आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Divya Education : ईडीआय, अहमदाबादच्या मॅनेजमेंट कोर्सेसमध्ये प्रवेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंत्रप्रिन्योरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, अहमदाबादच्या मॅनेजमेंट कोर्सेसमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थी 14 मार्चपर्यंत अर्ज करू शकतात. प्रवेश कॅट, मॅट, जॅट, एटीएमए किंवा सीमॅटच्या व्हॅलिड स्कोअरच्या आधारावर मिळेल. या माध्यमातून त्यांना बिझनेस आंत्रप्रिन्योरशिप (बीई) आणि डेव्हलपमेंट स्टडीजच्या (डीएस) पीजी डिप्लोमा कोर्सेसमध्ये प्रवेश मिळेल. बीई कोर्समध्ये 120 आणि डीएस कोर्समध्ये 60 जागा आहेत. दोन्ही कोर्सेसची मुदत दोन वर्षे आहे.
पात्रता
50 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेची पदवी. या वर्षी शेवटच्या वर्षाची परीक्षा देणारे विद्यार्थीही अर्ज करू शकतात. एससी/एसटी विद्यार्थ्यांसाठी 45 टक्के गुण आवश्यक आहेत.
निवड प्रक्रिया
विद्यार्थ्यांना कॅट, मॅट, जॅट, एटीएमए किंवा सीमॅट स्कोअरच्या आधारावर आंत्रप्रिन्योरियल अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट (बीईसाठी) आणि सोशल अवेअरनेस टेस्ट (डीएससाठी) निवडले जाईल. यानंतर त्यांना वैयक्तिक मुलाखत द्यावी लागेल. गुणवत्ता यादी दोन्हींना मिळून बनवली जाईल.
शुल्क
ईडीआयमध्ये पीजीडीएम-बीई कोर्सचे एकूण शुल्क जवळपास 8 लाख 50 हजार रुपये आणि पीजीडीएम-डीएम कोर्सचे 4 लाख 65 हजार रुपये आहे. डी. वाय. पाटील विद्यापीठ, मुंबईमध्ये आंत्रप्रिन्योरशिप मॅनेजमेंट कोर्सचे एकूण शुल्क जवळपास 3 लाख 45 हजार रुपये आहे.
एमजीएम विद्यापीठाच्या एमबीबीएस कोर्समध्ये प्रवेश
नवी मुंबई येथील एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेसच्या एमबीबीएस कोर्समध्ये प्रवेशाची प्रक्रिया 3 मार्चपासून सुरू झाली आहे. विद्यार्थी त्यासाठी 30 एप्रिलपर्यंत अर्ज करू शकतात. प्रवेश चाचणीच्या (एमजीएम-सीईटी) आधारावर प्रवेश होईल. 17 मे रोजी त्याचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना नवी मुंबई आणि औरंगाबाद कॅम्पसमध्ये प्रवेश मिळेल. दोन्ही ठिकाणी एकूण 300 जागा आहेत.
पात्रता
50 टक्के गुणांसह बारावी परीक्षा फिजिक्स, बायोलॉजी आणि इंग्रजीसह उत्तीर्ण असावी.
वयोमर्यादा : अर्जदाराचा जन्म 31 डिसेंबर 1997 आधी झालेला असावा.
शुल्क व वेतन
एमजीएम विद्यापीठामध्ये एमबीबीएस कोर्सचे वार्षिक शुल्क जवळपास 8 लाख 50 हजार रुपये आहे. मणिपाल विद्यापीठात या कोर्सचे वार्षिक शुल्क जवळपास 7 लाख 60 हजार रुपये आहे.
निवड प्रक्रिया
प्रवेश परीक्षेत कमीत कमी 50 टक्के गुण प्राप्त करणा-या विद्यार्थ्यांनाच काउन्सिलिंगसाठी बोलावले जाईल. ज्यांनी बायोलॉजीमध्ये जास्त गुण घेतले असतील, त्यांनाच प्राधान्य दिले जाईल.
निकाल : 10 जून, 2014
प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या नंबरवर किंवा ई-मेल करा
education@dainikbhaskargroup.com