आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Education Article, Carrier In Marketing Resurch

Divya Education: करिअर इन मार्केटिंग रिसर्च

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाच वर्षांत जागतिक स्तरावरील क्षेत्रात मिळणार तीन लाख नोकर्‍या, 20 टक्के असेल तगडे पॅकेज

मार्केटिंग रिसर्चचा हेतू हा ग्राहकांच्या आवडी-निवडी, गरजा आणि त्यांच्या इच्छा लक्षात घेऊन तयार होतो. त्यानंतर याबाबतचे विश्लेषण करण्यात येते. याच विश्लेषणाच्या आधारे कंपन्या आणि सार्वजनिक उपक्रमांत आपले व्यावसायिक धोरण ठरवत असते. प्रत्येक व्यवसायात मार्केटिंग रिसर्च हे महत्त्वाचे असते. भारतात मार्केटिंग रिसर्चचा व्यवसाय हा सुमारे अडीच हजार कोटींचा आहे. गेल्या तीन- चार वर्षांत यात 18 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या व्यवसायाच्या जागतिक रूपामुळे विद्यार्थी या क्षेत्रात करिअर करू शकतात. येत्या पाच वर्षांत या क्षेत्रात तीन लाख नोकर्‍या उपलब्ध होण्याची शक्यता आहे. मात्र, या क्षेत्रात चांगली नोकरी मिळवण्यासाठी शैक्षणिक पार्श्वभूमी उत्तम असण्याची गरज आहे.

चाळीस वर्षांत पूर्णपणे बदलले
या व्यवसायाचे स्वरूप
1970 पर्यंत या व्यवसायाचे स्वरूप हे परंपरागंत असेच होते. त्या वेळी हे क्षेत्र म्हणजे जाहिरात विभागाचेही असल्याचे बोलले जात होते. 1980 मध्ये चांगल्या जाहिरात व्यवस्थापनासाठी स्वतंत्र मार्केटिंग रिसर्च समोर आले. हळूहळू या क्षेत्रात वाढ होत गेली आणि ग्राहकांच्या मागणीला समजण्यासाठी नव्या उत्पादनाची सुरुवात व जुन्या उत्पादनात नव्या योजना राबवून मार्केटिंग रिसर्च क्षेत्र विस्तारत गेले. 1990 च्या दशकात जागतिक उदारीकरणानंतर या क्षेत्रात महत्त्व अचानक वाढले. आता कंपन्या या आपल्या उत्पादनाबाबत ग्राहकांचे मत मागवून त्यात आवश्यक ते बदल करत आहेत. हे देखील आता मार्केटिंग रिसर्चचा भाग बनले आहे. माहिती गोळा करण्यासाठी पेन आणि कागदाच्या जोरावर सुरू झालेले हे क्षेत्र आता हायटेक झाले आहे.

एफएमसीजी क्षेत्रात सर्वाधिक जोर
मार्केटिंग रिसर्च क्षेत्राचा सर्वाधिक वापर हा बदलत्या ग्राहकांच्या क्षेत्रात अधिक असतो. कारण की यात ग्राहकांच्या बदलत्या मागणीनुसार कंपन्या आपल्या उत्पदनात व धोरणात बदल करत असतात. जगभरात मार्केटिंग रिसर्च क्षेत्रातील 70 टक्के व्यवसाय हा याच क्षेत्रात आहे. मात्र, गेल्या 15 ते 20 वर्षांत टेलिकॉम, विमा, रिटेल आणि बँकिंग क्षेत्रातदेखील याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळेच मार्केटिंग रिसर्च क्षेत्र हे विस्तारले आहे.

वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत नोकरीच्या संधी
मार्केटिंग रिसर्चचा अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍यांना नोकरीच्या संधी या जवळपास सर्वच क्षेत्रात आहेत. प्रत्येक कंपन्यांशी निगडित जसे की तांत्रिक, सायंटिफिक सर्व्हिसेस फर्म्स, सल्लगार कंपन्या आणि जाहिरात कंपन्या येथे या उमेदवारांना नोकरी मिळतात. याशिवाय इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडअर, वेब सर्च पोर्टल्स किंवा स्वयंसेवी संस्थांतदेखील मार्केटिंग रिसर्च उमेदवारांची आवश्यकता असते.

दिव्य एज्युकेशनचे आर्काइव मिळवण्यासाठी लॉग इन करा....
www.dainikbhaskar.com

10+2 नंतर प्रवेश, देशातील या संस्थांत प्रत्येक जागेसाठी 100 अर्जदार
मार्केटिंग रिसर्च संबंधित पदवी आणि पदविकेच्या अभ्यासक्रम हे देशातील अनेक संस्थेत उपलब्ध आहेत. कोणत्याही विषयांत 10 +2 पद्धतीनुसार परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पदवीला प्रवेश घेता येतो. बहुतांश संस्थांत प्रवेश पूर्व परीक्षेनंतरच या अभ्यासक्रमाला प्रवेश देण्यात येतो. मार्केटिंग रिसर्चमध्ये एमबीए आणि पदविका अभ्यासक्रम अहमदाबाद, बंगळूरू, कोलकाता, लखनऊ आणि इंदूर येथील आयआयएम येथे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या संस्थांत कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट (कैट) दिल्यानंतर प्रवेश घेता येतो आणि प्रत्येक जागेसाठी 100 हून अधिक विद्यार्थी अर्ज करतात. अनेक संस्थांत पदवी आणि पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

2 ते 3 लाख सुरुवातीचे पॅकेज, शैक्षणिक पार्श्वभूमी चांगली असल्यास चांगली नोकरी
या क्षेत्रात प्रोजेक्ट मॅनेजर, ऑपरेशन सुपरवायझर, सर्व्हे सुपरवायझर, मार्केट अ‍ॅनालिस्ट अशा पदावंर 2 ते 3 लाख रुपयांची सुरुवातीला नोकरी मिळू शकते. या क्षेत्रात नोकरीत पुढे जाण्याच्या चांगल्या संधी आहेत. मात्र, यासाठी चांगली शैक्षणिक पार्श्वभूमी असणे गरजेचे आहे. आयआयएम या संस्थांत अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच 7 ते 10 लाख रुपयांचे पॅकेज मिळू शकते. मात्र, यापेक्षाही अधिक पॅकेज आणि जबाबदारीची नोकरी हे केवळ 15 ते 20 टक्के लोकांनाच मिळते.
पश्चिम बंगालमध्ये मेडिकलच्या जागा अर्ध्यावर, कर्नाटकात देखील आहे धोका
मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने पश्चिम बंगालच्या सात मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या जागा भरण्यास बंदी घातली आहे. याशिवाय राज्यतील उर्वरित 10 कॉलेजांत देखील जागांची संख्या 1700 हून कमी करत 1255 एवढी केली आहे. गेल्या वर्षी राज्यातील 17 मेडिकल कॉलेजात जवळपास 2450 एमबीबीएसच्या जागा होत्या. एमसीआयने मूलभूत सुविधांच्या कमतरतेमुळे हा निर्णय घेतला आहे. कर्नाटकमध्येदेखील एमबीबीएसच्या सुमारे 1 हजार जागा कमी होण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक कॉलेजांनी प्रवेशाच्या पूर्वी एमसीआयची परवानगी घेतली नाही. तसेच काही कॉलेजांत विनापरवानगी जागांची संख्या वाढवण्यात आली आहे.
प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या नंबरवर किंवा ई-मेल करा
education@dainikbhaskargroup.com