आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Education Article In Marathi, MBA Course Admission

दिव्य EDUCATION: एनआयटी, दुर्गापूरच्या एमबीए कोर्ससाठी प्रवेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दुर्गापूरची एमबीए अभ्यासक्रमातील प्रवेश प्रक्रिया 25 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. त्यासाठी विद्यार्थी 11 एप्रिलपर्यंत अर्ज करू शकतात. वैध कॅट स्कोअरच्या आधारे त्यांना गटचर्चा आणि मुलाखतीच्या आधारे निवडले जाईल.

पात्रता
कोणत्याही विद्या शाखेत 55 टक्के गुणांसह पदवीधर. पदवीच्या अंतिम परीक्षेला असलेला विद्यार्थीही अर्ज करू शकतो. एससी/ एसटी विद्यार्थ्यांसाठी 50 टक्के गुणांची परीक्षा.

निवड प्रक्रिया
कॅट परीक्षेत गुणवत्तेच्या आधारे गटचर्चा आणि वैयक्तिक मुलाखत यांना जोडून गुणांकन केले जाते. प्रवेशामध्ये सर्वाधिक 75 टक्के गुण कॅटच्या स्कोअरला दिले जातात. त्याशिवाय 15 टक्के महत्त्व चर्चा आणि 10 टक्के मुलाखतीला दिले जाते. गटचर्चा आणि मुलाखत 9-15 मार्चदरम्यान होईल.

शुल्क
एनआयटी, दुर्गापूरमध्ये एमबीए अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना पहिल्या सत्रात 32 हजार 417 रुपये आणि उर्वरित तीन सत्रात सुमारे 29 हजार रुपये प्रती सत्र द्यावे लागतात. एनआयटी, वारंगळमध्ये एमबीए कोर्सचे प्रती सत्र शुल्क सुमारे 50 हजार रुपये आणि एनआयटी, अलाहाबादमध्ये सुमारे 25 हजार रुपये आहे.

निकाल : 30 मे 2014

आयआयटी, जोधपूरच्या एमटेक कोर्समध्ये प्रवेश
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, जोधपूरच्या मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमात प्रवेशासाठी विद्यार्थी 31 मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. विद्यार्थ्यांना गेट स्कोअरच्या आधारे रिटर्न टेस्ट किंवा मुलाखत दोन्हीसाठी शॉर्टलिस्ट केले जाणार आहे. यातून एनर्जी, सिस्टिम्स सायन्स आणि इन्फर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीच्या एमटेक कोर्ससाठी प्रवेश मिळेल.

पात्रता
60 टक्के गुणांसह कोणत्याही विद्या शाखेतील पदवी किंवा बीटेक किंवा इंजिनिअरिंगची पदवी. 70 टक्के गुणांसह सायन्स शाखेत एमएससीची पदवी. आयआयटी संस्थांमधून 10 गुणांवर 8 सीजीपीएसह बीटेक किंवा बीई पदवीधारक विद्यार्थ्यांसाठी गेट स्कोअर अनिवार्य नाही.

शुल्क आणि शिष्यवृत्ती
आयआयटी, जोधपूरमध्ये एमटेक अभ्यासक्रमाच्या प्रती सत्रासाठी 21 हजार रुपये. त्याशिवाय या अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दर महिन्याला 8 हजार रुपयांचे मानधन मिळेल. आयआयटी, चेन्नईमध्ये एमटेक अभ्यासक्रमाच्या प्रती सत्रासाठी अध्ययन शुल्क केवळ 5 हजार रुपये आहे.

एज्युकेशन भास्करच्या अर्काइव्हजसाठी लॉगऑन करा...
(www.dainikbhaskar.com)

ज्ञान
पोलिओच्या उपचारात हेनरिटाचे योगदान, परंतु ती अनभिज्ञच होती आफ्रिका-अमेरिका वंशाच्या हेनरिटा लॅक्स यांना कर्करोग होता. 4 ऑक्टोबर 1950 त्यांचा कर्करोगाने मृत्यू झाला होता. परंतु जिवंतपणी काळोखात जगलेल्या हेनरिटा यांना मृत्यूनंतर अधिक प्रसिद्धी मिळाली. त्याचे कारण होते त्यांचे डॉक्टर जॉर्ज ओट्टो गे. डॉक्टर जॉर्ज यांनी हेनरिटा यांच्या मृत्यूच्या अगोदर त्यांच्या शरीरातील निरोगी पेशी काढून घेतल्या होत्या. एवढेच नाही तर त्यांची पुनर्निर्मितीदेखील केली होती. त्या वेळी ही गोष्ट विज्ञान जगताला नवीन होती. कल्चर्ड सेल्स अधिक वेळ जिवंत राहू शकत नव्हते. डॉ. जॉर्ज यांनी जिवंत पेशींना विलग केले होते. त्याचा उपयोग पोलिओ लसीकरणाच्या विकासासाठी महत्त्वाचा ठरला. त्यानंतर कर्करोग, गुणसूत्रांची मोजणी आणि व्हिट्रो फर्टिलायझेशनच्या संशोधनात त्याचा उपयोग झाला. आश्चर्य म्हणजे एवढ्या महत्त्वपूर्ण शोधामध्ये हेनरिटाचे योगदान महत्त्वाचे ठरल्याची साधी कल्पनाही तिच्या कुटुंबीयांना नव्हती. त्यांना ही गोष्ट 1970 च्या सुमारास समजली.

प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या नंबरवर किंवा ई-मेल करा
education@dainikbhaskargroup.com