आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Education Article Delhi University Management Study

दिव्य एज्युकेशन: दिल्ली विद्यापीठात मॅनेजमेंट व पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्ली विद्यापीठाच्या सहा महाविद्यालयांत मॅनेजमेंट स्टडीज (ऑनर्स)च्या पदवी अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांना 18 जूनपर्यंत अर्ज करता येतील. 26 जून रोजी होणार्‍या प्रवेशपूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारावर येथे प्रवेश घेता येईल. याआधारे विद्यार्थ्यांना बी. आर. आंबेडकर महाविद्यालय, दीनदयाल उपाध्याय महाविद्यालय, कॉलेज ऑफ व्होकेशनल स्टडीज, केशव महाविद्यालय, महाराजा अग्रसेन कॉलेज आणि शहीद सुखदेव कॉलेज ऑफ बिझनेस स्टडीज येथे प्रवेश घेता येईल.

पात्रता : 50 टक्के गुणांसह कोणत्याही अभ्यासक्रमात 10+2 पद्धतीनुसार परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. गुणवत्ता यादी तयार होताना 10+2 चे गुण व कॅटच्या परीक्षेतील गुणांना समान महत्त्व देण्यात येईल.

निकाल : 4 जुलै 2014

शुल्क : सर्व महाविद्यालयांत या अभ्यासक्रमाचे वेगवेगळे शुल्क आहेत. बी. आर. आंबेडकर महाविद्यालयात ‘बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज’चे वार्षिक शुल्क हे 10 हजार 430 रुपये एवढे आहे, तर कॉलेज ऑफ व्होकेशनल स्टडीजसाठी 9 हजार 150 रुपये शुल्क आहेत.

पीईसी विद्यापीठाच्या बीई आणि बीआर्क अभ्यासक्रमाला प्रवेश
पंजाब इंजिनिअरिंग कॉलेज युनिव्हर्सिटी, पटियाला येथे इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्चरच्या पदवी अभ्यासक्रमाला विद्यार्थी 13 जुलैपर्यंत ऑनलाइन रजिस्ट्रेशन करू शकतील. प्रवेश मात्र जेईई- मेन 2014 आणि प्रवेशपूर्व परीक्षेच्या आधारावर मिळेल. या माध्यमातून विद्यार्थी एसएस भटनागर इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी- चंदिगड, युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलजी-चंदिगड, पीईसी युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी, चंदिगड इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी- होशियारपूर आणि चंदिगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथे प्रवेश घेता येईल.

पात्रता : फिजिक्स, मॅथ्स, भाषा विषय, केमिस्ट्री/ बायलॉजी/ बायोटेक्नॉलॉजी या विषयांसह कोणत्याही एका विषयात 45 टक्के गुणांसह 10+2 गुणांसह परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे.

शुल्क : पीईसी युनिव्हर्सिटीमध्ये बीई आणि बीआर्क अभ्यासक्रमाला प्रतिसेमिस्टर जवळपास 35 हजार रुपये शुल्क आहे. बीआयटी सिंदरी येथे बीटेक करण्यासाठी प्रतिसेमिस्टर 12 हजार रुपये शुल्क आहे.

पीटीयू, कपूरथला येथे एबीएसाठी प्रवेश
पंजाब टेक्निकल युनिव्हर्सिटी, कपूरथलाच्या पंजाब इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथे एमबीएच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना 17 जूनपर्यंत अर्ज करता येतील.

येथे प्रवेश हे कॅट, मॅट, जॅट किंवा सिमॅटच्या आधारावर मिळतील. जे विद्यार्थी वरील परीक्षा उत्तीर्ण नसतील त्यांना विद्यापीठाने घेतलेल्या प्रवेशपूर्व परीक्षेच्या माध्यमातून येथे प्रवेश घेता येईल. प्रवेशपूर्व परीक्षा 22 जून रोजी होईल.

पात्रता : 50 टक्के गुणांसह कोणत्याही अभ्यासक्रमात पदवी आवश्यक. एससी/ एसटी विद्यार्थ्यांसाठी 45 टक्के गुण गरजेचे. यंदा शेवटच्या वर्षाला असलेले विद्यार्थीही यासाठी अर्ज करू शकतील.

शुल्क : पीटीयूमध्ये एमबीएच्या प्रतिसेमिस्टरचे शुल्क 30 हजार रुपये एवढे आहेत. पंजाब युनिव्हर्सिटीमध्ये एमबीएच्या प्रतिसेमिस्टरचे शुल्क हे 50 हजार रुपये आहे.

कोलकाता युनिव्हर्सिटीमध्ये एलएलबीच्या यूजी अभ्यासक्रमाला प्रवेश
कोलकाता युनिव्हर्सिटीच्या दहा महाविद्यालयांत बीए एलएलबीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी 4 जुलैपर्यंत अर्ज करू शकतात. 5 जुलै रोजी होणार्‍या प्रवेशपूर्व परीक्षेच्या आधारे विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल.

पात्रता : 45 टक्के गुणांसह कोणत्याही अभ्यासक्रमात 10+2 पद्धतीनुसार परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. वयोमर्यादा : अर्जदाराचे वय 1 जून 2014 रोजी 20 वर्षांपेक्षा कमी असावे.

शुल्क : कोलकाता युनिव्हर्सिटीत बीए एलएलबी अभ्यासक्रमाचे वार्षिक शुल्क हे 1500 रुपये आहे. एनएलयू अहमदाबाद येथे एलएलबीच्या पदवीच्या अभ्यासक्रमाचे वार्षिक शुल्क हे सुमारे 80 हजार रुपये एवढे आहे.

दिव्य एज्युकेशनचे आर्काइव मिळवण्यासाठी लॉग इन करा....
www.dainikbhaskar.com

गुजरातमध्ये सहा इंजिनिअरिंग महाविद्यालयांना मंजुरी
ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनने गुजरात येथील सहा नव्या इंजिनिअरिंग महाविद्यालयांना मंजुरी दिली आहे. अहमदाबाद, राजकोट, वल्लभ विद्यानगर आणि नवसारी येथे हे महाविद्यालय सुरू होणार आहेत. या महाविद्यालयांमुळे राज्यातील इंजिनिअरिंगच्या जागांत 7 हजार 164 जागा वाढणार आहेत. 2014-15 च्या शैक्षणिक वर्षात राज्यात आता 70 हजार 115 जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल. यंदा राज्यात 62 हजार 951 विद्यार्थी बारावी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. यात एकूण विद्यार्थ्यांपैकी 63 हजार विद्यार्थी हे प्रवेश घेण्यायोग्य आहेत; परंतु यापूर्वीच राज्यातील सुमारे 12 हजार इंजिनिअरिंगच्या जागा रिक्त राहण्याची शक्यता अधिकारी आणि तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या नंबरवर किंवा ई-मेल करा
education@dainikbhaskargroup.com