आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाचा, CAT परीक्षेत कोणते महत्त्वाचे बदल झाले आहेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिझनेस स्कूल्समध्‍ये अॅडमिशन करिता 29 नोव्हेंबर रोजी होणा-या कॉमन अॅडमिशन टेस्टमध्‍ये(कॅट)महत्त्वाचे बदल करण्‍यात आली आहे. या बदलानुसार ही परीक्षा एकाच दिवशी दोन सत्रात(सेशन) होणार आहे. अधिसूचनेनुसार परीक्षेची वेळ 170 मिनिटांऐवजी 180 मिनिटे असणार आहे. यावेळी परीक्षेत 3 विभाग(सेक्शन) असतील यात Quantitative Aptitude (QA), Data Interpretation and Logical Reasoning (DILR) आणि व्हर्बल अँड रीडिंग कॉम्प्रिहेन्शनचा समावेश असेल.

तसेच यावेळी एक ऑनस्क्रीन कॅलक्युलेटर आणि नॉन मल्टिपलचॉईस(डायरेक्ट) प्रश्‍नही असतील. प्रसिध्‍द करण्‍यात आलेल्या अधिसूचनेनुसार ट्युटोरियलमध्‍ये नॉन मल्टिपलचॉइस प्रश्‍नांविषयी सांगितले जाईल. या वर्षी उमेदवाराला प्रत्येक सेक्शनच्या प्रश्‍नांची उत्तरे देण्‍यासाठी 60 मिनिटे दिली जातील आणि एका सेक्शनची उत्तरे देताना दुस-सा सेक्शनला स्वीच करु शकत नाही. मॅट परीक्षा 136 शहरांतील 650 केंद्रांवर होणार आहे. यावेळी सर्व प्रश्‍न ऑब्जेक्टिव्ह नसतील.परीक्षार्थींनी कॅलक्युलेशन करिता बेसिक ऑनस्क्रीन कॅलक्युलेटर वापरायला परवानगी असेल. काही प्रश्‍न हे वर्णनात्मकही असतली आणि त्यासाठी कोणतीही नकारात्मक गुणांकन पध्‍दत नसेल. कॅट-2015 चे संयोजक प्रा. बंडोपाध्‍याय यांनी सांगितले, की उमेदवारांनी पहिली पसंत दिलेली परीक्षा केंद्रे उपलब्ध करुन देण्‍याचा प्रयत्न असेल.अर्ज करण्‍याच्या प्रक्रिये संबंधित प्रश्‍न सोडवायला हेल्पडेस्क तयार केला गेला आहे.
महत्त्वाच्या तारखा
अर्ज करण्‍याची तारिख : 6 ऑगस्ट
अर्जाची शेवटीची तारिख: 15 ऑक्टोबर
कॅट परीक्षा : 29 नोव्हेंबर