आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंजिनिअरिंग कॉलेजसमधील प्रवेश प्रक्रियेत बदल, 12वीच्या गुणांना महत्त्व नसणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयआयटी व्यतिरिक्त इतर सर्व केंद्रीय इंजिनिअरिंग संस्थांमध्‍ये प्रवेशासाठी बारावीचे गुणांना महत्त्व राहणार नाही. एनआयटी, ट्रीपल आयटी आणि केंद्र सरकारकडून आर्थिक साहाय्य मिळणा-या इंजिनिअरिंग महाविद्यालयांमध्‍ये 40 टक्के वेटेज 10+2च्या गुणांना दिले जाते. परंतु सेंट्रल सीट अलोकेशन बोर्डाने (सीएसएबी) ही जुनी पध्‍दत बंद करण्‍याचा प्रस्ताव पाठवला आहे. केंद्रीय मनुष्‍यबळ विकास मंत्रालयाच्या मंजुरीनंतर 2017 पासून लागू केले जाऊ शकते. मात्र यास आतापासूनच विरोध व्हायला सुरुवात झाली आहे. टीकाकारांच्या मते, यामुळे विद्यार्थी बारावीला महत्त्व देणार नाही. दुसरीकडे सीएसएबी प्रवेश प्रक्रियेतील विलंब आणि चुका कमी कशी होतील यावर काम करित आहे.

जेईई-मेनच्या आधारावर मिळेल प्रवेश : सीएसएबीचा प्रस्ताव स्वीकारला गेल्यास केंद्र सरकारच्या अंतर्गत इंजिनिअरिंग महाविद्यालयांमध्‍ये विद्यार्थ्‍यांना केवळ जेईई-मेनच्या गुणांच्या आधारावर प्रवेश मिळेल. 2012 मध्‍ये जेईई-मेन आणि अॅडव्हान्स अशी द्व‍िस्तरीय व्यवस्था लागू झाल्याने एनआयटी आणि इतर सरकार अनुदानित टेक्निकल संस्थांमध्‍ये प्रवेशासाठी बारावीच्या गुणांना वेटेज देण्‍याची तरतुद होती.

बदलाचे कारण : विद्यार्थी प्रमाणात जास्त फरक नाही. पण रेकॉर्ड वेळेवर संबंधित मंडळ मिळत नाही. देशात 47 उच्च माध्‍यमिक मंडळ आहेत. जेईई-मेनची सामायिक गुणवत्ता यादी तयार करण्‍यासाठी त्यांना आपले गुण सीबीएसईकडे पाठवावे लागतात. परंतु परीक्षा मंडळे वेळेत गुणांचा तपशील पाठवत नाही. या वर्षीही या निष्‍काळजीपणामुळे सीट अलोकेशन प्रक्रियेवर जवळ-जवळ एक आठवडा उशीर झाला.

परीक्षा मंडळांनी पाठवलेल्या रेकॉर्डमध्‍ये चुका असतात. परंतु याची माहिती सीट अलॉटमेंटनंतर कळते. त्यावेळी यात सुधारणा व्हायची शक्यता कमी असते आणि पात्र विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहतात. शिक्षण संस्थांच्या अंदाजानुसार नवी पध्‍दत अवलंबूनही प्रवेश घेणा-या विद्यार्थ्‍यांच्या प्रमाणात विशेष असा फरक पडला नाही.

अनेक परिणाम होतील - विद्यार्थी शालेय अध्‍ययनाला कमी महत्त्व देतील. कोचिंग क्लासेसचे महत्त्व वाढेल. या कारणामुळे 2012 मध्‍ये नवी पध्‍दत लागू केले होते. अनेक विद्यार्थी बारावी सोडून आयआयटीची तयारी करु लागतील. याचा परिणाम आयआयटी प्रवेश परीक्षा पास, मात्र बारावीत कमी गुण मिळाले असते. यात कोचिंग क्लासेसचे महत्त्व वाढले असते. यात विद्यार्थ्‍यांना फक्त जास्त गुण कसे मिळवायचे याचे प्रशिक्षण दिले जाते. सीएसएबीचा प्रस्ताव मंजूर झाल्यास कोचिंग क्लासेसचे महत्त्वा वाढले असते.