के एवढा असेल. चिरंतन विकास आणि पर्यावरण रक्षणासाठी कचरा व्यवस्थापन आवश्यक आहे. भारतात सरकारतर्फेही कचरा विल्हेवाटीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध प्रकाच्या सवलती दिल्या जात आहेत. त्यामुळेच करिअरचा हा पर्याय विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी ठरू शकतो. भारतात 2025 पर्यंत या क्षेत्रात 7 लाखांहून अधिक नोकर्‍या निर्माण होतील, असा अंदाज आहे.

देशात 12 टक्के कचर्‍यावरच प्रक्रिया
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, 2000 मध्ये देशात दररोज एक लाख टन घन कचरा निर्माण होत असे. 2011-12 मध्ये हा आकडा सुमारे एक लाख 27 हजार टन झाला. यापैकी 70 टक्के कचरा साठवला जातो. मात्र, फक्त 12.45 टक्के कचर्‍यावरच प्रक्रिया होते. कचरा पुनर्निर्मितीचा थेट संबंध शहरीकरण आणि आर्थिक विकासाशी आहे. हे प्रमाण नियंत्रित करणे कठीण आहे. मात्र, कचरा व्यवस्थापनाद्वारे हा धोका कमी करता येऊ शकतो.

विविध क्षेत्रांत नोकरीच्या संधी
कचरा व्यवस्थापनात करिअर करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी सरकारी विभाग, अशासकीय संघटना, कॉर्पोरेट सेक्टर व खासगी कंपन्यांमध्ये नोकरीची संधी आहे. निर्मिती करणार्‍या कंपन्या- विशेषत: फार्मास्युटिकल, केमिकल, प्लास्टिक किंवा फूड प्रॉडक्ट्स तयार करणार्‍या कंपन्यांमध्ये कचरा व्यवस्थापनाची गरज असते. येथे सॉलिड वेस्ट मॅनेजर, ई-वेस्ट प्रोफेशनल, रिसायकलिंग सुपरवायजर, वेस्ट इंजिनिअर, इन्स्पेक्टर किंवा कम्युनिकेशन मॅनेजरची पदे असतात.

भविष्यात संधी वाढणार..
1900 मध्ये जगात दररोज 3 लाख टन कचरा तयार होत होता. 2025 पर्यंत हा आकडा 60 लाख टनपर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे. त्रदेशात दरवर्षी 4.34 लाख मेट्रिक टन ई-कचरा तयार होतो. दरवर्षी प्रत्येक व्यक्तीमागे वेस्ट जनरेशन 1.33 टक्के दराने वाढत आहे. कचरा विल्हेवाटीचे काम सुनियोजित नाही. कचरा करण्यापासून प्रोसेसिंगपर्यंत असंघटित क्षेत्राची मोठी भूमिका आहे.
सर्व कोर्सेसची विस्तृत माहिती मिळवण्यासाठी लॉग इन करा....
www.dainikbhaskar.com

10+2 नंतर मॅनेजमेंट व इंजिनिअरिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश
कचरा व्यवस्थापनासंबंधी पदवी, डिप्लोमा आणि सर्टिफिकेट कोर्स देशभरातील संस्थांमध्ये उपलब्ध आहे. बहुतांश संस्थांमध्ये हे पर्यावरणशास्त्रात समाविष्ट आहे. आयएसएम-धनबाद आणि दिल्ली विद्यापीठासारख्या उच्च संस्थांमध्ये बीई किंवा बीटेक अभ्यासक्रमाला प्रवेश परीक्षेआधारे प्रवेश दिला जातो. या संस्थांमध्ये प्रत्येक जागेसाठी शंभराहून अधिक उमेदवार असतात. मास्टर्स कोर्स करणारे विद्यार्थी टेरी युनिव्हर्सिटी, सेंटर फॉर वेस्ट मॅनेजमेंट-तामिळनाडू व जेएनयू-हैदराबादमध्ये प्रवेश घेऊ शकतात.

3-4 लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज
कचरा व्यवस्थापन क्षेत्रात पदवीपूर्व अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांचे सुरुवातीचे पॅकेज 3 ते 4 लाख रुपयांपर्यंत असते. उच्च शिक्षण व अनुभवाच्या आधारे सतत वाढ होते. सरकारी क्षेत्रापेक्षा कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जास्त पॅकेज आणि करिअर ग्रोथच्या शक्यता अधिक असतात. मात्र, मोठ्या कंपन्यांमध्ये पर्यावरणशास्त्रात बीई किंवा बीटेकनंतर एमबीए करणार्‍यांना प्राधान्य दिले जाते. मात्र, 10 ते 15 टक्के उमेदवारच या सर्व पात्रता पूर्ण करणारे असतात.

देशात 17 लाख मुले अजूनही शाळेविनाच!
महत्प्रयासानंतरही देशभरात सुमारे 17 लाख 24 हजार मुले अजूनही शाळेत जात नाहीत. राज्य व केंद्रशासित प्रदेशांकडून मिळालेल्या ताज्या आकडेवारीनुसार, राजस्थानमधील सर्वाधिक 2.98 लाख मुले शाळेत जात नाहीत. त्यानंतर झारखंड (2.44 लाख) आणि बिहार (1.81 लाख) चा क्रमांक लागतो. 2009 च्या तुलनेत शाळेत न जाणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे. तेव्हा देशभरातील 81 लाख 50 हजार मुले शाळेत जात नव्हते.

ओडिशात इंजिनिअरिंगच्या 50 % जागा रिक्त राहण्याचा धोका
गुजरात व महाराष्ट्राप्रमाणेच ओडिशातील खासगी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये या वर्षी 50 टक्के जागा रिक्त राहण्याची भीती आहे. ओडिशात इंजिनिअरिंगच्या 44 हजार जागा आहेत. मात्र, ओडिशा जॉइंट एंट्रन्स एक्झामच्या आधारे सोमवारपर्यंत झालेल्या नोंदणीनुसार, निम्म्या जागांसाठीही विद्यार्थ्यांनी आवडीचा पर्याय म्हणून त्याची निवड केली नाही. या राज्यात मागील वर्षीही सुमारे 24 हजार जागा रिक्त होत्या.

प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या नंबरवर किंवा ई-मेल करा
education@dainikbhaskargroup.com