आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Divya Education: मुद्रा इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रवेश सूचना
अहमदाबादच्या मुद्रा इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशनच्या फेलो प्रोग्रामला (एफपीएम-सी) प्रवेशासाठी विद्यार्थी १० मार्चपर्यंत अर्ज करू शकतात. लेखी परीक्षा, मुलाखत आणि समूहचर्चेच्या आधारे यास प्रवेश दिला जाईल. १३ ते १८ एप्रिलदरम्यान प्रवेशपूर्व परीक्षा होईल. यात विद्यार्थ्याची शैक्षणिक पात्रता आणि व्यावसायिक अनुभवालाही प्राधान्य दिले जाईल.

पात्रता
ह्युमॅनिटीज, सामाजिक शास्त्रे, व्यवस्थापन, मीडिया, पत्रकारिता, जाहिरात, जनसंपर्क किंवा संबंधित कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी ५५
टक्के गुणांसह उत्तीर्ण आवश्यक. निकाल : २४ एप्रिल २०१५
शुल्क आणि विद्यावेतन
फेलो प्रोग्रामसाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क घेतले जात नाही. पहिल्या वर्षी दरमहा २५ हजार, दुसऱ्या वर्षी २७ हजार आणि तिसऱ्या वर्षी दरमहा ३० हजार रुपये विद्यावेतन दिले जाते. सोबतच शैक्षणिक अनुदानही दिले जाते.

मॅनिट, भोपाळ
भोपाळच्या मौलाना आझाद नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलॉजीच्या एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थी २ मार्चपर्यंत अर्ज करू शकतात. कॅट किंवा जीमॅटमधील गुणानुक्रम तसेच संस्थेद्वारा आयोजित मुलाखत तसेच समूहचर्चेच्या आधार प्रवेश दिला जाईल.
पात्रता
55 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. प्रवेशावेळी कॅट किंवा जीमॅटमधील गुणांना ७० टक्के, समूहचर्चेला २० टक्के आणि मुलाखतीला १० टक्के प्राधान्य राहील.

शुल्क
भोपाळच्या मॅनिटमध्ये एमबीएसाठी एकूण सुमारे १ लाख ७० हजार रुपये शुल्क आहे, तर वारंगलच्या एनआयटीत यासाठी सुमारे १ लाख ४० हजार रुपये शुल्क आकारले जाते.
अॅमिटी युनिव्हर्सिटी
अॅमिटी विद्यापीठाच्या एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थी २९ जानेवारीपर्यंत अर्ज करू शकतात. कॅट, मॅट, जॅट किंवा जीमॅटमधील गुणानुक्रम, मुलाखत तसेच समूहचर्चेच्या आधारे यास प्रवेश दिला जाईल. कॅट, मॅट, जॅट किंवा जीमॅट नसलेले विद्यार्थी अॅमिटी लेखी परीक्षेच्या माध्यमातून प्रवेश घेऊ शकतात.

पात्रता
५० टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. पदवीच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थीही अर्ज करू शकतात. प्रत्येक कॅम्पसमध्ये अॅप्टिट्यूड टेस्टचा कट ऑफ स्कोर वेगवेगळा असेल.

शुल्क
एमबीएसाठी नोएडा कॅम्पसमध्ये पहिल्या वर्षासाठी २.६० लाख, मुंबई, लखनऊ आणि गुडगावमध्ये १.६८ लाख, जयपूरमध्ये १.३० लाख आणि ग्वालियर कॅम्पसमध्ये १.२५ लाख रुपये शुल्क राहील.

एसआरएम विद्यापीठ
सोनीपतच्या एसआरएम विद्यापीठातील व्यवस्थापनाच्या पदव्युत्तर आणि इंटिग्रेटेड अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी १५ मे पर्यंत अर्ज करू शकतात. विद्यापीठाद्वारा आयोजित एसआरएमएचकॅट या सामाईक परीक्षेच्या माध्यमातून यास प्रवेश दिला जाईल. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट २९ मे रोजी तर पेन अँड पेन्सिल बेस्ड टेस्ट ३१ मे रोजी होईल.

पात्रता
एमबीएसाठी कोणत्याही शाखेतील पदवी ५० गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक. इंटिग्रेटेड अभ्यासक्रमासाठी बारावीत ५० टक्के गुण आवश्यक आहे.

शुल्क
एमबीएसाठी १ लाख २५ हजार रुपये आणि इंटिग्रेटेड कोर्ससाठी १ लाख रुपये वार्षिक शुल्क आहे. क्राइस्ट विद्यापीठात एमबीएसाठी वार्षिक सुमारे ४ लाख रुपये शुल्क आहे.

इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्च
पुण्याच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमंेट डेव्हलपमेंट अँड रिसर्चच्या पीजीडीएम कोर्समध्ये प्रवेशासाठी विद्यार्थी ३१ जानेवारीपर्यंत अर्ज करू शकतात. प्रवेश कॅट, मॅट, जॅट, एटीएमए किंवा महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्टच्या आधारे दिला जाईल.

पात्रता
५० टक्के गुणांसह कोणत्याही शाखेची पदवी. पदवीच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थीही अर्ज करू शकतात.

शुल्क
इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्चमध्ये पीजीडीएमचे वार्षिक शुल्क १ लाख ७५ हजार रुपये आहे.